Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE: माता बालक पोषण आहारात आढळला चक्क मृत वाळा साप

Maharashtra Breaking News LIVE: विरोधकांच्या गदारोळात पंतप्रधान मोदींचं भाषण 

Maharashtra Breaking News LIVE: माता बालक पोषण आहारात आढळला चक्क मृत वाळा साप
Updated: Jul 02, 2024, 06:19 PM IST
LIVE Blog

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात व देशभरात आता मान्सूनची समाधानकारक वाटचाल सुरू त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर, आता राज्याच्या राजकारणातही विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. तर, एकीकडे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. राज्यातील व देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया लाइव्ह अपडेट्समधून

02 July 2024
18:19 PM

महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना वाटप आहार वाटप करण्यात येतं. पलूस इथल्या अंगणवाडी मधून वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात चक्क मृत वाळा साप आढळल्याने खळबळ उडाली आहे. डाळ,तांदूळ ,तिखट,मीठ एकत्र असणाऱ्या पॅकेट मध्ये आढळून साप आढळला आहे. गर्भवती माता आणि सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना शासनाच्यावतीने पोषण आहार देण्यात येतो. आता साप आढळल्याने आंगणवाडी सेविकांनी आहार वाटप न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील एकाच ठेकेदाराकडे पोषण आहार वाटप करण्याची जबाबदारी आहे.

16:08 PM

लोकसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी LIVE 
विरोधकांच्या गदारोळात मोदी यांचं भाषण 
मोदी बोलत असताना विरोधकांची घोषणाबाजी 
जनतेनं तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली 

16:07 PM

विधानपरिषद निवडणुकीसाठी मविआ तिसरा उमेदवार दिलेत.  काँग्रेसनं प्रज्ञा राजीव सातव यांना पुन्हा संधी दिलीय. त्यांनी आज अर्ज दाखल केला.

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान उपस्थित होते. तर शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे, सचिन अहिर उपस्थित होते. तर शेकापचे जयंत पाटलांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उद्धव ठाकरे, वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुखांचीही यावेळीही उपस्थिती होती.

15:59 PM

उद्धव ठाकरेंनी मागितली माफी

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामुळे महाराष्ट्रातल्या माताभगिनींचा अपमान झाला असेल, तर पक्षप्रमुख म्हणून आपण माफी मागतो अशी प्रतिक्रिया, उद्धव ठाकरे यांनी दिली.

त्याचवेळी एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करणं गरजेचं असतं. मात्र एकतर्फी निर्णय घेणं लोकशाहीला धरुन नसल्याचंही ते म्हणाले.

विधान परिषदेतील वादग्रस्त विधानावरुन दानवेंचं निलंबन करण्यात आलं, त्यावर ते बोलत होते. 

14:57 PM

दानवेंच्या निर्णयावरुन ठाकरे संतप्त

राहुल गांधींनी हिंदुत्वाचा अपमान केला नाही 
राहुल गांधींविरोधात आणला जाणारा कालचा ठराव चुकीचा 
भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, राहुल गांधींचं वक्तव्य 

14:06 PM

वि. परिषदेतून दानवेंचं 5 दिवस निलंबन 

शिवराळ भाषा अंबादास दानवेंना भोवली 

अशा ठरावा आधी चर्चा व्हायला हवी होती - फडणवीस 

अंबादास दानवेंच सभागृहातून 5 दिवस निलंबन 

विधान परिषदेतून अंबादास दानवेंचं निलंबन 

14:04 PM

विधानपरिषदेत अंबादास दानवेंचं 5 दिवसांचं निलंबन

 

13:28 PM

प्रसाद लाड यांचं ठिय्या आंदोलन 

विधान भवनाच्या पाय-यांवर प्रसाद लाड यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या राजीनाम्याची मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.सभागृहात शिवीगाळ केल्याप्रकरणी दानवेंचं निलंबन करा, दानवेंनी माफी मागावी अशी मागणी लाड यांनी केली आहे. तर आंदोलन करून काय होणार नाही. राजीनाम्याची मागणी सभापतींकडे जाऊन करावी. आता भाजपला कायदे आणि नियम आठवू लागले आहेत. प्रसाद लाड यांना काय करायचं ते करू द्या असा पलटवार दानवेंनी केला आहे. 

 

 

13:13 PM

लाडकी बहीण योजनेवरुन विधानसभेत सवाल

लाडकी बहीण योजनेवरून पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान सभेत सवाल उपस्थित केले. या योजनेला अंतिम तारीख ठेवू नका, फक्त निवडणुकीपुरती योजना नको असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. तर निवडणुकीपुरती योजना ही चुकीचं नरेटिव्ह असून, लाडकी बहीण योजना कायम सुरूच राहणार असल्याचं स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाईंनी दिलं आहे 

 

13:03 PM

विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी पंकजा मुंडेंनी अर्ज भरला आहे. यावेळी फडणवीस, धनंजय मुंडे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, महाजन उपस्थित होते. पंकजा मुंडेंचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेत उमेदवारी देण्यात आली. आज त्यांनी अर्ज भरलाय आहे. 

11:44 AM

Maharashtra Breaking News LIVE: शिवीगाळ प्रकरणावरून विधान परिषदेत प्रवीण दरेकर आक्रमक

शिवीगाळ प्रकरणावरून विधान परिषदेत प्रवीण दरेकर आक्रमक झालेयत...सभागृहात बोलल्यानंतर दानवे पुन्हा मीडियात जाऊन बोलतात त्यांना धाक भीती आहे की नाही...कुणाच्यात हिंमत असेल तर बाहेर येऊन बोट तोडावं...आधी कारवाई करा नाहीतर आम्ही सभागृह चालू देणार नाही अशी आक्रमक भूमिका दरेकरांनी घेतली...त्यानंतर कालच्या प्रकाराबाबत माझा निर्णय घेणार असल्याचं उपसभापती गो-हेंनी सांगितलं...

10:12 AM

Maharashtra Breaking News LIVE: विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी

राहुल गांधींच्या वक्तव्याचे पडसाद विधानपरिषदेत उमटलेत...प्रसाद लाड यांनी आक्षेप नोंदवत निषेध व्यक्त केला...तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संसदेतील विषय असून आपल्या कामकाजाशी संबंध नसल्याचं यावेळी सभागृहात सांगितलं...त्यावेळी प्रसाद लाड दानवेंकडे हातवारे करून बोलत होते...दानवेंनी माझ्याकडे हातवारे करून बोलायचं नाही, असं म्हणत शिवीगाळ केल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय...एकच गोंधळ उडाल्यानंतर विधानपरिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलंय...तर आपण कोणालाही घाबरत नसून काय कारवाई करायची ती आपला पक्ष करेल असं दानवे म्हणालेत..

09:37 AM

Maharashtra Breaking News LIVE: भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवार, पंकजा मुंडेंसह 5 जणांना भाजपकडून उमेदवारी

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपलाय. लोकसभेतील पराभवानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात आलंय. विधान परिषदेसाठी भाजपने पाच जणांची नावं जाहीर केलीयत. पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिलीय. भाजपचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. 

08:52 AM

Maharashtra Breaking News LIVE: विधान परिषदेसाठी निवडणूक अटळ? विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार?

विधानपरिषदेची निवडणूक आता अटळ मानली जातेय. परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असण्याची शक्यताय. महायुती 9 उमेदवार देण्याची शक्यताय. त्यात भाजपनं 5, शिंदे गटानं 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 2 जागांवर उमेदवार जाहीर केलेत. आता मविआही तिसरा उमेदवार देण्याची शक्यताय. काँग्रेसनं प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटानं मिलिंद नार्वेकर असे दोन उमेदवार जाहीर केलेत. तर शेकापचे जयंत पाटील मविआचे तिसरे उमेदवार असण्याची शक्यताय. असं झाल्यास विधानपरिषदेची निवडणूक अटळ आहे. 

08:24 AM

Maharashtra Breaking News LIVE: शिवसेना ठाकरे गट तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत

महाविकास आघाडीत काँग्रेस कडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर तसे शेकाप चे जयंत पाटील सुद्धा आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शिवसेना ठाकरे गट तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत, मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे. तसंच शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार दिल्यास विधान परिषदेची निवडणूक होणे अटळ आहे. महाविकास आघाडीचे सध्याचे संख्याबळ पाहता तिसरा उमेदवार निवडून आणण्यास दहाहून अधिक मतांची गरज लागणार आहे. महायुतीकडून भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे दोन उमेदवार आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

07:45 AM

Maharashtra Breaking News LIVE: दुधाचे दर 30 रुपये स्थिर ठेवण्याबाबत चर्चा

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीत दूध उत्पादक आंदोलकांची बैठक झाली. त्यात दुधाचे दर 30 रुपये स्थिर ठेवण्याबाबत चर्चा झाली. सरकार 5 रुपये अनुदान देणारेय. तर पावडरसाठी जाणा-या दुधावर 3 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते. 

06:56 AM

Maharashtra Breaking News LIVE: मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी

मुंबईतील विधानपरिषद निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचाच डंका पाहायला मिळालाय. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांचा 44 हजार 784 मतांनी विजय झाला. तर शिक्षक मतदारसंघातूनही ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते जगन्नाथ अभ्यंकर यांनी बाजी मारलीय. अभ्यंकर 649 मतांनी विजयी झाले. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळलाय.

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या