Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Breaking News LIVE : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुक स्थागित; महाराष्ट्र सरकारचे आदेश

Maharashtra Breaking News Live: महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील राजकारण, समाजकारणाबरोबरच दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एकाच ठिकाणी...

Breaking News LIVE : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुक स्थागित; महाराष्ट्र सरकारचे आदेश
LIVE Blog
20 September 2024
20:15 PM

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुक स्थागित. महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त झाल्याने निवडणुक स्थगित करण्यात आली.  22 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार होती.  यापूर्वीही एकदा निवडणुकीला स्थगिती दिली होती. परवा निवडणूक असताना अचानक स्थगिती देण्यात आली आहे. 

18:21 PM

तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र मंदिर महासंघकडून हिंदु राष्ट्र-जागृतीकडून दादरमध्ये आंदोलन करण्यात आले. मंदीरांचं सरकारीकरण रद्द करा.  सर्व हिंदु मंदीरांमधील प्रसादात हलाल उत्पादनांच्या वापरावर निर्बंध लावा या मागण्यांकरता आंदोलन करण्यात आले.

16:29 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे.. प्रकृती खालावत चालली असतानाही जरांगेंकडून उपचार घेण्यास नकार देण्यात येत आहे.आज जरांगें पाटलांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.. डॉक्टरांकडून सतत तपासणी सुरू आहे.. मात्र, जरागेंनी उपचार घेण्यास नकार दिलाय.. जरांगेना चालता येत नसल्याचं बघून उपस्थित महिलांना अश्रू अनावर झाले होते...

15:23 PM

तिरुपती बालाजी मंदिर प्रसाद प्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी अहवाल मागवला आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

13:57 PM

काँग्रेस पक्ष 'तुकडे तुकडे गँग', 'अर्बन नक्षल' चालवतात : मोदी

- काँग्रेसला पुन्हा संधी द्यायची नाही 
- झूट धोका और बेईमानी हे काँग्रेसचे काम 
- महाराष्ट्रात आपल्याला यांच्या धोखधाडीपासून दूर राहायचं आहे
- आजच्या काँग्रेसमध्ये देशभक्तीच्या आत्म्याने दम तोडला आहे
- विदेशात जाऊन देशविरोधी अजेंडे देश तोडण्याचे अजेंडे चालवत आहेत
- तुकडे तुकडे गँग आणि अर्बन नक्षल काँग्रेस चालवत आहे

13:55 PM

महाराष्ट्रात टेक्स्टाईल उद्योगासाठी वाव आहे : पंतप्रधान मोदी

- केवळ महाराष्ट्रात 7 हजार कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले
- वर्षभरात साडेसहा लाखांहून अधिक बांधवांना आधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत, त्यातून उत्पादकता वाढली असून त्यांना 15 हजारांचं ई व्हाऊचर देखील देण्यात आलंय
- एससी, एसटी, ओबीसी समाजातील मंडळींकडे मागील सरकारांनी दुर्लक्ष केले, पण काँग्रेसने या घटकांना जाणूनबुजून मागे ठेवलं
- मागासवर्गीय विरोधी मानसिकतेला आम्ही मागे टाकले
- विश्वकर्मा योजनेचा सर्वाधिक फायदा एससी एसटी ओबीसीला मिळाला आहे
- आता केवळ कारागीर न राहता उद्योजक बना, त्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत
- महाराष्ट्रात टेक्स्टाईल उद्योगासाठी वाव आहे
- महाविकास आघाडीने कापसाला शेतकऱ्यांची ताकद बनवण्यापेक्षा त्यांची उपेक्षा केली 
- मविआने केवळ भ्रष्टाचार केला 
- 2014 मध्ये फडणवीस सरकारने नांदगांव येथे टेक्स्टाईल पार्कची उभारणी केली होती 
- या टेक्स्टाईल पार्कमुळे कापसाला चांगला भाव मिळेल, या भागात 8 ते 10 हजार कोटींची गुंतवणूक होऊन हजारो रोजगार निर्मिती होईल

13:32 PM

काँग्रेसने केलेल्या गणपतीच्या अपमानाला आपल्याला उत्तर द्यायचं आहे: पंतप्रधान मोदी

- देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार आहे
- गणपती पूजेसाठी काँग्रेसचा विरोध
- टिळकांनी गणेशोत्सव देशाच्या एकतेसाठी सुरू केला
- काँग्रेसला गणेश पूजेचीही चीड आहे
- मी गणेश पूजेसाठी गेलो तेव्हा त्यांची तुष्टीकरणाचं काम सुरु झालं
- काँग्रेस सरकारने कर्नाटकात गणपतीलाही जेलमध्ये टाकलं
- महाराष्ट्र गणपतीची आराधना करत होता
- देश गणपतीच्या अपमानवरून संताप आहे
- काँग्रेसचे नेते यावर बोलले नाही
- याला आपल्याला उत्तर द्यायचं आहे
- आपण सर्व सोबत मिळून महाराष्ट्राचा गौरव वाढवू, स्वप्न पूर्ण करू

13:32 PM

विश्वकर्मा योजनेमध्ये 20 लाख लोकांना जोडलं : पंतप्रधान मोदी

- वर्षांपूर्तीसाठी आम्ही वर्धेला निवडलं कारण हा कार्यक्रम केवळ शासकीय नाही तर हजारो वर्षांपासूनच्या कौशल्याला वापरण्याचं मध्यम आहे
- भारतीय ज्ञान विज्ञानाला सुतार लोहार सोनार कुंभार मूर्तिकार हे घटक घरोघरी पोहोचवायचे
- गुलामीच्या काळात इंग्रजांनी हे टॅलेंट संपविण्यासाठी अनेक प्रयत्न केले
- गांधींनी इथूनच ग्रामीण उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले 
- मात्र स्वतंत्र उत्तर काळातील सरकारांनी या गोष्टीला महत्त्व न देता विश्वकर्मा समाजाची उपेक्षा केली
- आमच्या सरकारने या परंपरागत कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विश्वकर्मा योजना आणली
- सन्मान, सशक्तीकरण आणि समृद्धी हे विश्वकर्मा योजनेचं उद्दिष्ट
- देशातील 700 हुन अधिक जिल्हे आणि अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायती अभियानाला गती देतायत
- वर्षभरात 20 लाख लोकांना जोडलं गेलं, 8 लाख कामगारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आलं 

13:29 PM

गांधी, विनोबांची भूमी विकसित भारत संकल्पनेला बळ देणारी : पंतप्रधान मोदी

- दोन दिवसांपूर्वी आपण विश्वकर्मा पूजा उत्सव साजरा केला
- आज वर्ध्याच्या पवित्र भूमीवर विश्वकर्मा योजनेच्या यशस्वितेला साजरे करत आहोत
- याच दिवशी 1942 मध्ये महात्मा गांधींनी अस्पृश्यतेच्या विरोधात अभियान सुरू केलं होतं 
- महात्मा गांधी आणि विनोब भावेंची भूमी विकसित भारत संकल्पबेला बळ देणारी
- बापूंच्या प्रेरणा आमच्या संकल्पनेला सिद्धीस नेण्याचं माध्यम बनो
- आज अमरावतीत पीएम मित्र पार्कचा शिलापूजन झालं
- आपणल्यया सर्वाचं अभिनंदन

13:29 PM

75 हजार लोकांना विश्वकर्मा योजनेअंतर्गत डिजिटल आयडी, डिजिटल स्किल सर्टिफिकेट प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विश्वकर्मा योजनेतील एक लाख लाभार्थ्यांना डिजिटल आयडी, डिजिटल स्किल सर्टिफिकेट देण्यात आले. 75 हजार लाभार्थ्यांना डिजिटल स्वरूपात कर्ज मंजूर करण्यात आले.

13:23 PM

मोदी पंतप्रधान असल्याने 21 वं शतक भारताचं असेल : मुख्यमंत्री शिंदे

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशाच्या प्रगतीचा आलेख तिप्पटीने वाढेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्ध्यातील कार्यक्रमामधील भाषणात व्यक्त केला. "देशात सत्तेवर नरेंद्र मोदी असल्याने आपला देश जगातील सर्वात ताकदवान देशांच्या यादीत भारत वरच्या ठिकाणी असेल. 21 वं शतक हे भारताचे असेल," असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला. 

13:21 PM

मोदी हैं विकास की नई मिसाल : मुख्यमंत्री शिंदे

"मोदींचे दस साल बेमिसल, मोदी हैं विकास की नई मिसाल," अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत वर्धा येथे पार पडलेल्या कार्यक्रमाच्या भाषणात दिली. तसेच यावेळेस मुख्यमंत्र्यांनी, "मोदी सरकार के सौ दिन तो झांकी हैं, अभि बहोत बाकी हैं", अशीही घोषणा दिली.

13:17 PM

नाशिकमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची महाविद्यालयाच्या वसतिगृहात आत्महत्या

- अस्मिता संजय पाटील (वय 18) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

- अस्मिताने महाविद्यालयाच्या वस्तीगृहाच्या तिसऱ्या मजल्यारील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

- आडगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झालं असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

- इंजीनियरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अस्मिताने आत्महत्या का केली त्याचे कारण समोर आलेलं नाही.

12:48 PM

सुप्रीम कोर्टाचं युट्यूब चॅनेल हॅक; होम पेजवर क्रिप्टो करन्सीची पोस्ट

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा युट्यूब चॅनेल हॅक झाल्याचे दिसत आहे. सध्या त्यावर XRP नावाच्या क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करणारे व्हिडिओज दाखवले जात आहेत. ही एक अमेरिकी कंपनी आहे. कंपनीची मालकी रिपल लॅब्सकडे आहे. सर्वोच्च न्यायालय संविधान पीठांसमोर असलेल्या प्रकरणांच्या सुनावणी तसेच सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांसाठी युट्यूबचा वापर करून सुनावण्या थेट प्रसारित करते. अलीकडेच, आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील बलात्कार आणि खून प्रकरणातील सुओ मोटो प्रकरणाच्या सुनावण्या युट्यूबवर थेट प्रसारित करण्यात आल्या होत्या. हॅकर्सनी पूर्वीच्या सुनावणींचे व्हिडिओ प्रायव्हेट केले असल्याचे दिसत आहे. सध्या हॅक झालेल्या चॅनेलवर "Brad Garlinghouse: Ripple Responds To The SEC's $2 Billion Fine! XRP PRICE PREDICTION" या नावाच्या एक ब्लँक व्हिडिओचे थेट प्रक्षेपण केलं जात आहे.

12:44 PM

साडेसहा लाख कुटुंबाचं चित्र बदलणार : फडणवीस

वर्ध्यामधील कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आर्य चाणक्य योजना, महिला स्टार्टअप योजना सुरू होत असल्याने आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे. आज एका कार्यक्रमातून साडेसहा लाख कुटुंबाचं चित्र बदलणार आहे, असंही फडणवीस म्हणाले. अमरावतीत टेक्सटाईल पार्क देण्याची मागणी पंतप्रधानांना केली, त्यांनीही लगेच मंजुरी दिल्याचं फडणवीसांनी भाषणात सांगितलं. पंतप्रधानांच्या नेतृत्वात लखपती दीदी योजना सुरु करण्यात आली आहे. तसेच सोयाबीनला वाढवून भाव देण्याचं कामही मोदींमुळे झाल्याचं फडणवीसांनी नमूद केलं. या कामांसाठी फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.

12:41 PM

अजित पवारांनी मानले मोदींचे आभार

वर्ध्यामधील कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. "पंतप्रधानांनी वेळ दिला त्यासाठी 13 कोटी जनतेकडून धन्यवाद देतो. पंतप्रधानांना जन्मदिनाच्याही शुभेच्छा देतो. महाराष्ट्र शासनाने लोकोपयोगी योजना सुरू केल्या आहेत. विनोबा भावे, महात्मा गांधींचं वास्तव्य असलेल्या भूमीला वंदन करतो," असं अजित पवार म्हणाले.

11:57 AM

'अमित ठाकरे, इथून निवडणूक लढा! फक्त उमेदवारी अर्ज अन् विजायाचं पत्र घ्यायला यावं लागेल'

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यानी अमित ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी या पत्रामधून साद घालण्यात आली आहे. अमित ठाकरे यांनी नाशिकच्या पूर्व मतदार संघातून उमेदवारी स्वीकारावी अशी मागणी करण्यात आली आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात फक्त उमेदवार अर्ज आणि विजयाचे पत्र घ्यायला यावे लागेल असा विश्वास पत्रातून व्यक्त केला आहे. नाशिकच्या प्रसाद सानप यांनी अमित ठाकरेंना हे पत्र लिहिलं आहे.

 

11:15 AM

पंतप्रधान मोदी नागपूर विमानतळावर दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळावर दाखल झाले आहेत. नागपूरवरून थोड्याच वेळात पंतप्रधान वर्धा येथील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त यांनी पंतप्रधान यांचं स्वागत केलं. निवडक भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते सुद्धा स्वागतासाठी उपस्थित होते.

11:15 AM

वर्धेतील इंडिया आघाडीचे पदाधिकारी नजरकैदेत

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त पोलिसांची खबरदारी
- इंडिया आलायन्सच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत मोदींना विचारले होते काही प्रश्न
- आज मोदींच्या दौऱ्यात आंदोलन होऊ नये म्हणून पोलीस सतर्क
- गुरुवारी रात्री पासून सर्व पदाधिकारी नजर कैदेत
- मोदींचे वर्धेत आगमन होताच त्यांना पोलीस मुख्यालय नेणार असल्याची माहिती
- किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, सुदाम पवार, तुषार उमाळे, नितेश कराळे,आसिफ यांच्यासह इतर नेते नजरकैदेत

11:13 AM

केजरीवाल आजपासून निवडणूक प्रचारात

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल शुक्रवारपासून हरियाणामध्ये निवडणूकीच्या प्रचारात उतरत आहेत. त्याची सुरुवात यमुनानगरच्या जगधारी विधानसभेपासून होईल. पहिल्या टप्प्यात केजरीवाल यांचा निवडणूक प्रचार पुढील काही दिवस 11 जिल्ह्यांतील 13 विधानसभांमध्ये चालणार आहे. त्याचा संपूर्ण कृती आराखडा तयार आहे. जगाध्रीनंतर डबवाली, रानिया, भिवानी, मेहम, पुंद्री, कलायत, रेवाडी, दादरी, असंध, बल्लभगड आणि बद्र येथे रोड शो आणि पथसंचलनातून लोक आपच्या बाजूने मते मागताना दिसतील.

11:13 AM

मंत्रालयात तातडीची बैठक

मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्याच्या निर्देशानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली महत्वाची बैठक. मंत्रालयात आज दुपारी 4 ते 5.30 वा दरम्यान होणाऱ्या बैठकीत या तिन्ही समाजांच्या प्रलंबित विषयाचा आढावा घेतला जाणार. सकल मराठा समाजाकडून हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान गॅझेट यांसंदर्भात करण्यात आलेल्या मागणीबाबत मंत्री शंभूराज देसाई हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत. 

09:55 AM

मुंबईतील 'या' 3 जागांसाठी महायुतीमधील 3 पक्ष आग्रही

कुर्ला, वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिम या तीन विधानसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे तिन्ही आग्रही असल्याची सूत्रांची माहिती

काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट त्यांच्यामध्ये एकूण सहा जागांवर रस्सीखेच
1)भायखळा
2)कुर्ला
3) घाटकोपर पश्चिम
4)वर्सोवा
5) जोगेश्वरी पूर्व
6) माहीम

09:51 AM

जालन्यात मोसंबी ट्रक आणि बसचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

जालना-बीड मार्गावर बस आणि मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला आहे. अंबड पासून 10 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.  बस आणि ट्रक मध्ये जखमींना स्थानिक नागरिक बाहेर काढलं आहे. बसमध्ये 25 ते 30 प्रवासी प्रवास करत होते. मठ तांडा येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींना उपचारासाठी अंबड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

09:45 AM

मुख्यमंत्री वयोश्री योजनेत सर्वाधिक अर्ज पुण्यातून

मुख्यमंत्री वयोश्री योजनेत राज्यात 10 लाख ज्येष्ठांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यातील आहेत. पुण्यातील जवळपास अडीच लाख ज्येष्ठ नागरिकांनी भरला वयोश्री योजनेचा अर्ज भरला आहे. समाज कल्याण विभागाकडून अर्जाची छाननी सुरु झाली आहे. ज्येष्ठ नागरिकाला बचत गटातून थेट 3 हजार रुपयाचं वितरण होणार आहे. 

09:01 AM

कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरुपदी केलेली नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाला अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक डॉ. अजित रानडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने सोमवारपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी न करण्याचे निर्देश देऊन डॉ. रानडे यांना तात्पुरता दिलासा दिला आहे.

08:26 AM

...म्हणून पुण्यात पॅराग्लायडिंग, ड्रोन, हेलिकॉप्टर उड्डाण बंदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौराच्या पार्श्वभूमीवर 26 आणि 27 सप्टेंबर रोजी खाजगी अवकाश उड्डानांना मनाई करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पॅराग्लायडिंग, हॉट बलून सफारी, ड्रोन आणि इतर खाजगी हेलिकॉप्टर आणि विमान अवकाश उड्डाणांवर बंदीचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

07:31 AM

नागपूरमधील गणपती विसर्जन मिरवणुकीत 11 महिला भाजल्या

उमरेडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवस्नेह गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत फटाक्यामुळे 11 महिला भाजल्याची दुर्घटना घडली आहे. विसर्जन मिरवणुकीत फटाके आतिषबाजी सुरू असताना ही दुर्घटना घडली. गर्दीत असुरक्षित पद्धतीने ही फटाक्यांची ही आतिषबाजी सुरू असताना दुर्घटना घडली. काही महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. फटाक्यांची मोठी आतिषबाजी करताना परवानगी घेतली नव्हती व सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनाही करण्यात आल्या नसल्याचही माहिती पुढे येत आहे.

07:28 AM

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतून 300 मोबाईल चोरीला

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीमध्ये चोरीच्या अनेक घटना असून गणपती मिरवणुकीदरम्यान 300 जणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्वाधिक मोबाईल चोरीच्या घटना विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्यात. नाशिकमध्ये पकडलेल्या मोबाईल चोरट्यांच्या टोळीकडून हजारोच्या संख्येत मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

07:26 AM

बदलापूर अत्याचार प्रकरणात चार्जशीट दाखल

एसआयटीकडून कल्याण सत्र न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. एसआयटीच्या प्रमुख आयपीएस अधिकारी आरती सिंग यांनी ही पुष्टी केली आहे. दोन गुन्ह्यांच्या दोन स्वतंत्र चार्जशीट दाखल करण्यात आल्या आहेत. यात विविध तांत्रिक पुरावे, जबाब समाविष्ट असलेली 500 पेक्षा जास्त पानांची चार्जशीट दाखल केली आहे. या सोबतच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील देण्याचीही मागणी एसआयटीने राज्य सरकारकडे केली आहे. 

07:22 AM

श्रीकांत शिंदेंच्या जनसंवाद यात्रेचा आज तिसरा टप्पा

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जनसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा आज पार पडत असून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत आजी - माजी खासदार, आमदार, नगरसेवक, शिवसेना विभाग स्तरावरील पदाधिकारी, विधानसभा स्तरावरील पदाधिकारी, उपविभाग स्तरावरील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

07:21 AM

पुण्यातून आता या दोन देशांसाठी थेट फ्लाइट

पुणे विमानतळावरून दोन नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहेत. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासासाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे येत्या 27 ऑक्टोबर पासून सुरु होत आहेत. पुणे-दुबई-पुणे आणि पुणे-बँकॉक-पुणे अशा दोन मार्गांवर आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होत आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवर पोस्ट करून पुण्यातून दोन नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होत असल्याचे जाहीर केला आहे.

07:21 AM

नांदेडमध्ये काँग्रेसची आढावा बैठक

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा काँग्रेसचे रमेश चेन्निताल घेणार आहे. नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासह अनेक नेते या आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 12 वाजता टिळक भवनमध्ये ही बैठक पार पडणार आहे.

 

07:19 AM

महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक

दुपारी तीन वाजता बीकेसी सोफिटल येथे महाविकास आघाडी जागा वाटप चर्चा बैठक होणार.

07:17 AM

महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय अमित शाह घेणार -

- 24 आणि 25 सप्टेंबर रोजी अमित शाह महाराष्ट्रात

- 24 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरच्या रामा हॉटेलमध्ये होणार महायुतीची अत्यंत महत्त्वाची बैठक

- संभाजीनगरला होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत होणार महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब

- मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह निवडक नेत्यांची अमित शाहांसोबत बैठक

- दोन दिवसीय दौऱ्यात शाह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांशीही शाह संवाद साधणार

07:11 AM

सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे यांचं मतदारांना पत्र

22 सप्टेंबर रोजी सिनेटची निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीत ठाकरेंची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची थेट लढत होणार आहे. मागील 2 निवडणुकांप्रमाणेच, यंदाही युवासेनेने सर्व 10 उमेदवार निवडणुकीत उभे केले आहेत आणि मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की तुमचे प्रेम आणि तुमची मते आम्हाला आशीर्वाद म्हणून नक्की द्या. सिनेट निवडणुकीत मतदान करताना तुम्ही भावी पिढ्यासाठी योग्य निर्णय घेण्याची विनंती आदित्य ठाकरे यांनी सिनेट मतदारांना केली आहे. 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More