Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Vishalgad Update : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई उद्यापासून

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 12 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Vishalgad Update : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई उद्यापासून
LIVE Blog
14 July 2024
21:55 PM

विशाळगडावरील अतिक्रमण उद्यापासून हटवणार, मुख्यमंत्र्यांचं संभाजीराजेंना आश्वासन

 

Vishalgad Update : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई उद्यापासून सुरू केली जाणाराय... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तसं आश्वासन दिल्याची माहिती संभाजीराजे छत्रपतींनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली... अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी संभाजीराजेंनी चलो विशाळगडचा नारा दिला होता. त्यानुसार संभाजीराजे आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते रविवारी विशाळगडावर पोहोचले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संभाजीराजे विशाळगडावरून कार्यकर्त्यांसह परतले.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

21:32 PM

रत्नागिरीत जोरदार पाऊस, जिल्ह्यातील शाळा, कॉलेजना उद्या सुट्टी

 

Ratnagiri School : राज्यातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावलीये. जोरदार पावसाचा कोकणाला फटका बसल्याचं दिसून आलंय. खबरदारीसाठी प्रशासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलीये. जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 

21:05 PM

रत्नागिरीत जोरदार पाऊस, खेड शहरात पूरस्थिती निर्माण

 

Ratnagiri Rain : रत्नागिरीत जोरदार पाऊस कोसळत असून, खेड शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खेडच्या शिवतर गावातील रस्ता वाहून गेला.. पोत्रिक मोहल्ला भागात नागरिक अडकले आहेत. तर NDRFकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. तर पुण्यातूनही NDRFची आणखी एक टीम या ठिकाणी दाखल होणार आहे. सध्या NDRFची प्रत्येकी एक टीम सध्या चिपळूण आणि खेडमध्ये आहे. तर जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

14:16 PM

'जरांगे नावाच्या भुताला बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून द्या', लक्ष्मण हाकेंचं वादग्रस्त विधान

 

Laxman Hake on Manoj Jarange : मनोज जरांगे नावाच्या भुताला बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून द्या, असं वादग्रस्त विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलंय. मराठा तरुणांच्या आत्महत्येला जरांगे जबाबदार असल्याचा आरोपही हाकेंनी केलाय.

13:41 PM

अजित पवारांच्या अडचणीत वाढ?

 

Ajit Pawar : शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार यांना दिलेल्या 'क्लीन चिट'ला आव्हान देत सात सहकारी साखर कारखान्यांनी सत्र न्यायालयात निषेध याचिका दाखल केल्यात. या याचिकांवर 25 जुलैला सुनावणी होणारेय. जरंडेश्वर, जय अंबिका, जालना, पारनेर, कन्नड, प्रियदर्शिनी, पद्मर्षी विखे-पाटील या सहकारी साखर कारखान्यांनी कोर्टात धाव घेतलीय. दरम्यान, क्लीन चीट मिळणं हाच मोठा घोटाळा असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर सर्व बाजू ऐकून घेऊन कोर्ट योग्य निर्णय देईल, असा विश्वास अनिल देशमुख यांनी केलाय.

13:13 PM

'आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचा दबाव', मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

 

Manoj Jarange on Devendra Fadnavis : मनोज जरांगेंनी अजित पवार आणि फडणवीसांवर गंभीर आरोप केलेयत...अजित पवारांचे 2 ते 3 पालकमंत्री मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत...तर मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचा दबाव आहे...असा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय...

12:25 PM

'काँग्रेसचे वरिष्ठ आमदार फुटले', आमदार हिरामण खोसकरांचा दावा

 

Hiraman Khoskar : विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस मतदानावर सुरू असलेल्या चर्चेवरून इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर संतप्त झालेत. मतदान काँग्रेसलाच केलं त्यामुळे बदनामी थांबवा, असं आवाहन त्यांनी थेट नाना पटोलेंसह काँग्रेस नेत्यांना केलंय. काँग्रेसचे वरिष्ठ आमदार फुटलेत. त्यांना कुणीही बोलत नाही, असा खळबळजनक दावा हिरामण खोसकरांनी केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

12:11 PM

गुहागरच्या पाचेरी सडा गावात डोंगर खचला

 

Guhagar Landslide :  गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा गावालगतचा डोंगर खचू लागलाय.. कोकणात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झालाय. पाचेरी सडा गावाजवळील डोंगर खचू लागल्यानं या डोंगरालगतच्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय.. दरम्यान या भूस्खलनामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी टाकीही खचलीये.. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचाही सामना करावा लागतोय.. डोंगर खचू लागल्यानं गावक-यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11:16 AM

रत्नागिरीमध्ये जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी

 

Ratnagiri Jagbudi River : रत्नागिरीमध्ये जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी...खेडमध्ये शिरलं पुराचं पाणी...खेड तालुक्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरुच...नागरिकांना सतर्कतेचा इशारा
 

10:36 AM

शिवसेना चिन्ह, पक्षाबाबत सुनावणी लांबली

 

 

Shivsena : शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत सुनावणी पुन्हा लांबणीवर टाकण्यात आलीये.. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह बहाल केले. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर १५ जुलै रोजी सुनावणी होणार होती, परंतु आता ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणावर १४ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचे भवितव्य एक महिन्यानंतर सुप्रीम कोर्टात ठरणार आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर तारीखही अपडेट करण्यात आली आहे.

10:04 AM

मुंबईच्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

 

Mumbai Dam Water : मुंबईकरांची तहान भागवणा-या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरु आहे.. त्यामुळे या धरणांतील पाणीसाठा 25 टक्क्यांवर आलाय.. मात्र धरणांतील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होईपर्यंत मुंबईतील पाणीकपात कायम राहणार आहे.. मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा करण्यात येणा-या ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका तसंच आसपासच्या गावांनाही ही पाणीकपात लागू करण्यात आलीये.. मात्र, धरणांतील पाणीसाठ्यात आता वाढ होत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतोय

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

09:41 AM

प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांची कार पोलिसांच्या ताब्यात

 

Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी वापरलेली वादग्रस्त ऑडी कार पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलीय. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात ही कार आणण्यात आलीय. पोलीस कारसह कागदपत्रांची तपासणी करीत आहेत. पोलिसांनी बॅरिकेटिंग करून ऑडी कार ताब्यात घेतलीय. याच कारवर पूजा खेडकरांनी अंबर दिव्यासह महाराष्ट्र शासन बोर्ड लावला होता. खेडकरांनी 2 दिवसात 27 हजार 600 रुपये दंड भरलायंय.

09:08 AM

'... तर आमदारकी सोडेन', आमदार बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य 

 

Bacchu Kadu : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडुंनी मोठं वक्तव्य केलंय. आमची तिसरी आघाडी नाहीतर शेतकरी, शेतमजूर वंचित यांची पहिली आघाडी आहे. बाकीच्या आघाडीनंतर, असं बच्चु कडुंनी स्पष्ट केलंय. दरम्यान कोण म्हणालं मी महायुतीत आहे? शेतक-यांचे मुद्दे, दिव्यांगांचे मुद्दे हे सर्व जर महायुतीने मान्य केले तर मी आमदारकी सोडेल, असं विधानं त्यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यावरून बच्चु कडूंचा पाठिंबा नक्की महायुतीला आहे की नाही? असा संभ्रम निर्माण झालाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

08:33 AM

मनोज जरांगे आज वारीत सहभागी होणार

 

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील आज वारीमध्ये सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षण जनजागृती रॅलीची काल संभाजीनगरमध्ये सांगता झाली. आज ते वारीत सहभागी होतील. वखरी इथल्या रिंगण सोहळ्याला ते हजेरी लावणार आहेत. जरांगे उद्या पंढरपूरमध्ये मुक्कामी राहण्याची शक्यता आहे.

08:08 AM

ठाणे, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी

 

IMD Rain Alert : रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय....कोल्हापूर आणि साताऱ्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय...पालघर आणि मुंबईसाठी यलो अलर्ट तर ठाणे, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी ...हवामान खात्याकडून अलर्ट जारी

07:43 AM

Breaking News Live Updates: नीट प्रकरणात आत्तापर्यंत बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुण वाढवण्यासाठी संजय जाधव, जलील पठाणमार्फत गंगाधरला पैसे दिल्याचं समोर आलं होतं. मात्र गंगाधरच्या चौकशी दरम्यान आता संभाजीनगर जिल्ह्यातील दोन मुलांची नावं समोर आली. या मुलांनी बाहेरील राज्यात जाऊन परिक्षा दिल्याचं आणि त्यांची प्रवेशपत्रं आरोपीच्या मोबाईलमध्ये असल्याचं उघड झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. या दोन्ही विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे जबाब CBI कडून नोंदवण्यात आलेत. विशेष म्हणजे संभाजीनगरच्या दोन विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं ही संजय जाधव किंवा जलील पठाण यांनी पाठवलेली नाहीत. त्यामुळे गंगाधर च्या संपर्कात संभाजीनगरमध्ये आणखी कोणी नवा एजंट आहे का ? याचा शोध  CBI कडून घेण्यात येतोय.. आत्तापर्यंत सीबीआयने जवळपास 80 जणांची चौकशी करून जवाब नोंदवल्याची माहिती आहे.

07:37 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर 

 

CM Eknath Shinde : आषाढी वारी प्रशासन तयारी पूर्व पाहणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. या दौ-यादरम्यान ते वाखरी मधील आरोग्य शिबिराच्या स्थळाला भेट देतील आणि आरोग्य शिबिराचा आढावा घेतील... 

07:34 AM

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रॅलीत गोळीबार 

 

Shooting at Donald Trump in America : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवघेणा हल्ला झालाय. पेन्सिलवेनियाच्या प्रचार सभेत ट्रम्प यांच्यावर दोन हल्लेखोरांना गोळी झाडलीय. ट्रम्प यांच्या उजव्या कानाला गोळी लागल्यानं ते जखमी झालेत. या गोळीबारातून ते थोडक्यात बचावलेत. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी ट्रम्प प्रचारसभा घेत आहेत. पेन्सिलवेनियामध्ये सभा सुरू असताना हल्लेखोरानं ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा रक्षकांनी ट्रम्प यांना तातडीनं घेराव घालून सुरक्षित ठिकाणी नेलं. सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला ठार केलं. तर या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झालाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More