Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 22 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
22 September 2024
11:39 AM

288 जागांवर लढण्याची आमची तयारी - संजय राऊत

 

Sanjay Raut, Sharad Pawar & Vijay Wadettiwar : आगामी विधानसभेत 288 जागांवर लढण्याची उद्धव ठाकरे पक्षाची तयारी आहे, असं मोठं विधान खासदार संजय राऊतांनी दिलीय. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये वादाचा ठिणगी पडण्याची शक्यताये. श्रीगोंदा मतदारसंघात उद्धव ठाकरेंकडून उमेदवार घोषित केल्याची माहिती आहे.. त्यावरून शरद पवारांनी कुणीही उमेदवारी  घोषित करू नये असा सल्ला दिलाय.. तर त्यावरून आता संजय राऊतांनी मोठं विधान केलंय.. श्रीगोंदाबाबत शरद पवारांकडं चुकीची माहिती असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. दरम्यान शरद पवारांची भूमिका योग्य असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. 

11:07 AM

मविआचं जागावाटप 10 दिवसांत पूर्ण होणार - शरद पवार

 

Sharad Pawar : मविआचं जागावाटप येत्या 10 दिवसात पूर्ण होणार असल्याचे संकेत शरद पवारांनी दिलेत.. तिन्ही पक्ष एकत्र बसून जागावाटपाचा निर्णय 10 दिवसात पूर्ण करणार असल्याचं शरद पवार म्हणालेत.. त्यामुळे मविआचं जागावाट 10 दिवसात फिक्स होणार आहे. जागावाटप पूर्ण झाल्यानंतर तिनही पक्ष त्यांच्या वाट्याला आलेल्या जागांवर कोण उमेदवार देणार यावर निर्णय घेणार असल्याचं शरद पवार म्हणालेत... तसेच आम्ही इच्छुक उमेदवारांबाबत अभ्यास सुरू  असल्याची माहिती त्यांनी दिलीय.. 

10:49 AM

पुण्याला यंदा 'आर्मी डे परेड'चा मान

 

Pune Army Day : भारतीय लष्कराच्या स्थापना दिवसानिमित्त साज-या केल्या जाणा-या प्रतिष्ठेच्या ‘आर्मी डे परेड’चा मान पुण्याला मिळाला आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे येत्या 15 जानेवारीला पुण्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.. या कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर 15 जानेवारी 1949 रोजी भारतीयलष्कराची स्थापना  झाली होती. या दिवशी फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांनी भारतीय लष्कराचे पहिले प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून 15 जानेवारीला आर्मी डे साजरा करण्यात येतो.

10:34 AM

अमरावतीत भटक्या कुत्र्यांची दहशत

 

Amravati Dogs : अमरावती शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय.. शहरात रोज 70 जणांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले होत असल्याची नोंद करण्यात आलीये.. धक्कादायक बाब म्हणजे एप्रिल ते जुलै या 4 महिन्यात 6 हजार 348 मोकाट कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतलाय.. या भटक्या कुत्र्यांमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालेय.. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडतांना भिती वाटत आहे. अमरावती महानगरपालिकाने तात्काळ यावर उपाय योजना कराव्या अशी मागणी नगरिकांनी केलीये.. 

09:33 AM

सुजय विखेंची कधीही भेट झाली नाही - निलेश लंके

 

Baramati Nilesh Lanke : सुजय विखे पाटलांची कधीही भेट झाली नाही आणि भविष्यातही होणार नाही, असं विधान खासदार निलेश लंकेंनी केलंय.ज्याच्याविरोधात निवडणूक लढवतो त्याच्यासोबत कधीही हातमिळवणी करत नसतो, असं विधानही लंकेंनी केलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:56 AM

हिंगोलीत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

 

Hingoli : विधानसभेच्या तोंडावर  हिंगोलीत काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय...सातव आणि भाऊराव पाटील गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालंय.. काँग्रेसचे मराठवाडा प्रभारी कुणाल चौधरी यावेळी सत्कार समारंभात जोरदार घोषणा देण्यात आल्यात तर शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांना सातव गटातील कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केलीय.. त्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालंय.. त्यानंतर भाऊराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातलाय..  

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:41 AM

मराठा आंदोलकांकडून जालना आणि परभणी बंदची हाक

 

Parbhani & Jalna Close : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालना आणि परभणी बंदची हाक देण्यात आलीय. मराठा आंदोलकांकडून आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय.. मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलंय. जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे.

08:32 AM

पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड

 

Pune : पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागातील कसबा पेठेत गाड्यांची तोडफोड करण्यात आलीय. दहशतवाद माजवण्यासाठी मागील काही दिवसांपासून गाड्यांची तोडफोड केली जातेय. रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या गाड्यांचा काचा अज्ञात व्यक्तींनी फोडल्यात. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

07:54 AM

बारामतीत सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर

 

Baramati : बारामतीत सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आलेत.. शहरात अनेक ठिकाणी सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री असे मोठं मोठे बॅनर लावण्यात आलेत..  तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार असे बॅनर झळकलेत.. त्यामुळे सुळे आणि युगेंद्र यांच्या बॅनरची आता राज्यात चर्चा होतेय.. 

07:51 AM

मराठा आंदोलक आझाद मैदानात धडकले

 

Mumbai Maratha Andolak : मराठा आंदोलक मुंबईतील आझाद मैदानावर धडकलेत.. मराठा आरक्षणाच्या लढ्याला एक वर्ष उलटुनही अजूनपर्यंत सरकारने कोणत्याही प्रकारचा निर्णय दिलेला नाही. त्यामुळे मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणा देत आरक्षणाची मागणी लावून धरली.. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची मागणी त्यांनी लावून धरलीय.. त्यानंतर  शंभुराज देसाई यांनी आंदोलकांची भेट घेऊन आज त्यांची भेट घडवून आणण्याचं आश्वासन दिलंय.. त्यामुळे आज मराठा आंदोलक आणि मुख्यमंत्र्यांची भेट होण्याची शक्यता आहे..

 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More