Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Lok Sabha Nivadnuk Voting LIVE: उद्धव ठाकरेंच्या सभेला पावसाचा फटका, डोंबिवलीतील सभा रद्द

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांनंतर आता चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान पार पडणार आहे.   

Maharashtra Lok Sabha Nivadnuk Voting LIVE: उद्धव ठाकरेंच्या सभेला पावसाचा फटका, डोंबिवलीतील सभा रद्द
LIVE Blog

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE: पहिल्या तीन टप्प्यांनंतर लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. तर देशातील 96 मतदारसंघांमध्येही सोमवारी मतदान होतंय. महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर, या मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत. पंकजा मुंडे, अमोल कोल्हे, सुजय विखे-पाटील, निलेश लंके, मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे, संदीपान भुमरे, रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे, रक्षा खडसे अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा चौथ्या टप्प्यात पणाला लागणार आहे. तेव्हा आता मतदार राजा कुणाला कौल देतो हे 4 जूनलाच समजेल.. 

 

13 May 2024
17:55 PM

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात आज सकाळी 7 ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.49 टक्के मतदान झालं आहे

चौथ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार -  60.60 टक्के
जळगाव -  51.98 टक्के
रावेर - 55.36 टक्के
जालना - 58.85 टक्के
औरंगाबाद  - 54.02 टक्के
मावळ - 46.03 टक्के
पुणे - 44.90 टक्के
शिरूर -  43.89 टक्के
अहमदनगर-  53.27 टक्के
शिर्डी - 52.27 टक्के
बीड -  58.21 टक्के

17:45 PM

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 5 वाजेपर्यंत झालेली मतदानाची टक्केवारी

01 अक्कलकुवा         56.40 टक्के        
02 शहादा            63.46 टक्के        
03 नंदुरबार        58.53 टक्के        
04 नवापूर            69.46 टक्के        
05 साक्री             60.25 टक्के        
06 शिरपुर            55.98 टक्के        

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात  5 वाजेपर्यंत 55.27 टक्के मतदान झाले

17:34 PM

उद्धव ठाकरेंच्या सभेला पावसाचा फटका, डोंबिवलीतील सभा रद्द

 

17:32 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हेलिकॉप्ट प्रवास रद्द

हवामान खराब झाल्याने मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर मधून जाणं टाळलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोटारीने मुंबईला, तर अमित शाह मोटारीने मुंबई विमानतळाकडे रवाना

15:11 PM

राज्यातील 11 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 43.76 टक्के मतदानाची नोंद 

15:07 PM

शिर्डी - मतदान केंद्रात पक्षाचं चिन्ह असलेल्या मतदान स्लिप आढळल्याने उमेदवार संतप्त

शिर्डी लोकसभेचे महाविकासआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी घेतला मतदान आक्षेप, मतदान स्लिप मतदान केंद्रात नेऊ देऊ नये केली मागणी, कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव मतदान केंद्रावरील प्रकार 

15:04 PM

श्रीरंग बारणे यांच्याकडून मतदानासाठी आवाहन

मावळ लोकसभा मतदारसंघात एक वाजेपर्यंत 27.14 टक्के मतदान झालंय. अजून ही मतदानासाठी बराच वेळ असल्याने नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असं महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी म्हटलं

14:57 PM

उरणमधील आगरी कोंढरी पाडा येथे मतदानावर बहिष्कार 

उरणमधील आगरी  कोंढरी पाडा या गावातील लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. 1400 मतदार संख्या असलेल्या  बहिष्कार टाकला आहे. या गावातील शेतीमध्ये खारफुटी उगवल्याने नापीक झाली आहे. हा प्रश्न न सुटल्याने ग्रामस्थनी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे

 

12:47 PM

संभाजीनगरच्या शताब्दीनगरमध्ये मतदानावर बहिष्कार 

संभाजीनगरच्या शताब्दीनगरमध्ये नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय.. या भागात पाणी, रस्ते, वीज अशा मुलभूत सुविधा नाहीत.. वारंवार मागणी करुनही मुलभूत सुविधा मिळत नसल्याची तक्रार इथल्या नागरिकांनी केलीये.. त्यामुळे ठोस आश्वासन मिळेवर्यंत मतदान न करण्याचा निर्णय या स्थानिकांनी घेतलाय.. 

 

12:23 PM

काही काळंबेरं होण्याची शक्यता-शरद पवार पक्ष

बारामतीत लोकसभा मतदारसंघात EVM गोडाऊनचं सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबियांनी केला होता.. झी २४ तासनं ही बातमी लावून धरली.. त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. आता ईव्हीएम रुमचं सीसीटीव्ही फुटेज पुन्हा सुरु झालंय.. दरम्यान रविवारपासून सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून करण्यात आला होता.. 

12:04 PM

शिर्डीत मतदार आणि मतदान अधिकारी भिडले

शिर्डीत मतदार आणि मतदान अधिकारी यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळतंय.. साईनाथ माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर गोपनीयतेचा भंग करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. मतदान केंद्रावरील अधिकारी मतदान कुणाला केलं जातंय हे बघत असल्याची तक्रार मतदारांनी केलीय. मतदारांच्या तक्रारीनंतर परिसरात काहीसा गोंधळ झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

11:59 AM

चौथ्या टप्प्यात सकाळी 11 पर्यंत 17.51% मतदान

राज्यात चौथ्या टप्प्यात सकाळी 11 पर्यंत 17.51% मतदान झालं असून सर्वाधिक मतदान नंदुरबार मतदारसंघात झालाय. तर सर्वात कमी मतदान शिरूर मतदारसंघात करण्यात आलं. नंदुरबारमध्ये 22.12 तर शिरूरमध्ये 14.51% मतदानाची नोंद झाली आहे. 

 

11:23 AM

बारामतीत धक्कादायक प्रकार समोर

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएमच्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही फुटेज बंद पडल्याचं समोर आलं आहे. 

10:45 AM

Maharashtra Lok Sabha Nivadnuk Voting LIVE: पावसामुळे नंतर मतदानाचा वेग काहीसा मंदावला

रावेर शहरात पावसामुळे धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं. शहरातील मतदान केंद्रावर सकाळी साडेआठच्या सुमाराला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. ढगांच्या गडगडाटासह पंधरा-वीस मिनिटे पाऊस सुरू होता. पावसामुळे घराघरातून उन्हापूर्वी मतदानासाठी निघालेले मतदार थांबले. इतकेच नव्हे तर मतदान केंद्रातून मतदान झालेल्या मतदारांनाही मतदान केंद्रातच थांबून राहावे लागले. या अचानक आलेल्या पावसामुळे नंतर मतदानाचा वेग काहीसा मंदावला आहे.

10:26 AM

Maharashtra Lok Sabha Nivadnuk Voting LIVE: साईच्या नगरीत थेट सेना विरुद्ध सेना लढत, मतदानाला सुरुवात

09:41 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE: राज्यात सकाळी 9 पर्यंत 6.45% मतदान झालं आहे 

  • संभाजीनगर-सकाळी 9 पर्यंत 7.52% मतदान
  • पुणे-सकाळी 9 पर्यंत 6.61% मतदान
  • मावळ-सकाळी 9 पर्यंत 5.38% मतदान
  • शिरुर-सकाळी 9 पर्यंत 4.97
  • अहमदनगर-सकाळी 9 पर्यंत 5.13
  • नंदुरबार-सकाळी 9 पर्यंत 8.43% मतदान
  • जळगाव-सकाळी 9 पर्यंत 6.14 % मतदान
  • शिर्डी-सकाळी 9 पर्यंत 6.83% मतदान
  • बीड-सकाळी 9 पर्यंत 6.72% मतदान
  • जालना-सकाळी 9 पर्यंत 6.88% मतदान
  • रावेर-सकाळी 9 पर्यंत 7.14% मतदान
09:31 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE: अमोल कोल्हेंची तक्रार

जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक १४ येथे पोलिंग एजंटला उपस्थित राहण्यास अधिकारी मज्जाव करत आहेत. त्याचप्रमाणे, मतदान केंद्र क्रमांक २३५ येथे VVPAT मशीन बंद असल्याने अजूनही याठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू झालेली नाही.

 

09:16 AM

महाराष्ट्र लेचापेचा नाही- उद्धव ठाकरे

महाराष्ट्र भोळा आहे भाबडा आहे, मात्र महाराष्ट्र लेचापेचा नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची भूमिका कणखरपणे मांडली. प्रेम करणा-याला महाराष्ट्र प्रेमानं अलिंगन देतो. मात्र पाठीत वार करणा-याविरोधात महाराष्ट्र वाघनखं काढतो. त्याप्रमाणे महाराष्ट्र लुटणा-यांविरोधात आता महाराष्ट्रानंच वाघनखं काढल्याचा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखतीदरम्यान विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ही भूमिका मांडली.

08:44 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE: उमेदवाराला मतदानाच्याच दिवशी समज 

शिवसेनेच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचतील उमेदवार सदाशिव लोखंडेना मतदानाच्याच दिवशी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून समज देण्यात आला. गळ्यात असलेली पक्षाच्या चिन्हांची मफलर बाहेर काढण्याच्या सूचना केल्या. मतदान झाल्यानंतर लोखंडेंच्या शर्टला असलेलं निवडणूक चिन्ह धनुष्यबाणही काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी केल्या. शिर्डी मधील आदर्श माध्यमिक  मतदान केंद्रावर हा सर्व प्रकार घडला. 

08:42 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE: धनगर आरक्षण आणि मतदान 

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर मागील काही महिन्यांपासून आक्रमक आंदोलन करणारे आणि आपली भूमिका मांडणारे बाळासाहेब दोडतले यांनी त्यांच्या पत्नी मनीषा दोडतले यांच्यासह आपल्या मूळ गावी चतुरवाडी येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.. धनगरांचे प्रश्न सभागृहात मांडणार आहे त्याच्याच पाठीशी समाज उभा टाकेल असं म्हणत यापुढेही आरक्षणाची लढाई अशीच सुरू राहणार असल्याचे बाळासाहेब दोडतले म्हणाले. 

08:22 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE: 14 गावांमध्ये दोनदा मतदान 

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या तेलंगणाशी वाद सुरू असलेल्या 14 गावांमध्ये देखील आज पुन्हा मतदान होत आहे. तेलंगणा राज्यातल्या आदिलाबाद लोकसभा जागेसाठी आजच्या टप्प्यात स्थानिक मतदार मतदान करत आहेत. या भागातील नागरिक महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका असल्या की दरवेळी मतदान करतात. दुहेरी मतदान टाळण्यासाठी यंदा दोन्ही राज्यातील प्रशासनाचे प्रयत्न होते. मात्र दोन्ही राज्यातल्या मतदार यादीत स्थानिकांची नावे असल्याने सर्रास मतदान केले जात आहे. 

08:21 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE: अभिनेता चिरंजीवी यांनी केलं मतदान 

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते चिरंजीवी यांनी तेलंगणातील हैदराबाद येथे असणाऱ्या ज्युबली हिल्स येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबीयांनीही मतदानाचा हक्क बजावला. 

08:13 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE:

08:09 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE: हैदराबादमध्ये हाय व्होल्टेज लढाई

हैदराबाद तेलंगणाच्या भाजपच्या उमेदवार माधवी लता तसंच एमआयएमचे उमेदवार असदुद्दीन ओवैसी यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. माधवी लता या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कन्या म्हणून ओळखल्या जातात. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माधवी लता यांचं कौतुक केलंय. त्यामुळे या हाय व्होल्टेज लढाईत कोण बाजी मारतंय सर्वांचं लक्ष लागलंय.

08:07 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE: सेलिब्रिटी मतदार 

तेलगू इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांनी अगदी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. हैदराबादच्या ज्युबिली हिल्स इथल्या मतदान केंद्रावर अभिनेता ज्युनिअर एनटीआर आणि अल्लू अर्जुन यांनी रांग लावत मतदान केलं. 

07:46 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE: पंतप्रधानांनी केलं मतदान करण्याचं आवाहन... 

लोकसभा निवडणुकीच्या आजच्या चौथ्या टप्प्यात, 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांसाठी मतदान होत आहे.  या मतदारसंघातील लोक मोठ्या संख्येने मतदान करतील आणि युवा मतदार तसेच महिला मतदार यात प्रामुख्याने  अग्रेसर असतील अशी मला खात्री आहे. चला, आपण सगळे आपले कर्तव्य बजावूया आणि युवा मतदार तसेच महिला मतदार यात प्रामुख्याने  अग्रेसर असतील अशी मला खात्री आहे. चला, आपण सगळे आपले कर्तव्य बजावूया आणि आपली लोकशाही अधिक बळकट करूया!

07:42 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE: मतदानाच्या पहिल्याच तासात मतदान यंत्र बिघडली 

संभाजी नगर ग्रामीण भागात वैजापूर येथे  5 ठिकाणी तर गंगापूर 2 ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड आल्याची माहिती मिळाली असून, त्यामुळं मतदानाला उशिराने सुरुवात होणार आहे.  मतदानाच्या पहिल्याच तासात इथं ही परिस्थिती पाहायला मिळाल्यामुळं यंत्रणांचा गोंधळ उडाला. 

 

 

07:22 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE: नंदुरबार लोकसभा चुरशीची निवडणूक 

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात चुरशीची निवडणूक होणार आहे. भाजपचे उमेदवार डॉ. हिना गावित विरुद्ध एडवोकेट गोवाल पडवी लढत होणार आहे. 2115 मतदान केंद्रांवर 19 लाख 70 हजार 317 मतदार मतदानाच्या हक्क बजावणार असून उमेदवारांसोबतच उमेदवारांचे वडिलांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इथं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आले आहेत. 

07:09 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE: शिरूर मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात 

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील शिरूर मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झालीय. इथल्या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील या दोन्ही दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. नागरिक मतदान केंद्रावर मतदानासाठी उत्स्फूर्तपणे दाखल झाले.

07:07 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE: पुण्याचा खासदार कोण? 

पुण्याचा खासदार कोण यासाठी आता मतदान पार पडतंय. पुण्यात तिरंगी लढत आहे.. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासमोर भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांचं आव्हान आहे..औक्षण करुन रवींद्र धंगेकर मतदानासाठी रवाना झाले आहेत.

07:05 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE: बीडमध्ये प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात 

बीडमध्ये प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली असून, बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे असा थेट सामना बीडमध्ये पाहायला मिळणार आहे. इथं मतदार कुणाला कौल देणा-याकडे सर्वांचे लक्ष आहे.  बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित मतदार आहे. या मतदारांना इथे आणून मत करण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसल्याच पाहायला मिळालंय. 

 

07:01 AM

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE: निलेश लंके आणि विखे समर्थक भिडले

मतदानाआधीच्या पूर्वसंध्येला निलेश लंके आणि विखे समर्थक एकमेकांमध्ये भिडले आहे. पारनेर तालुक्यातल्या वडझिरे गावामध्ये पेट्रोल पंपावर लंके आणि विखे समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली.  भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप लंके समर्थकांनी केला. तर आपली गाडी फोडल्याचा आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदेंनी केला. लंके समर्थक व  विखेसमर्थकांनी एकमेकांवर हल्ला केल्यामुळे पारनेरमधे मोठा राडा झाल्याचा पाहायला मिळाला. दोन्ही गटांकडून पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले आहेत.

Read More