Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 28 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Updated: Jun 28, 2024, 01:49 PM IST
LIVE Blog
28 June 2024
13:47 PM

शेतकरी प्रश्नावरुन वडेट्टीवार आक्रमक

 

Vidhansabha Session 2024 : नुकसानग्रस्त शेतक-यांच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा झाली...यावेळी शेतक-यांच्या मदतीचं पडलंय की एनडीव्हीआयचं पडलंय असा सवाल कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी विचारला...त्यावेळी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली...शेतक-यांना नुकसान भरपाई कधी देणार सांगा...निकष सांगू नका, निकषाच्या पलिकडे जाऊन मदत करा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12:32 PM

अजित पवारांच्या अडचणी संपेनात

 

Ajit Pawar : शिखर बँक घोटाळा प्रकरणी दोन्ही सरकारी तपास यंत्रणा आमने सामने आल्याचं चित्रं पाहायला मिळतंय. राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कर्जवाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. आणि हा गैरव्यवहार झाला त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार संचालक होते. त्यामुळे जवळपास 70 जणांवर दोषारोप ठेवण्यात आले होते. मात्र कर्जवाटप करतेवेळी कुठलीही अनियमितता झालेली नाही. असा दावा करीत हे प्रकरण बंद करण्याचा शिफारस अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात केलाय. आणि त्यावर आक्षेप घेत ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केलीय. त्यावर 12 जुलै ला सुनावणी होणारेय. 

12:29 PM

हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर

 

Jharkhand Hemant Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर झालाय...झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय...जमीन घोटाळाप्रकरणी सोरेन यांना जामीन मंजूर करण्यात आलाय...त्यामुळे सोरेन यांना मोठा दिलासा मिळालाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11:54 AM

भरधाव ट्रेलरनं मुलांना चिरडले, एकाचा मृत्यू, 2 जखमी

 

Palghar Accident : पालघरमध्ये भरधाव ट्रेलरने शाळेच्या मुलांना चिरडलंय.. या दुर्घटनेत एका आठवीच्या मुलाचा जागीच मृत्यू झालाय.. तर दोघं गंभीर जखमी झालेत... मुलं सकाळी शालेत जात असताना ओव्हरटेक करणा-या ट्रेरलनं या मुलांना चिरडलं.. पालघरच्या चिल्हार-बोईसर मार्गावर ही दुर्घटना घडली.. अपघातानंतर ट्रेलर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून जखमी विद्यार्थ्यांवर  अधिकारी लाईफ लाईन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11:44 AM

राज्यात 4 महिन्यात 838 शेतकरी आत्महत्या

 

Maharashtra Farmer Suicide News : राज्यात 2024 मधील जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यांतली शेतकरी आत्महत्येची आकडेवारी चिंताजनक आहे. 4 महिन्यांत राज्यात 838 शेतक-यांची आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. चार महिन्यांत दररोज सरासरी 7 शेतक-यांनी मरणाला कवटाळल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. कोकणात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण शून्य आहे. तर सर्वाधिक आत्महत्या अमरावती आणि यवतमाळमध्ये झाल्यायत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11:42 AM

म्हाडा घरांना पहिल्याच पावसात गळती

 

Mhada Home Leakage : मुंबईतील विक्रोळीतील म्हाडाच्या नवीन घरांना पहिल्याच पावसात गळती लागलीय...घरांना गळती लागल्याने म्हाडाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय...स्वस्तात मस्त घर अशी म्हाडाची ओळख. मात्र गेल्या अनेक वर्षात म्हाडाची ही ओळख पुसत चाललीय.... नुकत्याच मुंबई म्हाडाच्या लॉटरी विक्रोळी येथे अनेकांना घर लागली.  मात्र या घरात पहिल्याच पावसात गळती लागली असून या इमारतीच्या बांधकामात अनेक त्रुटी आहेत . त्यामुळे घर विजेते हैराण आहेत...यामुळेच म्हाडा आणि शिर्के बिल्डर यांच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलंय...

बातमी पाहा - ​Mhada Homes : किमान दरात कमाल गैरसोयी? म्हाडाच्या घरांना गळती; बांधकामावर प्रश्नचिन्हं

10:35 AM

इचलकरंजीत 4 मुलांना मारहाण

 

Kolhapur Marhan : इचलकरंजीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चार मुलांना अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय...या गुन्हेगाराने खंडणीची मागणी करत मुलांचे अपहरण करून बंद खोलीत अमानुष मारहाण केलीय...तरुणाच्या मानेवर पाय ठेवून लोखंडी पाईपने जबर मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी झालाय...या मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय...मोक्यातून सुटलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार श्याम लाखेने मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केलाय...आपली दहशत कायम राहावी यासाठी व्हिडिओ व्हायरल केल्याचं तपासात समोर आलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - Kolhapur Viral Video : जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण, दहशत कायम राहावी म्हणून...

10:30 AM

पेट्रोलपेक्षाही आता भाज्या महाग !

 

Vegetables Price Hike : बाजार भाजीपाल्याची आवक घटलीय. अनेक भाज्यांचे दर शंभरीपार गेलेत. त्यामुळे भाज्या प्रतिकिलो एक लिटर पेट्रोलच्या किमतीलाही मागे टाकतायत. पालेभाज्यांच्या किमतीही परवडत नाहीय. त्यामुळे आता खायचं काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10:22 AM

नाशिकमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना

 

Nashik Drunk & Drive : नाशिकच्या पाथर्डी फाटा इथं ड्रंक अँड ड्राइव्हची घटना घडलीय. गाडीला धडक दिल्यानंतर ड्रायव्हरनं पोलीस नातेवाईक असल्याचीही धमकीही दिली. परिसरातील नागरिकांनाही शिवीगाळ केलीय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10:16 AM

लसणाला महागाईची फोडणी

 

Garlic Price Hike : लसणाच्या दरात चांगलीच वाढ झालीय. भाज्यांमध्ये सर्वांमध्ये लसूण जास्त भाव खाऊ लागलाय. एपीएमसी घाऊक बाजारात सर्वोत्तम दर्जाचा लसूण तब्बल प्रतिकिलो 300 रुपयांवर पोहोचलाय. भाज्यांसह सगळ्याच पदार्थांत लसूण वापरला जात असल्यानं आता लसणाच्या तडक्याबाबत हात आखडता घ्यावा लागणारेय. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांतून लसणाची आवक होते. मात्र सध्या केवळ मध्य प्रदेशहून लसूण दाखल होतोय. यंदा लसणाचे उत्पादन कमी असल्यानं आवक रोडावलीय. त्यामुळे दिवसेंदिवस लसणाच्या किमतीत वाढ होत असल्याचं व्यापा-यांनी सांगितलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10:13 AM

बैल खरेदीच्या व्यवहारातून गोळीबार

 

Baramati Firing : बारामती तालुक्यातील निंबुत येथे एक गोळीबाराची घटना घडलीय ...यामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय.. रणजित निंबाळकर असं जखमी तरुणाचं नाव आहे.. नींबुत तेथील गौतम काकडे यांच्या घरासमोर हा गोळीबार झालाय...या गोळीबारात फलटण येथील रणजीत निंबाळकर यांच्या डोक्याला गोळी लागली असून त्यांच्यावर पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय..याप्रकरणी वडगांव निंबाळकर पोलिसांनी गौतम काकडे,गौरव काकडे आणि इतर तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला असून यापैकी गौरव काकडे,सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांना चौकशी कामी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय……

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10:11 AM

एकनाथ खडसेंचा आरोपमुक्तीसाठी अर्ज

 

Eknath Khadse : पुण्यातील भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणातून आरोपमुक्त करण्यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विशेष न्यायालयात अर्ज केल्याची माहिती समोर आलीय...खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी यांनीही आरोपमुक्तीसाठी अर्ज केलाय...भोसरीतील एमआयडीसीचा भूखंड अगदी क्षुल्लक दरात खरेदी केल्याचा आरोप खडसेंवर आहे...हा भूखंड त्यांच्या पत्नी आणि जावयाने खरेदी केल्याने त्यांनाही या घोटाळ्यात आरोपी करण्यात आलंय...भोसरी भूखंड घोटाळाप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीस एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी उपस्थित होत्या...त्यावेळी त्यांचे वकील स्वप्नील अंबुरे यांनी न्यायाधीश आर.रोकडेंपुढे आरोपमुक्तीचा अर्ज सादर केला...त्यामुळे आता खडसेंना दिलासा मिळणार की अडचणी आणखी वाढणार याकडे लक्ष लागलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09:08 AM

लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

 

Laxman Hake On Manoj Jarange : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना पुन्हा एकदा डिवचलंय...मंडल आयोग हा महाराष्ट्रासाठी नाही तर हा देशासाठी आहे...मंडल आयोगाला चॅलेंज करण्याची जरांगेंची औकात नाही...संपूर्ण ओबीसी समाज जर एकत्र आला तर तुम्ही कुठे उडून जाल हे तुम्हाला कळणार नाही...अशी कडाडून टीका हाकेंनी जरांगेंवर केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07:38 AM

तुकोबांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान

 

Dehu Tukoba Palkhi : आषाढी वारीसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणारेय. सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत श्री तुकोबाराय पादुकांची महापूजा इनामदार वाडा या ठिकाणी पार पडणारेय. त्यानंतर सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पालखी प्रस्थान सोहळ्याच्या सप्ताहाचे काल्याचे कीर्तन सभामंडपामध्ये पार पडेल. दुपारीबारानंतर मानाच्या सर्व दिंड्या या मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करणार आहेत. दुपारी 3 वाजल्यापासून ख-या अर्थानं पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणारेय. मान्यवर अतिथींच्या उपस्थितीमध्ये हा प्रमुख कार्यक्रम पार पडणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07:35 AM

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार

 

State Budget : राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात मांडला जाणार असून  आजचे बजेट आहे हे इलेक्शन बजेट असणाराय. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता  आजच्या बजेटमध्ये घोषणांचा पाऊस पडणाराय... मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना लागू करण्याची घोषणा  होणाराय. मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची तसंच बेरोजगारांसाठी विविध योजनांची घोषणाही यावेळी होण्याची शक्यता आहे. दुपारी १ वाजता मंत्रीमंडळ बैठकीत बजेटला मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर दुपारी २ वाजता अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडतली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नसल्यानं या बजेटमधून राज्य सरकार विविध घटकांसाठी विविध घोषणा जाहीर करण्याची शक्यता आहे. विशेषत: मराठा,ओबीसी,धनगर,दलित  यासह इतर समाजांसाठीही मोठ्या घोषणा या बजेटमध्ये होऊ शकतात.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07:33 AM

टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये 

 

T-20 World Cup - India Win : इंग्लडला नमवून टी 20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडिया पोहोचलीय...अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं इंग्लंडला पराभूत केलं...भारतानं रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्याच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर 7 विकेटवर 171 धावा केल्या...मात्र, भारताच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडची टीम 103 धावांवर ढेपाळली...त्यामुळे 68 धावांनी टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला... अखेर भारतानं 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा बदला घेतला...भारतानं दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांची लढत होईल. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या