Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE :मुख्यमंत्री शिंदे उद्या करणार मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

Maharashtra Breaking News LIVE : राज्यात आज पावसाची संततधार सुरूच आहे. राज्यातील पावसाचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या. 

Maharashtra Breaking News LIVE :मुख्यमंत्री शिंदे उद्या करणार मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
LIVE Blog

Maharashtra Breaking News LIVE : राज्यात बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळं राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. त्याचच ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा सक्रीय झाला आहे. आज अनेक जिल्ह्यात पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. 

25 August 2024
19:55 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

- उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी. 

- पनवेलच्या पळस्पे नाका येथून कळणार पाहणी दौऱ्याची सुरुवात. 

- मुंबई गोवा महामार्गाच्या सध्याच्या परिस्थितीचा घेणार आढावा.

- मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात मुंबई गोवा हायवेचा मी स्वतः पाहणी दौरा करेल असा आश्वासन दिलं होतं. 

- त्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री उद्या हा दौरा कळणार आहे 

- यावेळी मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरण काम आणि हायवेची सध्याची स्थिती याचा आढावा घेणार

19:49 PM

बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेची उद्या पोलीस कोठडी संपणार. 

बदलापूर मध्ये दोन मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण जलदगती न्यायालयाने 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी मुदत संपणार असल्याने उद्या सकाळी कल्याणच्या जलदगती न्यायालयात हजर करणार आहे. आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालय पोलीस कोठडी मध्ये वाढ होते की न्यायालयन कोठडी मिळते याकडे सर्वांची लक्ष् लागले आहे.मात्र हे प्रकरणाची चौकशी एसआरटीकडे दिली असल्याने पोलीस कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

19:21 PM

शेगांव येथील मंगल कार्यालयात राज ठाकरेंनी कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्ता राज ठाकरे यांना भेटण्यासाठी जात होता म्हणून सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. काही काळ गोंधळाचं वातावरण निर्मण झालं.

17:47 PM

हवामान खात्याकडून अलर्ट जारी 

पालघर, रायगड, रत्नागिरी, जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज.‌ तर काही ठिकाणी कोसळणार अत्याधिक मुसळधार पाऊस. हवामान खात्याकडून कोकणातील तिन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी 

 

16:54 PM

पुण्यात राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीचा वारकरी संमेलनाच

पुण्यात राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीचा वारकरी संमेलनाच समारोप सोहळा होतोय. शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. 7-8 महिन्यापूर्वी राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीची स्थापना, स्थापनेनंतर पहिलेच अधिवेशन.आहे
शरद पवार यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

 

15:52 PM

राज ठाकरे जय मालोकर या कार्यकर्त्याच्या कुटुंबियांच्या भेटीला 

राज ठाकरे हे शेगाव जाण्याआधी जय मालोकार या कार्यकर्त्याच्या घरी जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडी तोडफोड प्रकरणातील मृत्यू पावलेल्या जय मालोकार यांच्या कुटुंबियांना सांत्वन भेट देण्यासाठी गेले आहे..

14:25 PM

Maharashtra Breaking News LIVE: महिला विरोधात अत्याचार करणाऱ्याला फाशी आणि जन्मठेपेची शिक्षेची तरतूद केली आहे. लग्नाचे अमिश दाखवून केलेल्या अत्याचाऱ्याच्या बाबतही कठोर कायदा आहे, केंद्र सरकार या कारवाईत राज्य सरकारच्या सोबत आहे.

14:25 PM

Maharashtra Breaking News LIVE: देशातील सगळ्या राज्याच्या पक्षांना सांगतोय, महिलांच्या विरोधात कृत्य केले तो वाचला नाही पाहिजे, मदत करणारा पण राहिला नाही पाहिजे, शाळा, पोलीस जिथं कुठं दिरंगाई झाली तिथं कारवाई झाली पाहिजे. हे पाप अक्षम्य आहे, सरकार येईल जाईल, जीवन रक्षा नारी रक्षा महत्वाची आहे, हे आमचे दायित्व आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

14:23 PM

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील इतिहास महिलांच्याशिवाय पूर्ण नाही, शिवाजी महाराजांना घडविण्यासाठी माता जिजाऊने केले. शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले पुढे आल्या. भारताच्या मातृ शक्तीने समाज घडविण्यासाठी मोठे योगदान दिले. महाराष्ट्रातील महिला चांगलं काम करत आहेत, तुम्हा महिलांमध्ये जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांची छाप पाहत आहे: पंतप्रधान मोदी

14:23 PM

Maharashtra Breaking News LIVE: आमची लाडकी बहीण मोठ्या संख्येने उपस्थित आहे, 6 हजार पेक्षा अधिक कोटींचा निधी दिला आहे. महाराष्ट्रातील महिलांना सुद्धा कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे, त्यांना खूप शुभेच्छाः पंतप्रधान मोदी

14:21 PM

Maharashtra Breaking News LIVE : पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात

महाराष्ट्रातील माझ्या बंधू भगिनींना जय श्री कृष्णा, उद्या श्रीकृष्ण जयंती आहे तुम्हाला आजच शुभेच्छा देतो., असं म्हणत मोदींनी मराठीतून भाषणाला केली सुरुवात

14:21 PM

Maharashtra Breaking News LIVE : 2029 ला देशाचा कारभार महिलांना देण्याचं ठरवलंय: फडणवीस

जळगावच्या महिलांनी संख्येचे सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. संधी दिली तर महिलांनी काम केले. देशाला विकसित करायचे असेल तर महिलांची साथ महत्वाची. 2029 ला देशाचा कारभार महिलांना देण्याचे ठरविले आहे. वेगवेगळ्या योजना आणून भारत विकसित करायचा आणि त्यात महिलांचा सहभाग महत्वाचा . 75 लाख कुटुंब बचत गटाशी जोडलर आहे ते 2 कोटींवर जाणार आहे. महिला कधीही पैसे बुडवत नाही, त्यामुळे त्यांना पैसे द्यायला बँका तयार.

12:59 PM

Maharashtra Breaking News LIVE : महाराष्ट्राने नेहमीच महिलांना सक्षम केलं आहेः अजित पवार

12:46 PM

Maharashtra Breaking News LIVE : जळगावात लखपती दीदी कार्यक्रमाला सुरुवात, शिवरायांची प्रतिमा देऊन मोदींचे स्वागत

 

12:12 PM

Maharashtra Breaking News LIVE : पंतप्रधान मोदी लखपती दीदींशी संवाद साधणार; जळगावात सभास्थानी आगमन

12:07 PM

Maharashtra Breaking News LIVE : राज ठाकरे यांची वाशिम जिल्ह्यातील मनसे पदाधिकारासोबत बैठक सुरू

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने वाशिम जिल्ह्यातील कारंजा , वाशिम रिसोड  विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यासोबत राज ठाकरे यांची बैठक सुरू

11:38 AM

Maharashtra Breaking News LIVE : प्रशासनाकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या आदेशाला हरताळ

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने खड्डे दुरुस्ती करा. असे आदेश देऊनही प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत आहे. पुणे शहर आणि परिसरातील खड्ड्यांमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. प्रशासनावर वचक नसल्यामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे,अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.

11:32 AM

Maharashtra Breaking News LIVE : अजित पवार गटाच्या आमदाराकडून लागले शरद पवारांच्या स्वागताचे बँनर

शरद पवार आणि अजित पवार हे विधानसभेपुर्वी एकत्र येऊ शकतात. असे सूतोवाच करणारे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी आता थेट शरद पवारांच्या स्वागतासाठी फ्लेक्स झळकवले आहेत. आज जुन्नर विधानसभेत शरद पवार आलेत, त्यांचं स्वागत बेनकेंनी केलंय. इतकंच नव्हे तर नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राची पाहणी करण्यासाठी शरद पवार पोहचले, तेंव्हा स्वतः बेनके तिथं हजर होते. बेनकेंनी गेल्या महिन्यात खासदार अमोल कोल्हेच्या घरात ही शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी राजकारणात काहीही घडू शकतं, पवार काका-पुतणे विधानसभेपुर्वी एकत्र येऊ शकतात. असे सूतोवाच बेनकेंनी दिले होते. 

11:04 AM

Maharashtra Breaking News LIVE :  महिला सुरक्षेवर मोदींनी एक शब्दही काढला नाहीः संजय राऊत

महाराष्ट्रात एक आंदोलन सुरू आहे महिलांच्या सुरक्षेला घेऊन या आमच्या बहिणी आहेत त्यांच्या सुरक्षेला घेऊन याबाबत प्रधानमंत्री यांनी अजून एकही शब्द काढला नाही. ज्या जळगावत प्रधानमंत्री आहेत त्यात जळगावत पंधरा दिवसात ४ जणांवर अत्याचार झाला कोणीतरी जाऊन सांगा प्रधानमंत्री यांना

10:21 AM

Maharashtra Breaking News LIVE :  नाशिक जिल्ह्यात ऑगस्टमध्ये डेंग्यूचे 304 नवे रुग्ण आढळले

जानेवारी पासून आतापर्यंत नाशिकमध्ये 880 जण डेंग्यूने बाधित. मुसळधार पावसाने कीटकजन्य डेंग्यूचा फैलाव थांबेल अशी अपेक्षा ठरली फोल. डेंग्यूचे रुग्णांचे हे सरकारी आकडे असून खाजगी रुग्णालयात देखील अनेक रुग्ण असल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त

 

09:48 AM

Maharashtra Breaking News LIVE :  अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात

अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. नागपूरवरून अकोला जाणारी बस पलटी झाली असून 25 पेक्षा अधिक प्रवाशी जखमी तर 1 प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

09:47 AM

Maharashtra Breaking News LIVE :  नाना पटोले यांचा नवी मुंबई दौरा, प्रचाराचा नारळ फोडणार?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नवी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. नवी मुंबईतील ऐरोली विधानसभेवर काँग्रेसचे अनिकेत म्हात्रे यांनी दावा केला असल्याने नाना पटोले यांच्या दौऱ्याला अधिक महत्व प्राप्त झालेय. काँग्रेस नवी मुंबईत प्रचाराचा नारळ फोडत असल्याचे चित्रं पहायला मिळतंय

09:45 AM

Maharashtra Breaking News LIVE : राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय; धरणे ८०% भरली

काही दिवसांच्या ब्रेकनंतर पावसाने शुक्रवारी रात्री आणि शनिवारी हजेरी लावत राज्यात ठिकठिकाणी बरसात केली. संपूर्ण कोकणसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देशात पावसाचा जोर चांगला होता. धरणातील साठ्यांमध्ये वाढ झाली असून, धरणे ८० टक्के भरली आहेत.

09:44 AM

Maharashtra Breaking News LIVE : कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे राधानगरी धरणाचा एक दरवाजा रात्री उघडला आहे. सहा नंबरचा दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात देखील दडी मारली होती, पण आता मात्र हा पाऊस सर्वदूर सुरू झाला आहे.

09:42 AM

Maharashtra Breaking News LIVE : नंदूरबारमध्ये देवगोई घाटात वळण रस्त्यावर दरड कोसळली

नंदुरबार जिल्ह्यात सलगच्या पावसामुळे आता दरड कोसळाचे घटना समोर येत आहेत. सातपुडाच्या डोंगर रांगांमध्ये रस्त्यांवर दरड कोसळल्यामुळे वाहतूकिला अडचण निर्माण झालेली आहे. 

09:41 AM

Maharashtra Breaking News LIVE : जळगावात पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा महाविकास आघाडीकडून विरोध

महाविकास आघाडीच्या वतीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा केला जाणार विरोध. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मानवी साखळी बनवत केला जाणार विरोध. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो पदाधिकारी होणार सहभागी

09:41 AM

Maharashtra Breaking News LIVE : परभणी जिल्ह्यातील सात मंडळात अतिवृष्टी,पीक गेली पाण्याखाल

परभणी जिल्ह्यात मुसळधार सर्वदूर पाऊस झालाय, जिल्ह्यात सरासरी ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली तरी यामध्ये जिल्ह्यातील सात मंडळामध्ये अतिवृष्टी झालीय, महातपुरी, बाभळगाव, सोनपेठ,शेळगाव, वडगाव,केकरजवळा आणि रामपुरी या सात मंडळात अतिवृष्टी झालीय

09:01 AM

Maharashtra Breaking News LIVE : पुणे शहरात पावसाची  विश्रांती

08:19 AM

Maharashtra Breaking News LIVE : पंतप्रधान मोदींचा आज जळगाव दौरा

पंतप्रधान मोदी जळगावात लखपती दीदी कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात नुकतेच लखपती झालेल्या 11 लाख नवीन लखपती दीदींचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करतील. पंतप्रधान देशभरातील लखपती दीदींशी संवाद साधणार आहेत.

08:16 AM

Maharashtra Breaking News LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी 26 ऑगस्ट रोजी बदलापूरमध्ये येणार

चिमुकल्या मुलीवरील अत्याचारा विरोधात आंदोलनात सहभागी झालेल्या बदलापूरकरांची राज ठाकरे भेट घेणार आहेत. बदलापूरकरांशी राज ठाकरे यावेळी संवाद साधतील

08:15 AM

Maharashtra Breaking News LIVE : पुण्यातील घाट माथा आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस 

पुण्यातील घाट माथा आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस बरसतोय भोर वेल्हा मुळशी मावळ या भागात कालपासून जोरदार पासून आहे. अनेक भागात 100 मिलिमीटर च्या वर पावसाची नोंद झाली

08:14 AM

Maharashtra Breaking News LIVE : नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणातून मोठ्या प्रमाणात होते विसर्ग 

नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून संत धार सुरू असल्याने गंगापूर आणि दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. त्यामुळे रामकुंडावर दुतोंड्या मारुतीच्या गळ्याला पाणी पोहोचले आहे. 14000 पेक्षा अधिक पातळी रामकुंडावर गेल्यास नाशिक शहरातील गोदाकाटचे असलेल्या बाजारपेठेमध्ये पाणी घुसू शकते.

08:12 AM

Maharashtra Breaking News LIVE : महाराष्ट्रात आज ऑरेंज अलर्ट

मुंबई आणि राज्यात काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे.हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार मुंबई कोकण ठाणे, नाशिक पुणे व इतर ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. 

08:12 AM

Maharashtra Breaking News LIVE : लोणावळ्यात टायगर पॉईंट धुक्यात हरवला

पाऊस आणि धुक्याचा आनंद सध्या लोणावळ्यात पर्यटकांना मिळत आहे. टायगर पॉइंटवर धुक्याची दाट चादर पसरु लागली आहे. उंच घाट माथ्यावर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या टायगर पॉइंट ला पर्यटक पावसाळ्यात मोठी पसंती देतात. सध्या टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट धुक्यात हरवल्याचे चित्र पहायला मिळत आहे

08:02 AM

Maharashtra Breaking News LIVE : नाशिकच्या गोदावरी नदीला पूर, दुतोंड्या मारूतीच्या छातीपर्यंत पाणी

नाशिक शहरात गेल्या दोन दिवसापासून पावसाची सतत दार सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आलाय गोदा घाट परिसरातील सगळेच छोटे-मोठे मंदिर पाण्याखाली गेले आहेत पुराचे इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छाती एवढं पाणी आलंय

Read More