Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Maratha Reservation: मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची ठाकरे गटाची मागणी

Maratha Reservation Update: जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मंत्र्यांचं शिष्टमंडळ जरांगेंच्या उपोषस्थळी गेले होते. मात्र गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे यांच्या शिष्टमंडळाला जरांगेंचं मन वळवण्यात अपयश आलं. मात्र सरकार लवकरात लवकर जीआर काढणार असल्याचं आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजनांनी जरांगेंना दिलं आहे. त्यावेळी संदीपान भुमरे यांनी जबाबदारी स्विकारली. मात्र, जरांगे मागे हटले नाही.

Maratha Reservation: मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची ठाकरे गटाची मागणी
LIVE Blog

Maratha Reservation:मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसलेले जालन्यातले मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांनी सरकारला मराठ्यांचा कुणबीत समावेश करण्यासंदर्भात जीआर काढण्यासाठी राज्य सरकारला 4 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. त्यानंतर पाण्याचाही त्याग करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मंत्र्यांचं शिष्टमंडळ जरांगेंच्या उपोषस्थळी गेले होते. मात्र गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे यांच्या शिष्टमंडळाला जरांगेंचं मन वळवण्यात अपयश आलं. मात्र सरकार लवकरात लवकर जीआर काढणार असल्याचं आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजनांनी जरांगेंना दिलं आहे. त्यावेळी संदीपान भुमरे यांनी जबाबदारी स्विकारली. मात्र, जरांगे मागे हटले नाही.

06 September 2023
14:32 PM

मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती घेतायत राज्यपालांची भेट. राज्यपालांच्या भेटीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार येण्यास सुरूवात. अंबादास दानवे, सचिन अहिर, रविंद्र वायकर, अजय चौधरी, सुनिल प्रभू राजभवनवर पोहचले. आदित्य ठाकरे, अनिल परब, खासदार विनायक राऊत, सुनिल शिंदेही राजभवनवर पोहचले.

14:15 PM

बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही इथे आरक्षणाच्या मागणीसाठी पाच युवकांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतलाय. 

14:04 PM

मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात बंदची हाक देण्यात आली. मंचर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेत्यांसह नागरिकांनी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी केली 

13:06 PM

कुणाच्याही दबावात येऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघ शांत बसणार नाही.. असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघानं दिलाय.. आरक्षण समितीला प्रत्येक कुटुंबाचा इतिहास पाहावा लागेल, सामूहिक पद्धतीनं आरक्षणाचा निर्णय होऊ शकत नाही.. असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय.. 

12:12 PM

आरक्षणाबाबत माझा अभ्यास काय हे शेंडगेंनी शिकवू नये असं प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. शेंडगे कोणाचा तरी बाहुला असल्यासारखे बोलत आहेत अशी टीका त्यांनी केली. काल पत्रकार परिषदेत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी वडेट्टीवारांवर टीका केली होतीय. 

12:10 PM

मराठा आरक्षणाचा तिढा लवकर सोडवावा, प्रसंगी विधेयक आणावे सरकारमधील मंत्र्यांचा सूर

12:09 PM

विधेयकाबाबत एकमत झाल्यास सरकार एक दिवसीय अधिवेशन बोलवणार चर्चा

12:05 PM

मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,विखे पाटील ,सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे ,संदीपन भुमरे   मंत्रालय मध्ये दाखल झाले आहेत

11:57 AM

ओबीसींवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होता कामा नये- छगन भुजबळ 

11:56 AM

मराठा आरक्षणासंदर्भात सरकार विधेयक आणण्याच्या तयारीत 

09:16 AM

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना जरांगे पाटील यांच्या भेटीला. तब्बेतीची केली विचारपूस. दोषींवर कारवाई करण्याचे दिले आश्वासन. पोलीस अधीक्षकही उपोषणस्थळी दाखल

08:10 AM

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांची तब्येत खालावली, डॉक्टरांची तपासणी सुरु

08:04 AM

उपोषण सुरू असलेल्या गावातच मराठा तरुण ज्ञानेश्वर राजेश आवरगंड संपवलं जीवन, आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट

07:38 AM

सरकारच्या वतीने दोनदा शिष्टमंडळ जाऊन देखील मराठा आंदोलकांची मनधरणी करण्यासाठी अपयश 

07:32 AM

काल रात्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये तब्बल दोन तास चर्चा 

Read More