Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Prajakta Tanpure : प्राजक्त तनपुरेंची PMLA कोर्टात हजेरी

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 20 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Prajakta Tanpure : प्राजक्त तनपुरेंची PMLA कोर्टात हजेरी
LIVE Blog
20 September 2024
18:51 PM

प्राजक्त तनपुरेंविरोधात ईडीकडून चार्जशीट दाखल, 15 दिवसांनंतर पुढील सुनावणी

 

Prajakta Tanpure : शरद पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरेंची PMLA कोर्टात रुटीन सुनावणी झाली...राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री प्रकरणी ईडीच्या विशेष कोर्टात याप्रकरणी रुटीन सुनावणी सुरूये...याप्रकरणी ईडीने चार्जशीट दाखल केलं असून PMLA कोर्टात सुनावणी सुरू झालीये...यावेळी तनपुरे उपस्थित होते...आता पुढील सुनावणी 15 दिवसांनंतर होणारे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

17:35 PM

रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोस्टल रोड वाहतुकीसाठी बंद 

 

Mumbai Coastal Road : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे.. उद्यापासून कोस्टल रोड सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला असणार आहे.  तर रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत रोड वाहतुकीसाठी बंद असणार आहे. गणेशोत्सवात रोड 24 तास खुला करण्यात आला होता. त्यानंतर आता सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत रोड वाहतुकीसाठी खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

16:16 PM

जरांगेंची प्रकृती खालावली, डॉक्टरांकडून सतत तपासणी, मात्र जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

 

Manoj Jarange Health Issue : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे.. प्रकृती खालावत चालली असतानाही जरांगेंकडून उपचार घेण्यास नकार देण्यात येत आहे.आज जरांगें पाटलांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.. डॉक्टरांकडून सतत तपासणी सुरू आहे.. मात्र, जरागेंनी उपचार घेण्यास नकार दिलाय.. जरांगेना चालता येत नसल्याचं बघून उपस्थित महिलांना अश्रू अनावर झाले होते.

 

 

14:17 PM

विधानसभेसाठी अजित पवारांचं मुस्लीम कार्ड?

 

Ajit Pawar : अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला सर्वाधिक जागा देणार असल्याची माहिती सुत्रांकडून झी २४ तासला मिळालीय. ⁠जागा वाटपात मिळणाऱ्या एकूण जागांपैकी १० टक्के जागांवर मुस्लीम उमेदवार देणार असून अल्पसंख्याक उमेदवार देऊन मताधिक्य बळकट करण्याची तयारी अजित पवार पक्षांची सुरु आहे. मुंबईत चार आणि MMR रिजनमध्ये  १ अश्या पाच जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून  मुस्लिम उमेदवार दिसणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. मुंबईत जास्तीत जास्त मुस्लीम उमेदवार देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात येणारेय. साधारणत: बीड शहर, मालेगाव, धुळे आणि जळगाव अशा विधानसभा मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून  मुस्लिम उमेदवार असणारेय. 

13:48 PM

तिसरी आघाडी सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी - संजय राऊत

 

Sanjay Raut On Third Front : तिस-या आघाडीवरुनही खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय. तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते...तिसरी आघाडी तयार करून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवता येईल  यासाठी काम करतात असं राऊत म्हणालेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13:30 PM

मनसे कार्यकर्त्यांचं अमित ठाकरेंना पत्र

 

Nashik : अमित ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक नाशिक पूर्व मतदारसंघातून लढवावी, अशी मागणी मनसे कार्यकर्त्यानं केलीय. नाशिकचे मनसैनिक प्रसाद सानप यांनी थेट अमित ठाकरेंना पत्र लिहिलंय. त्यांनी या पत्रातून अमित ठाकरेंना नाशिक पूर्वमधून निवडणूक लढण्याची साद घातलीय. अमित ठाकरेंना केवळ उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि विजयीपत्र घेण्यासाठी नाशिकला यावं लागेल, असा विश्वास या कार्यकर्त्यांनं व्यक्त केलाय. 

12:31 PM

पुरंदर मतदारसंघात मविआत वादाची ठिणगी?

 

Purandar constituency : पुरंदर मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये पुन्हा वादाची ठिकणी पडण्याची शक्यता आहे.. पुरंदरवरुन काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.. पुरंदरमध्ये सध्या काँग्रेसचे संजय जगताप हे विद्यमान आमदार आहेत. मात्र या मतदारसंघावर शरद पवारांच्या राष्ट्रावादीनं दावा सांगीतला असून माजी जिल्हाधिकारी संभाजी झेंडे यांनी या मतदारसंघातून लढण्याची तयारी दाखवलीये.. उमेदवारीसाठी त्यांनी सुप्रिया सुळे आणि पवारांचीही  भेट घेतलीये.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11:33 AM

मुंबईतील 6 जागांवर मविआत रस्सीखेच?

 

MVA : मुंबईतील 6 जागांवर मविआमध्ये रस्सीखेच सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. कुर्ला वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिम या तीन विधानसभा मतदार संघांवर काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीनं दावा केलाय.. तर भायखळा, जोगेश्वरी पूर्व आणि माहीम या तीन मतदार संघांवर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे.. त्यामुळे या 6 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11:02 AM

खासदार संजय राऊतांचा काँग्रेसवर हल्लाबोल

 

Sanjay Raut : संजय राऊतांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. काँग्रेसच्या जागा वाढण्यात ठाकरे पक्षाचा मोठा वाटा असल्याचं राऊतांनी म्हटलंय. इतकंच नाही तर  आत्मविश्वास वाढला म्हणून काँग्रेस एकटं लढणार का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय. 

10:29 AM

खासदार नरेश म्हस्केंची राहुल गांधींवर टीका

 

Naresh Mhaske : शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्क यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींना पत्र लिहलंय. या पत्रात  त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केलीय. आरक्षण रद्द करण्याची भाषा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? कोण तुम्ही? तुमची बौध्दिक उंची काय? कर्तृत्त्व काय? असे सवाल क खासदार नरेश म्हस्केंनी काँग्रेस खासदार राहुल गांधींकडे उपस्थित केलेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10:26 AM

काटोल मतदारसंघावरून मविआत पेच निर्माण होण्याची शक्यता

 

Nagpur :  नागपूरच्या काटोल मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुखांच्या मतदारसंघावर काँग्रेस नेत्यानं दावा केलाय. काँग्रेसचे दिवंगत नेते डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे पूत्र याज्ञवल्क्य जिचकार काटोलमधून इच्छुक आहेत. एकीकडे अनिल देशमुखांनी जोरदार तयारी सुरू केली असताना याज्ञवल्क्य यांनी काँग्रेसकडं उमेदवारी मागितलीय. त्यामुळे देशमुखांविरोधत मोठं अव्हान निर्माण झाल्याचं दिसतंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09:42 AM

वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांवर अन्याय - अंबादास दानवे

 

Ambadas Danve Letter : राज्यात वरिष्ठ महिला सनदी अधिका-यांवर अन्याय होत असल्याची तक्रा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलीये.. याबात त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय.. मुख्य सचिव सुजाता सौनिकांवर राजीनाम्यासाठी दबाव टाकला जातोय. तसंच IASव्ही राधा आणि IA कुंदन यांनाही अडगळीत टाकल्याचा आरोप त्यांनी पत्रातून केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:51 AM

गणेशोत्सव मिरवणुकीत फटाक्यांमुळे दुर्घटना

 

Nagpur Blast : नागपूर जिल्ह्यातील उमरेड मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत फटाक्याच्या आतिषबाजी मुळे 11 महिला भाजल्याने जखमी झाल्या..काल रात्री नऊ वाजताच सुमारास उमरेड मधील इतवारी रोडवरील श्रीकृष्ण मंदिर जवळ घटना घडली..शिव स्नेह मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असताना मिरवणूक मार्गावरील एका निर्माणाधीन इमारतीवर फटाक्याची आतिषबाजी करण्यात येत होती.. मात्र त्यापैकी काही फटाके आग लावल्यानंतर वर न जाता खालच्या दिशेने गेले आणि मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या लोकांच्या अंगावर पडले... त्यामुळे 11 महिला भाजल्या जखमी पैकी सात महिलांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले... तर चार महिलांना उमरेड मधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:38 AM

मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस

 

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. जरांगेंची प्रकृती खालावलीय. जिल्हा परिषद डॉक्टरांच्या पथकानं काल जरांगेंची दिवसभरात 3 वेळा तपासणी केली. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी म्हटलंय. मात्र, जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:33 AM

राज ठाकरेंच्या अटक वॉरंटवर आज सुनावणी

 

Latur Raj Thackeray : लातूरच्या निलंगा न्यायालयात राज ठाकरेंच्या अटक वॉरंटवर आज सुनावणी होणारेय. 16 वर्षांपूर्वी  म्हणजेच 2008 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एसटी बसची जाळपोळ आणि तोडफोड केली होती. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये राज ठाकरेंवरही गुन्हा दाखल होता. राज ठाकरेंना प्रत्येक तारखेला निलंगा न्यायालयात येणे शक्य नसल्याने हे प्रकरण वर्ग करण्याची विनंती त्यांच्या वकिलांनी केली होती. त्यावेळी त्यांना जामीनही दिला होता. मात्र तारखेला हजर राहात नसल्यामुळे न्यायालयाने पुन्हा राज यांना अटक वॉरंट जारी केले होतं. यासंदर्भात आज सुनावणी होणारेय. यावेळी राज ठाकरे उपस्थित राहणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:20 AM

जागावाटपाबाबत मविआची आज मुंबईत बैठक

 

MVA Meeting : जागावाटपासंदर्भात मविआची आज मुंबईतल्या बीकेसीत बैठक होतेय. तीन दिवस बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र काल काँग्रेसने राज्यभर पुकारलेल्या आंदोलनामुळे काँग्रेस नेते बैठकीला उपस्थित नव्हते त्यामुळे  ठाकरे पक्ष आणि शरद पवार पक्षाची बैठक झाली...संजय राऊत, अनिल देसाई, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड बैठकीला उपस्थित होते..  ठाकरे पक्ष आणि शरद पवार पक्षाची बैठक संपल्यानंतर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर बैठक झाली ... अद्याप 6-7 जागांवर तिढा कायम असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय . त्यामुळे आजच्या बैठकीत या जागांचा तिढा सुटणार का याकडे लक्ष आहे. 

07:41 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वर्धा दौरा

 

Wardha Prime Mininster Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा दौ-यावर आहेत. पी.एम.विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रमात ते सहभागी होणारेत. यावेळी PM विश्वकर्मा योजनतेली लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप केलं जाणारेय.तर अमरावतीच्या PM टेक्सस्टाईल पार्क, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचाही शुभारंभ केला जाणारेय. या ठिकाणी विश्वकर्मा योजनेतील यशस्वी गाथा दाखवणारे प्रदर्शन सुद्धा आयोजित करण्यात आलंय. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त वाहतूक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी वर्धा शहर आणि शहरालगत असलेल्या शाळा, कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07:38 AM

आकाशातून पडलं विचित्र उपकरण

 

Nashik : नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसूलमध्ये आकाशातून एक विचित्र उपकरण पडलंय.. काल संध्याकाळी हरीश रोकडे  यांच्या शेतात हे उपकरण पडलं.. या उपकरणातून लाल रंगाचा प्रकाश आणि आवाज येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.. हे यंत्र कोरियन बनावटीचं असल्याचा दावा करण्यात आलाय.. तलाठी आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर हे यंत्र तपासणीसाठी पाठवण्यात आलंय..  

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More