Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 04 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
04 September 2024
22:10 PM

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये  सचिन खिलारीची शॉटपूट F46 प्रकारात रौप्य पदकाची कमाई 

 

Sachin Khilari Win Silver Medal In Paralimpic Shot Put : सांगलीच्या पठ्ठ्याने इतिहास रचलाय.. पॅरिस पॅरालिम्पिकच्या सातव्या दिवशी सचिन खिलारीने पुरुषांच्या शॉटपुट F46 प्रकारात रौप्य पदक जिंकलंय.. सचिनच्या या पदकासह भारताच्या पदकांची संख्या 21 झालीये..या रौप्य पदकासह सचिन 40 वर्षांत पॅरालिम्पिक शॉट-पुट पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 1984 मध्ये भारताने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये पहिले पदक जिंकले होते.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

21:02 PM

ST कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

 

ST Employees : एसटी कर्मचा-यांच्या संपावर सर्वात मोठी बातमी.. एसटी कर्मचा-यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे.. एसटी कर्मचा-यांच्या मुळ पगारात साडे सहा हजार रुपयांची वाढ करण्यात आलीय... एसटी कर्मचा-यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली.. या बैठकीत एसटी कर्मचा-यांच्या विविध मागण्या मान्य करण्यात आल्या.. कर्मचा-यांनी मुळ पगारात पाच हजार रुपयांची वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र महायुती सरकारने एसटी कर्मचा-यांच्या मुळ वेतनात साडे सहा हजार रुपयांची वाढ केली आहे... ऐन गणेशोत्सवाआधी एसटी कर्मचा-यांनी संप पुकारल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले होते.. त्यासोबतच नोकरदार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातल्या प्रवाशांचेही मोठे हाल झाले होते. मात्र एसटी कर्मचा-यांनी संप मागे घेतल्याने सामान्यांना मोठा दिलासा मिळालाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

20:33 PM

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खूशखबर !, उद्यापासून ते 19 सप्टेंबरपर्यंत टोलमाफी

 

Toll waiver for Ganesha devotees going to Konkan : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी मोठी बातमी... कोकणात जाणा-या गणेशभक्तांना राज्य सरकारकडून टोलमाफी जाहीर करण्यात आलीय.. कोकणात जाणा-या गणेशभक्तांना 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलाय.. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग तसंच मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.

20:15 PM

ST कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलनामुळे कोट्यवधींचं नुकसान

 

Crore Rupees Revenue Loss By ST Due To Strike : एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. संपाच्या दुस-या दिवशी एसटीचा सुमारे 22 कोटी रुपयांचा महसूल बुडाला. तर राज्यभरातील 251 पैकी 94 एसटी आगार पूर्णपणे बंद होते. त्याचवेळी दिवसभरात सुमारे 70 टक्के वाहतूक बंद होती. विशेष म्हणजे काल संपाच्या पहिल्या दिवशी अंदाजे 14 कोटींचं एसटीचं नुकसान झालंय. एसटीच्या 11 कामगार संघटनांच्या कृती समितीनं संप पुकारलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

19:33 PM

'जनता वाऱ्यावर आमदार नाचण्यात मग्न', विजय वडेट्टीवारांची संदीप धुर्वेंवर टीका

 

Vijay Wadettiwar on BJP MLA Sandip Dhurve  : यवतमाळच्या जनतेला वा-यावर सोडून भाजप आमदार नाचण्यात मग्न असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय...यवतमाळमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय...अशा भयानक स्थितीत जिल्ह्यातील भाजप आमदार संदीप धुर्वे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभानपणे नाचत असल्याची टीका वडेट्टीवारांनी केलीय...त्यांनी यासंदर्भात व्हिडीओ ट्वीट केलाय...त्याचबरोबर झोपी गेलेले मुख्यमंत्री, श्रेय लाटण्यात व्यस्त असलेले दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणे सोडून भाजप आमदार संदीप धुर्वे हे काय करताय? असा सवालही वडेट्टीवारांनी विचारलाय...

 

19:12 PM

शक्तिपीठ महामार्गाला ब्रेक?

 

Shaktipeeth Mahamarg : महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तिपीठ महामार्गाला अखेर ब्रेक लागण्याची शक्यता आहे...शक्तिपीठ माहमार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येतेय...शेतक-यांचा वाढता विरोध लक्षात घेता आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सावध भूमिका घेतल्याची चर्चा आहे...12 जिल्ह्यांतून जाणारा शक्तिपीठ महामार्ग वादाच्या भोव-यात अडकल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय...

18:33 PM

'उदगीरला जिल्ह्याचा दर्जा द्यावा', मंत्री संजय बनसोडेंची मागणी

 

Sanjay Bansode on Udgir District : उदगीर जिल्हा निर्मितीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिलंय. उदगीरमध्ये आज बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळयात मंत्री संजय बनसोडेंनी उदगीरला जिल्ह्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली. या मागणीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकार बनसोडेंच्या पाठिशी असल्याचं म्हटलंय. तर या मागणीकडं लक्ष देणार, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिलीय. त्यामुळे उदगीरकरांची अनेक वर्षांची मागणी मान्य होण्याची शक्यता आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

18:09 PM

वडगाव शेरीच्या जागेवरून महायुतीत वादाची शक्यता 

 

Disputes On Vadgaon Seats In Mahayuti : पुण्यातील वडगाव शेरीच्या जागेवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे...राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत...तर भाजपनंही या जागेवर दावा केलाय...भाजपच्या पदाधिका-यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासमोर आपली भूमिका मांडली...वडगाव शेरीची जागा भाजपला मिळाली नाही तर विधानसभा निवडणुकीत काम करणार नसल्याचं भाजप पदाधिका-यांनी स्पष्ट केलं...यावेळी पंकजा मुंडेंना निवेदनही देण्यात आलं...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17:32 PM

'ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन बेकायदेशीर',आंदोलनावर औद्योगिक न्यायालयाचे ताशेरे

 

Industrial Court Slams ST Employees Strike : एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाबाबत एक ब्रेकिंग न्यूज... औद्योगिक न्यायालयानं एसटी कर्मचा-यांचं कामबंद आंदोलन बेकायदेशीर ठरवलंय.. संपात सहभागी झालेल्या 11 कर्मचारी संघटनांवर औद्योगिक न्यायालयानं कडक शब्दांत ताशेरे ओढलेत.. तसंच संपात झालेल्या कर्मचा-यांना तातडीनं कामावर परतण्याचे आदेशही दिलेत.. कामावर रुजू न झाल्यास या कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करा असे निर्देश न्यायालयानं एसटी महामंडळाला दिलेत.. तसंच कामावर परतल्यानंतर एसटीची प्रवासी वाहतूक सुरळीत झाली आहे का याचं चित्रिकरणही करण्याच्या सूचना महामंडळाला देण्यात आल्यात.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17:02 PM

'BJPचा सीएम होण्याचं स्वप्न 25 ते 30 वर्ष पूर्ण होणार नाही', विजय वडेट्टीवारांची टीका

 

Vijay Wadettiwar : भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रयत्न करत आहे. तो त्यांचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केलीय. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपसाठी कितीही प्रयत्न करू द्या, राज्यात सत्ता परिवर्तन होणारच, असा विश्वास काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय. भाजपचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न 25 ते 30 वर्ष पूर्ण होणार नाही, असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केलाय. तर वडेट्टीवारांनी संघाबद्दल बोलताना तारतम्य बाळगावं असा इशारा प्रसाद लाड यांनी दिलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

16:31 PM

ST कंत्राटी चालक नेमणार, ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे निर्णय

 

ST Bus will Hire Contract Drivers : एसटीची कंत्राटी पद्धतीने चालक भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध...एसटी कर्मचा-यांचा संपामुळं जाहीरात काढली...एसटी महामंडळाकडून जाहिरात प्रसिद्ध 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

16:05 PM

मनसे स्वबळावर निवडणूक लढणार- सूत्र

 

MNS : मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभेच्या जागा मनसे लढवणार असल्याची सूत्रांची माहिती... सर्व जागांचा आढावा घेण्यासंदर्भात मनसे पदाधिका-यांना राज ठाकरेंचे आदेश - सूत्र....महाविकास आघाडी आणि महायुती विरोधात मनसे कार्यकर्ते नाराज-सूत्र...चारही जिल्ह्यांकडे मनसेचं विशेष लक्ष, कोणाशीही युती मनसे करणार नसल्याचं सांगत कामाला लागण्याच्या सूचना - सूत्र

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

15:33 PM

अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल

 

Anil Deshmukh : अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल...'सीबीआयकडून तथ्यहीन गुन्हा दाखल... 'अशा धमक्या, दबावाला मी भीक घालत नाही'... अनिल देशमुख यांची 'एक्स'वर पोस्ट करुन टीका

15:10 PM

नुकसानीचे आजपासून पंचनामे सुरु होणार; धनंजय मुंडेंची माहिती

 

Dhananjaya Munde  : नुकसानचे पंचनामे आजपासून सुरू...लवकरच पंचनामे पूर्ण होणार...कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती परभणीतील नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

14:29 PM

पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात

 

Delhi Pooja Khedkar : पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र खोटे असल्याचा अहवाल दिल्ली पोलिसांनी दिल्ली कोर्टात दिलाय... दिव्यांग प्रमाणपत्रात पूजा खेडकरनं नाव बदलल्याचं अहवालात म्हटलंय.. 2022 - 2023 दरम्यान पूजा खेडकरनं खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचं दिल्ली पोलिसांनी अहवालात म्हटलंय... त्यामुळे पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात असल्याचं आता समोर आलंय..

बातमी पाहा - पूजा खेडकरची आता खैर नाही! दिल्ली पोलिसांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

13:42 PM

लाडका शेतकरी योजना लागू करा - रवी राणा

 

Amaravati Ravi Rana : लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडका शेतकरी योजना राज्यात लागू करा, अशी मागणी आमदार रवी राणांनी केलीय. सततच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यात शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडे रवी राणांनी लाडका शेतकरी योजना लागू करण्याची मागणी केलीय. या योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना मदतीचा हात द्या, असं त्यांनी म्हटलंय.

13:33 PM

गुन्हेगारांना लपण्यासाठी वर्षा सुरक्षित जागा - संजय राऊत

 

Sanjay Raut : राजकोट किल्ल्यावरील पुतला दुर्घटनेवरुन खासदार संजय राऊतांनी पुन्हा राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत.. शिल्पकार आपटे पळून गेला असेल तर त्याला सरकारनं मदत केली असावी असा दावा राऊतांनी केलाय.. तसंच पुतळ्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही राऊतांनी केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -  

12:47 PM

सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी - राज ठाकरे

 

Raj Thackeray : अतिवृष्टीमुळे विदर्भ, मराठवाड्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय... याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारकडे शेतक-यांसाठी मदतीची मागणी केलीये.. गणपतीच्या सणात शेतक-यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी राज ठाकरेंनी केलीये.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12:16 PM

सीएमपदाचा चेहरा बसून ठरवू - आदित्य ठाकरे

 

Aaditya Thackeray : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत तिन्ही पक्ष बसून ठरवू असं विधान आदित्य ठाकरेंनी केलंय... तिन्ही पक्षात जागावाटपावरून रस्खीखेच होणार असल्याचं ही ठाकरे म्हणालेत.. 

11:48 AM

राज्यातील 132 रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार

 

Maharashtra Railway Station : केंद्राच्या अमृत भारत रेल्वेस्थान योजने अंतर्गत राज्यातील 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे.  राज्यातील मुंबईसह अनेक स्टेशनचं रुपडं यामुळे पालटणार आहे.. कोट्यवधी रुपये खर्च करून स्टेशनचं नुतनीकरण करण्यात येणार... त्यामुळे आधी मुंबईसह राज्यातील स्टेशन कशी दिसतं होती आणि काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे स्टेशन कशी दिसणार याचे एक्सक्लुझीव फोटो झी 24 तासच्या हाती आलेत..

11:04 AM

शरद पवारांकडून नितीन गडकरींचं कौतुक

 

Sharad Pawar On Nitin Gadkari : राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळला यावर आता नितीन गडकरींनी मोठं विधान केलंय. स्टेलनेस स्टीलचा वापर केला असता तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता, असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. गडकरींनी जाणकारांचा सल्ला घेऊन मत व्यक्त केलं असावं, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिलीय. यावेळी त्यांनी गडकरींच्या कामाचंही कौतुक केलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10:55 AM

एसटी आंदोलनामुळे 251 पैकी 63 आगार पूर्णपणे बंद

 

ST Andolan Update : STकामगारांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे आज सकाळी 8 वाजेपर्यंत राज्यभरातील एसटीच्या 251 आगारांपैकी 63 आगार पूर्णपणे बंद होते..  73 आगारांमध्ये अंशत: वाहतूक सुरु होती.. तर 115 आगारांमधील वाहतूक  पूर्णपणे सुरळीत सुरु होती.. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका कोकणात गणेशोत्सवासाठी जाणा-या चाकरमान्यांना बसण्याची शक्यता आहे.. सुमारे 1 हजार बसेस मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून आज कोकणात रवाना होत आहेत. संपामुळे बाहेरच्या विभागातून तेवढ्या बसेस उपलब्ध न झाल्यास चाकरमान्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10:26 AM

राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान

 

State Rain Loss : राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय… एक आणि दोन सप्टेंबरला मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती संकलित करण्याचं काम कृषी विभागाकडून अद्याप सुरू आहे. मात्र त्यातच जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास १.७० लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. नुकसानीचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसलाय. बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांना फटका बसलाय. कृषी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात राज्यातील ३६ पैकी २५ जिल्ह्यांना कमी-जास्त प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसला. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान कमी झालं आहे.  सोयाबीन, नाचणी, भुईमुग, ऊस, कापूस, तूर, मक्याचं मोठं नुकसान झालंय

बातमीचा व्हिडीओ पाहा -

10:22 AM

एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनावर औद्योगिक न्यायालयाचे ताशेरे

 

ST Andolan Update : औद्योगिक न्यायालयानं एसटी कर्मचा-यांचं कामबंद आंदोलन बेकायदेशीर ठरवलंय.. संपात सहभागी झालेल्या 11 कर्मचारी संघटनांवर औद्योगिक न्यायालयानं कडक शब्दांत ताशेरे ओढलेत.. तसंच संपात झालेल्या कर्मचा-यांना तातडीनं कामावर परतण्याचे आदेशही दिलेत.. कामावर रुजू न झाल्यास या कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करा असे निर्देश न्यायालयानं एसटी महामंडळाला दिलेत.. तसंच कामावर परतल्यानंतर एसटीची प्रवासी वाहतूक सुरळीत झाली आहे का याचं चित्रिकरणही करण्याच्या सूचना महामंडळाला देण्यात आल्यात.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09:49 AM

सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसै नाहीत - संजय राऊत

 

Sanjay Raut : सरकारकडे वायफळ कामांसाठी पैसे आहेत पण शेतक-यांना मदतीसाठी पैसे नाहीत अशी टीका संजय राऊतांनी केलीये. आदित्य ठाकरेंनी अतिवृष्टी ग्रस्त भागाच्या दौ-याची घोषणा केल्यानंतर या सरकारला जाग येते... असा टोलाही त्यांनी यावेळी सरकारला लगावला... 

09:27 AM

दिल्लीच्या उपराज्यपालांना महत्त्वपूर्ण अधिकार

 

Delhi : दिल्लीच्या उपराज्यपालांना महत्त्वाचे अधिकार प्राप्त झाले आहेत. राष्ट्रपतींच्या आदेशानंतर दिल्ली उपराज्यपालांना हे महत्त्वपूर्ण अधिकार देण्यात आलेत. गृहमंत्रालयानं याबाबत अधिसूचना जारी केलीय. संसदेत उपराज्यपालांच्या अधिकारांशी संबंधित जे विधेयक मंजूर झाले होते. त्यानुसार आता उपराज्यपाल दिल्लीत कोणतही मंडळ, आयोग किंवा प्राधिकरणाची स्थापना करून त्यांच्या सदस्यांची नियुक्ती करू शकतात. या अधिसूचनेमुळे दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजप आणि उपराज्यपाल यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:44 AM

लाडकी बहीण योजनेत भामट्याकडून फसवणूक

 

Satara Ladki Bahin Yojana : साताऱ्यात एकाच महिलेच्या नावाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 28 अर्ज भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.त्यामुळे खटाव तालुक्यातील मायणी गावातील दाम्पत्याविरोधात वडूच पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू करण्यात आलीय..  खारघरमधील एका महिलेच्या आधार कार्डचा वापर करून भामट्यानं लाडकी बहीण योजनेत फसवणूक केलीय..  प्रतीक्षा जाधव आमि गणेश घाडगे या दोघांनी लाडकी बहीण योजनेत फसवणूक करून तब्बल 28 अर्ज भरले होते.. भामट्यानं वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करून  लाडकी बहीण योजनेचे 28 अर्ज भरलेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:43 AM

मुंबईत भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

 

Mumbai Accident : मुंबईच्या लोअर परळ ब्रीजवर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय.. गाडीवरील ताबा सुटल्यानं दुचाकीस्वार सिमेंट मिक्सरच्या खाली आला.. या अपघातामध्ये शैलेश शेट्टी याचा जागीच मृत्यू झाला.. या अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झालीत... 

07:48 AM

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा - शिंदे

 

CM Ekanath Shinde : मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा... आणि नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत उपलब्ध करुन द्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी विभागीय तसंच जिल्हा प्रशासनाला दिल्यात.. विदर्भासह मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झालंय.. पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घ्या.. या संबंधीचे पंचनामे तातडीनं करा आणि नुकसानग्रस्तांना त्वरीत भरपाई द्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात.. अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. त्यांना आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही त्यांनी दिलेत.. शिवाय आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24तास खुला ठेवण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत.. 

07:32 AM

 एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा दुसरा दिवस

 

ST Andolan Update : एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे कोकणात गणपतीसाठी जाणा-या प्रवाशांचे अतोनात हाल होतायत. तसंच काही गावांमध्ये एकही एसटी डेपोतून बाहेर निघत नसल्याने गावकरी, विद्यार्थ्यांचेही हाल होतायत, दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावलीय. कामागर संघटनांच्या कृती समितीसोबत ही बैठक होणारेय.या बैठकीत तोडगा निघेल का याकडे सर्वांचं लक्ष आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More