Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Budget Session : शेतकऱ्यांच्या बांधावर हे आता का जात नाहीत ? - उद्धव ठाकरे

Maharashtra Budget Session 2023 Updates : बजेट अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू होत आहे. अवकाळी पावसाच्या संकटासह शेतमालाच्या हमीभावावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत. राज्यात अवकाळी पावसाने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाय. त्यामुळे आता राज्य सरकारने शेतक-यांना तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलीय. विरोधी पक्षांनी आज स्थगन प्रस्ताव देऊन चर्चेची मागणी केलीय. काल धुळवडीत नेते सहभागी असल्यामुळे सरकारला अजून नुकसानीचा अंदाज आला नसावा असा टोला त्यांनी मारला. 

Maharashtra Budget Session : शेतकऱ्यांच्या बांधावर हे आता का जात नाहीत ? - उद्धव ठाकरे
LIVE Blog

Maharashtra Budget Session 2023 Updates : बजेट अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू होत आहे. अवकाळी पावसाच्या संकटासह शेतमालाच्या हमीभावावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत. उद्या विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्याआधी आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत मांडणार आहेत.  

08 March 2023
14:58 PM

Maharashtra Budget Session 2023 Updates :  महाविकास आघाडी नेत्यांची बैठक अजित पवार यांच्या दालनात बैठक सुरु आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,  राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांसह अनेक नेते उपस्थितीत

14:20 PM

 संजय राऊत यांनी विधीमंडळाच्या हक्कभंग नोटीशीला उत्तर

Maharashtra Budget Session 2023 Updates :  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाच्या हक्कभंग नोटीशीला उत्तर दिले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा संजय राऊत यांनी दावा केला आहे. मी मुंबईच्या बाहेर असताना या वक्तव्याचा विपर्यास करण्यास आला. हे वक्तव्य विधीमंडळातील सदस्यांचा अवमान करण्याकरिता केलं नसून हे वक्तव्य एका विशिष्य गटापुरतं होतं. विधीमंडळाच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि नसणार आहे. मी केलेलं वक्तव्य तुम्ही तपासू पाहावा, अशी मागणी त्यांनी पत्रद्वारे केली आहे.

14:17 PM

Maharashtra Budget Session 2023 Updates :  राज्यात 13 हजार 729 हेक्टरवर अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. तूर्तास हाती आलेल्या माहितीनुसार शेतक-यांना तात्काळ मदत केली जाणार अशी घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी ( Devendra Fadanvis) विधानसभेत केली. आज कामकाज सुरु झाल्यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) स्थगन प्रस्ताव मांडत प्रश्नोत्तराच्या तासाऐवजी शेतक-यांना तातडीने मदत करावी अशी मागणी केली. सरकार तातडीने मदत करणार असा सवाल विरोधी पक्षनेत्यांनी केला होता. 

14:14 PM

Maharashtra Budget Session 2023 Updates :  आवकळी पावसाबद्दल मुख्यमंत्री यांनी कालच तातडीने आदेश देऊन माहिती मागविली आहे. दोन दिवसांत मदत जाहीर करणार आहोत. पंचनामे सुरु आहेत. विरोधकांनी वॉकआऊट केले आहे. शेतकऱ्यांचा कळवला दाखवण्यासाठी केलेले नाटक आहे. शेतकऱ्यांना भरगोस मदत राज्य सरकार करणार आहे, अशी माहिती संजय कुंटे यांनी दिली.

14:11 PM

Maharashtra Budget Session 2023 Updates :  महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानभवन प्रांगणात आगमन करताच आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सुरक्षा व्यवस्थेत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलातील महिला अधिकारी, कर्मचारी भगिनींना शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्याचे उत्पादनशुल्क मंत्री शंभुराज देसाई आदी उपस्थित होते.

12:54 PM

शेतकऱ्यांच्या बांधावर हे आता का जात नाहीत ? - ठाकरे

Maharashtra Budget Session 2023 Updates : शेतकरी प्रश्नावर  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारव तोफ डागली आहे. जनतेच्या हिताचे प्रश्न ऐरणीवर आणूच दिले जात नाही, वेगळाच विषय काढला जातो.  अवकाळी शेकऱ्यांना मदतीचे केवळ आदेश देऊ नये, तर अंमलबजावणी करावी, अशी त्यांनी मागणी केली.  कांद्याचे आंदोलन पेटलेलेच आहेच. माझ्यावर टीका करायचे घरीच बसतो, आता यांनी बांधावर जावे, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिलाय.

fallbacks

12:36 PM

महाविकास आघाडी सरकारने तातडीची मदत केली होती - पवार

Maharashtra Budget Session 2023 Updates : अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडं हे रंग खेळण्यात दंग असताना दुसरीकडं शेतकरी मात्र हवालदिल झालाय. सरकारला याचे काहीही पडलेले नाही.  कांदा खरेदी अजून सुरु नाही. सर्वच शेतकरी अडचणीत आहे. आम्ही अशा प्रसंगात शेतकऱ्यांना तातडीची मदत दिली होती.  तसा निर्णय हे सरकार घेत नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. पिकविमा कंपन्यांना आदेश द्यायला हवे होते. केंद्राची टीम बोलावली जात नाही. या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी महाविकास आघाडी सरकार पाठिशी आहे, असे ते म्हणाले.

12:06 PM

सिंधुदुर्गात तापामानाचा फटका आंब्याला बसण्याची शक्यता

Maharashtra Budget Session 2023 Updates : एकीकडे राज्यात काही भागात अवकाळी पावसानं दाणादाण उडवली आहे. तर दुसरीकडे सिंधुदुर्गात वाढत्या तापामानाचा फटका आंब्याला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार चिंतेत आलेत... दुपारी प्रचंड ऊन आणि रात्री वातावरणात निर्माण होणारा गारवा, यामुळे आंब्याचा मोहर गळून पडण्याची भीती बागायतदारांना सतावत आहे. तर यावर उपाय म्हणून सकाळ-संध्याकाळ झाडांना मुबलक पाणी देण्याची गरज असल्याचं हवामान कृषी शास्त्रज्ञांनी सांगितलंय. 

12:05 PM

शंभूराज देसाई यांची उद्धव ठाकरेंवर टीका

Maharashtra Budget Session 2023 Updates : अवकाळीच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळालेत. त्यांनी विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन केले.  दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ब्र ही उच्चारला नाही अशी टीका उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. 

12:00 PM

शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची सरकारची घोषणा

Maharashtra Budget Session 2023 Updates : राज्यात 13 हजार 729 हेक्टरवर अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय. तूर्तास हाती आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जाणार अशी घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. आज कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडत प्रश्नोत्तराच्या तासाऐवजी शेतक-यांना तातडीने मदत करावी अशी मागणी केली. सरकार तातडीने मदत करणार असा सवाल विरोधी पक्षनेत्यांनी केला होता. 

11:44 AM

अनाधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर विधीमंडळात चर्चा

Maharashtra Budget Session 2023 Updates :  मुंबईतील अनाधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर विधीमंडळात चर्चा. सर्वोच्य न्यायालय आदेशानंतर ही फेरीवाल्यांना कारवाई करावी. सीएम डीसीएम आज येथे आहेत. फेरीवाले समस्या गंभीर, टाटा सामाजिक सॅ्सथा सर्वेह झाला त्यानुसार अंमलबजावणी कारावी. यावर फडणवीस म्हणालेत, अनाधिकृत फेरीवाल्यांना कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या जातील.

आमदार संजय केळकर यांनी ठाणे अनाधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दावरुन नाराजी व्यक्त केली. ठाण्यात मोठे गुंड आहेत. आर्थिक व्यवहार यात अनाधिकृत कारावई करावी. यावर देवेंद्र फडणवीस म्हणालेत, राज्यातील सर्वच मनपा फेरीवाले याबाबत तीन महिन्यात रिपोर्ट सादर करतील.

11:28 AM

मुख्यमंत्री विधानभवनात दाखल

Maharashtra Budget Session 2023 Updates :  मुख्यमंत्री विधानभवनात दाखल झाले आहेत. त्याआधी  ठाकरे गटाच्या आंदोलक आमदारांशी विधीमंडळ पायऱ्यांवर चर्चा  केली. हरभरा खरेदी केंद्रे सुरु करण्याची मागणी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि राहुल पाटील करत होते. यासाठी दोघेही आमदार हातात फलक घेवून पायऱ्यांवर आंदोलन करत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आत जात असतांना त्यांनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली. 

11:12 AM

शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी

Maharashtra Budget Session 2023 Updates : अवकाळीच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळालेत. त्यांनी विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी केली. तसेच नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका पिकाचं नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं हिरावून घेतला. गारपिटीमुळे होत्याचं नव्हतं झाले. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

11:09 AM

उद्धव ठाकरे आज विधीमंडळात 

Maharashtra Budget Session 2023 Updates : शिवसेना पक्षप्रमुख आणि विधान परीषद आमदार उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता विधान भवनात येणार आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या दालनात महाविकास आघीडीच्या नेत्यांसोबत बैठकही करणार आहेत.
 

11:08 AM

आधुनिक महिला धोरण सादर होण्याची शक्यता ?

Maharashtra Budget Session 2023 Updates :  विधानसभेत जागतिक महिला दिनानिमित्त आधुनिक महिला धोरण सादर होण्याची शक्यताय. महिला धोरण चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. महिला दिनाचे औचित्य साधून विधानसभा अध्यक्ष  राहुल नार्वेकर यांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. या धोरणात महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येणार आहे. 

11:07 AM

गुजरात सरकार देऊ शकते, मग महाराष्ट्र सरकार का देत नाही?

Maharashtra Budget Session 2023 Updates : गुजरात सरकारने 350 कोटी रूपये कांदा उत्पादक शेतक-यांसाठी मदत जाहीर केली. आपल्याहून लहान राज्य असूनही गुजरातला जे जमलं ते महाराष्ट्राला का जमू नय़े असा सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला. भारत सरकारने काहीही मदत केली नाही, शेतकरी हवालदिल झालाय असं ते म्हणाले. 

11:04 AM

अजितदादा म्हणाले, 'आज एका गोष्टीची खंत वाटतेय'

Maharashtra Budget Session 2023 Updates : एकीकडे महिला दिन साजरा होत असताना राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही ही बाब राज्याला न शोभणारी असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. राज्याच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले नाही.  मी तर अनेकदा जाहीर सभांमधून आणि माध्यमांतही या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहातही बोललो आहे. महिलांना मंत्रिमंडळात स्थान का दिलेले नाही. पण काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही, असे ते म्हणाले.

11:00 AM

नुकसानीचा अंदाजच नाही, अजितदादांचा सरकारला टोला  

Maharashtra Budget Session 2023 Updates : राज्यात अवकाळी पावसाने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाय. त्यामुळे आता राज्य सरकारने शेतक-यांना तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलीय. विरोधी पक्षांनी आज स्थगन प्रस्ताव देऊन चर्चेची मागणी केलीय. काल धुळवडीत नेते सहभागी असल्यामुळे सरकारला अजून नुकसानीचा अंदाज आला नसावा असा टोला त्यांनी मारला. 

10:58 AM

शिंदे-फडणवीस सरकारला पराभवाची भिती - पवार

Maharashtra Budget Session 2023 Updates : पराभवाच्या भीतीनं शिंदे-फडणवीस सरकार निवडणुका जाहीर करत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलाय. तर सुप्रीम कोर्टाच्या निकालावरच निवडणुका अवलंबून असल्याचा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. 

10:56 AM

हवालदिल शेतकरी, सरकारकडे मदतीची मागणी

Maharashtra Budget Session 2023 Updates : अवकाळी पाऊस, खराब हवामानाचा फटका शहापूर तालुक्यात भेंडी उत्पादकांना बसला. भेंडीची कळी गळणे, भेंडीवर चिकट्या, बुरशी, तसंच पानं लाल पडून करप्या असे रोग पडलाय. हातातोंडाशी आलेलं भेंडी पीक उध्वस्त झालंय. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. यावर्षी भेंडीचं उत्पादन चांगलं निघायला सुरूवात झाली होती. त्यातच पाऊस आला, ढगाळ हवेमुळे रोगाचा प्रादूर्भाव वाढलाय. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केलीय. 

10:54 AM

संजय राऊत यांच्याविरोधात आज हक्कभंग समितीचा ठोस निर्णय

Maharashtra Budget Session 2023 Updates : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात विधानसभेत मांडलेल्या हक्कभंगावर आज हक्कभंग समिती ठोस निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राऊतांकडे 48 तासांत स्पष्टीकरण मागितलं होतं. मुदत संपून गेली तरी राऊतांकडून लेखी उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळे हक्कभंग समिती आज निर्णय घेण्याची शक्यता आहे. राऊतांनी विधीमंडळ हे चोरमंडळ असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राऊतांवर हक्कभंग काढण्यात आलाय. 

10:52 AM

विधानमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन आणि घोषणा

Maharashtra Budget Session 2023 Updates : अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका पिकाचं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं हिरावून घेतला. तर गारपिटीमुळे होत्याचं नव्हतं झालं. यामुळे शेतकरी चिंतेत आहे...तसंच शेतमालाला हमीभाव मिळत नाहीय. कांदा, कोथिंबीर, टॉमेटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांना दिलेयत. मात्र, शेतक-यांना मदत लवकर मिळावी या मागणीसाठी आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विधानमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन करत आणि घोषणा देत याची  झलक दाखवून दिली आहे.

10:51 AM

शेतमालाच्या हमीभावावरून विरोधक आक्रमक ...

Maharashtra Budget Session 2023 Updates  :  बजेट अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू होत आहे. अवकाळी पावसाच्या संकटासह शेतमालाच्या हमीभावावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत. उद्या विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्याआधी आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत मांडणार आहेत. राज्याची सरत्या वर्षातली आर्थिक स्थिती, विविध क्षेत्रातला चढउतार याचा लेखाजोखा या आर्थिक पाहणी अहवालात दिसून येईल.  पहिल्या आठवड्यात विविध मुद्द्यांवरून विधानसभेचं अधिवेशन गाजलं होतं. शेतक-यांच्या प्रश्नावर, कांदाप्रश्नावरून विरोधकांनी आंदोलनासह दीर्घकालीन चर्चेची मागणी केली होती. त्यामुळे दुसरा आठवडाही शेतक-यांच्या मुद्द्यावरून गाजण्याची शक्यता आहे. जागतिक महिला दिनानिमित्त राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी काही महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

Read More