Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE: सिनेट निवडणूक 24 तारखेला, 27 तारखेला निकाल

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील व देश -विदेशातील घडामोडी जाणून घेऊया आता एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE: सिनेट निवडणूक 24 तारखेला, 27 तारखेला निकाल
LIVE Blog

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि इतर मुद्दे चर्चेत आले आहेत. देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घेऊया एका क्लिकवर 

21 September 2024
18:41 PM

Maharashtra Breaking News LIVE: जरांगे आणि हाके यांच्या शिष्टमंडळासोबत पोलिसांची बैठक

वडीगोद्रीतील मराठा-ओबीसी आंदोलकांच्या वादानंतर मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळासोबत पोलिसांची बैठक पार पडलीय. आज जरांगे यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी लोकांची गर्दी वाढली होती. त्यामुळं दोन्ही समाजाकडून घोषणाबाजी सुरु होऊन राडा झाला. त्यामुळं यापुढे तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी दोन्ही आंदोलकांच्या समन्वयकांसोबत बैठक घेतली. हाके यांच्या आंदोलनाजवळून जरांगे यांच्या आंदोलनाकडे जाणाऱ्या गाड्या वळवण्यावर एकमत झालं असल्याचं पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांना म्हटलं आहे. 

18:18 PM

सिनेट निवडणूक 24 तारखेला, 27 तारखेला निकाल होणार आहेत. सुरक्षा व इतर प्रशासकीय यंत्रणांसाठी मुंबई विद्यापीठाने कोर्टाकडे वेळ मागितला आहे. त्याआधी मुंबई हायकोर्टाने सिनेट निवडणुका उद्या म्हणजे रविवारीच घ्या अशा सूचना केल्या होत्या.

18:03 PM

Maharashtra Breaking News LIVE: चाकण शिक्रापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

पुण्याच्या चाकण शिक्रापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या दहा ते पंधरा किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मानस्ताप सहन करावा लागतोय.

17:28 PM

Maharashtra Breaking News LIVE: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक उद्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार 

 माजी राज्यपाल सत्यपाल मलिक उद्या मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते राजकीय विषयावर चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. 

17:09 PM

Maharashtra Breaking News LIVE: मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, मुंबई सिनेट निवडणुका उद्याच होणार

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय. मुंबई सिनेट निवडणुका उद्याच होणार. युवासेनेच्या याचिकेवर हायकोर्टाने निकाल जाहीर केला आहे. 

17:02 PM

Maharashtra Breaking News LIVE: जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दखल घ्या,अन्यथा तीव्र आंदोलन करू

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोलीच्या सेनगाव आणि वसमतमध्ये आज सकल मराठा समाज बांधवांनी बैठक घेत दोन दिवसांमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दखल घ्या. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. वसमत शहरात झालेल्या बैठकीत मंगळवारी वसमत शहर बंदची हाक देण्यात आली आहे. 

16:15 PM

Maharashtra Breaking News LIVE: वडीगोद्रीतील राड्यानंतर मराठा आंदोलकांचा धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको

वडीगोद्रीतील मराठा ओबीसी गटातील वाद मिटल्यानंतर मराठा आंदोलकांनी वडीगोद्रीजवळ धुळे सोलापुर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलंय. हाके यांच्या उपोषणासमोरील रस्त्यावरून का जाऊ दिल जात नाही, असा सवाल पोलिसांना करत मराठा आंदोलकांनी हे आंदोलन केले आहे.

15:18 PM

Maharashtra Breaking News LIVE: वडीगोद्रीमध्ये पुन्हा मराठा ओबीसी आंदोलक आमने सामने

वडीगोद्रीमध्ये पुन्हा मराठा ओबीसी आंदोलक आमने सामने. दोन्ही गटात घोषणाबाजी. पोलिसांकडून घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त. अंतरवलीकडे जाणाऱ्या आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांमध्ये घोषणाबाजी.

15:14 PM

Maharashtra Breaking News LIVE: अभाविप सिनेट निवडणूक रद्द करण्याविरोधात अभाविपची निदर्शने

मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) पदवीधर प्रवर्गाची निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या दबावाने रद्द केल्याचा विरोधात अभाविपने विद्यापीठात आंदोलन केले. विद्यापीठ आणि राज्यशासनाने आपली भुमिका स्पष्ट न केल्याने परिषदेचे शिष्टमंडळ राज्यपालांना दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिली. 

15:06 PM

Maharashtra Breaking News LIVE: नवरात्रीला जागावाटप निश्चित होईल : अनिल देशमुख

काही जागांवर वाद असेल तर तिथं सर्वे केला जाईल. आम्ही चर्चेतून मार्ग काढू. 15 टक्के जागांची चर्चा बाकी आहे. नवरात्रीला जागावाटप निश्चित होईल. आजच्या बैठकीत विदर्भाबाबत चर्चा झाली. सध्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय आहे. 

14:39 PM

Maharashtra Breaking News LIVE: युवासेना सिनेट निवडणुकीच्या स्थगितीच्या विरोधात हायकोर्टात

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या स्थगितीच्या विरोधात युवा सेनेची  मुंबई उच्च न्यायालयात धाव. आज दुपारी 3 वाजता या सगळ्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार.

14:32 PM

Maharashtra Breaking News LIVE:  धारावीतली परिस्थिती निवळली, सात दिवस अतिक्रमणाला स्थगिती

धारावीत अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या पालिकेच्या पथकाला स्थानिकांनी विरोध केला. जवळपास दोन ते तीन तास सुरू असलेल्या आंदोलनानंतर धारावीतल्या 90 फूट रस्त्यावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसाची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा धारावी पोलीस स्टेशनमध्ये आले होते. स्थानिक खासदार वर्षा गायकवाड काँग्रेस नेते नसीम खान तसेच इतर पक्षाचे नेते मुंबई महापालिकेच्या अधिकारी यांनी समन्वय करून स्थानिकांची समजूत घातली. पुढच्या सात दिवसांमध्ये ही अतिक्रमण कारवाही स्थगित करण्यात आली आहे

13:40 PM

वंचित बहुजन आघाडीकडून 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या 11 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीने जागा वाटपाबाबत आघाडी घेतली आहे. यामध्ये रावेरमधून तृतीयपंथी शमिशा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

13:01 PM

Maharashtra Breaking News LIVE: पुण्यातील लोहगड विमानतळाचे नामकरण होणार, फडणवीसांची घोषणा

पुण्यातील लोहगड विमानतळाचे नामकरण करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज विमानतळ असे नामकरण करणार.

12:28 PM

Maharashtra Breaking News LIVE:   सोलापूर: आमदार राजेंद्र राऊत यांचे ठिय्या आंदोलन अखेर दहाव्या दिवशी मागे 

आमदार राऊत यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विशेष अधिवेशनाची मागणी वगळता इतर मागण्या मान्य करण्याबाबत बैठक लावू असे आश्वासन दिले
 

12:11 PM

Maharashtra Breaking News LIVE:  धारावीतील अतिक्रमण कारवाईला स्थगिती

धारावीतील अतिक्रमण कारवाई आजच्या दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. लोकांना घरी जाण्याचे आवाहन, स्थानिक खासदार वर्षा गायकवाड आणि पोलीस उपायुक्त तेजश्री सातपुते यांनी केलं आहे. पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या गाड्या जाऊ देण्याचं आवाहन

11:57 AM

Maharashtra Breaking News LIVE: पिंपरीत अजित पवार गटाचा प्रचार न करण्याचा ठराव, भाजपच्या अण्णा बनसोडेंना विरोध

पिंपरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करायचा नाही. असा सूर पिंपरी भाजप मध्ये उमटला. लोकसभेत कमळाचा उमेदवार मिळाला नाही आता आम्हाला कमळाचाचं उमेदवार हवा अशी आग्रही भूमिका बैठकीत एकमुखाने मांडण्यात आली. भाजपचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखेंसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी विरोधी सूर उमटला.

11:56 AM

Maharashtra Breaking News LIVE: पुण्यातील खड्ड्यांवर राष्ट्रपती कार्यालय नाराज

पुण्यातील खड्डे हे पुणेकरांसाठी तर त्रासदायक ठरत आहेतच, आता या खड्ड्यांचा फटका देशाच्या राष्ट्रपतींना देखील बसलाय. २ आणि ३ सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु पुणे दौऱ्यावर होत्या. पुण्यातील राजभवनला त्यांचा मुक्काम होता. तिथून कार्यक्रमांसाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जातांना राष्ट्रपतींच्या ताफ्यातील वाहनांना पुण्यातील खड्ड्यांचा मोठा त्रास झाला. राष्ट्रपती कार्यालयाने ही नाराजी पुणे पोलीसांना कळवली. त्यामुळे आता २६ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार असल्यानं रस्त्यांवरील हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावेत यासाठी पुणे पोलिसांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय

11:31 AM

Maharashtra Breaking News LIVE: देवीच्या मुर्त्या घडवण्याच्या कामाला वेग

कल्याणच्या कुंभारवाड्यात कारागिरांकडून देवीच्या मुर्त्या घडवण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे .दरवर्षी हजारो देवीच्या मुर्त्या या कुंभारवाड्यातून मुंबई, ठाणे, पुणे नाशिक या भागात जातात .पीओपी मूर्ती प्रमाणेच यावर्षी शाडूच्या मातीच्या देवीच्या मुर्त्यांना देखील मागणी आहे.

11:30 AM

Maharashtra Breaking News LIVE: महाविकास आघाडीची जागावाटपाची महत्वपूर्ण बैठक सुरु

महाविकास आघाडीची जागावाटपाची महत्वपूर्ण बैठक सुरू असून आज विदर्भातील जागांबाबत प्रामुख्यानं चर्चा होणार  आहे. जवळपास २०० जागांवर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये चर्चा झाली आहे

10:41 AM

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील निवडणुकांची सूत्र थेट अमित शहांच्या हाती

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा फटका बसल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच राज्य भाजपची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. त्याचाच भाग म्हणून शहा  येत्या बुधवारी 25 तारखेला
नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. एकीकडे महायुतीच्या नेत्यांसोबत जागावाटपासाठी वाटाघाटी सुरू असतानाच शहा यांनी राज्याचे विभागनिहाय दौरे सुरू केले आहेत. शहा यांच्या नाशिकमधील चार तासांच्या दौऱ्यात उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांतील संघटनेच्या स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. 

10:41 AM

Maharashtra Breaking News LIVE: जळगाव शहरातील एका अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळल्या अळ्या

जळगाव शहरात हरिविठ्ठल नगरात बालविकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत सुरू असलेल्या अंगणवाडी क्रमांक ६१मध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत अळी आढळली. प्रकल्प अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. शिवाय, पोषण आहाराचा नमुना तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत हरिविठ्ठल नगरात अंगणवाडी (क्र.६१) चालवली जाते.

10:38 AM

Maharashtra Breaking News LIVE: वन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी तक्रार दराकडून 5000 रुपयाची लाच घेताना गोंदिया एसीबीच्या टीमने अटक केली आहे. आरोपीचे नाव वनरक्षक तुलसीदास चव्हाण व वनमजूर देवानंद कोजबे असे आहे सांगण्यात आले आहे

10:37 AM

Maharashtra Breaking News LIVE: ओबीसी नेत्यांनी इथे येऊन ताकद दाखवू नयेः जरांगे पाटील

09:56 AM

Maharashtra Breaking News LIVE: धनगर आणि मराठे कधीच तुटू शकत नाहीः मनोज जरांगे

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद सुरू आहे. 

08:59 AM

Maharashtra Breaking News LIVE:  राष्ट्रपतींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा केला मंजूर

राष्ट्रपतींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा मंजूर केला आहे. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांचा आाज शपथविधी संध्याकाळी ४:३० वाजता होणार आहे.आतिशी यांच्यासह ५ कॅबिनेट मंत्री देखील शपथ घेणार आहेत.

08:41 AM

Maharashtra Breaking News LIVE: सोलापूरच्या कीर्ती भाराडियाचा आणखी एक विश्वविक्रम

सोलापूरच्या कीर्ती भाराडियाचा आणखी एक विश्वविक्रम. तब्बल 32 किलोमीटरचे अंतर सलग 10 तास 25 मिनिटे समुद्रात पोहत केला विश्वविक्रम.श्रीलंकेतील तलाईमनार ते भारतापर्यंत पोहत समुद्री प्रवास करत विशाल लाटा आणि माशांच्या दुर्गंधीचा सामना करत मिळवले यश

08:31 AM

Maharashtra Breaking News LIVE:  मराठा समन्वयकांना बीड पोलिसांची नोटीस

बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क असून जिल्ह्यातील 500 पेक्षा जास्त समन्वयकांना पोलिसांची नोटीस मराठा समन्वयकांना बीड पोलिसांची नोटीस देण्यात आली आहे. प्रशासनाने पाठवलेल्या नोटिसाना आम्ही भिक घालत नाहीत,पोलिसांकडून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मराठा समन्वयकांनी केला आहे. तसंच, मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीदेखील करण्यात येत आहे. 

07:51 AM

Maharashtra Breaking News LIVE:  मनोज जरांगे पाटलांच्या  समर्थनार्थ आज धाराशिव जिल्हा बंदची हाक

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असुन जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे तरीही शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने आज धाराशिव जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.शासनाच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात येणार असुन सर्वांनी शांततेत बंद पाळावा अस आवाहन शनिवारी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल होते.त्यामुळे सकाळपासून शहरात शुकशुकाट पाहायला मिळत असुन बहुतांश भागात दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.दुपार नंतर मराठा बांधव आंतरवली सराटीकडे जाणार आहेत अस देखील मराठा बांधवांनी सांगितले.

07:51 AM

Maharashtra Breaking News LIVE:  राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज जळगाव जिल्ह्यात

शिवस्वराज्य यात्रेच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विधानसभेचे रणशिंग फुकणार आहेत. २१ व २२ नोव्हेंबर रोजी ही यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. यानिमित्त पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार डॉ. अमोल कोल्हे हे देखील जिल्हा दौऱ्यावर 

07:30 AM

Maharashtra Breaking News LIVE:  मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 5 वा दिवस

मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाची धाराशिव आणि बीड बंदची हाक. जिल्ह्यातील बाजारपेठ शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे केले आवाहन. अनेक मराठा बांधव आंतरवाली सराटीकडे जाण्याची शक्यता

07:27 AM

Maharashtra Breaking News LIVE: शिवसेनेची मुंबईत महत्वाची बैठक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून जय्यत तयारी केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन. आजी माजी खासदार-आमदार, नगरसेवक, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुखांना बैठकीला उपस्थित राहणार. पक्षाच्या सोशल मिडिया टीम सदस्यांसोबत संवाद. सोशल मिडिया राज्य प्रमुख राहुल कनाल यांची माहिती

07:25 AM

Maharashtra Breaking News LIVE: मनोज जरांगे यांच्यावर रात्री सलाईनद्वारे उपचार

मनोज जरांगे यांच्यावर रात्री सलाईनद्वारे उपचार करण्यात आलेत.. जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे.. काल रात्री जरांगे यांची तब्येत अत्यंत खालावली होती.. मात्र तरिही जरांगे यांनी उपचाराकरिता नकार दिला होता. मात्र मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगे पाटलांना मला उद्यापर्यंत वेळ द्या व आता एक सलाईन घ्या अशी विनंती केली. त्यामुळं शंभूराज देसाई यांच्या विनंतीवरून रात्री 1 वाजून 55 मिनिटाला जरांगे यांच्यावर सलाईनद्वारे उपचार करण्यात आलेत. 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More