Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 08 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
08 July 2024
22:37 PM

कोकण-कोल्हापूरला जाणारा फोंडा घाट बंद

 

Fonda Ghat : कोकणातून कोल्हापूरला जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची.. कारण कोकण आणि कोल्हापूरला जोडणारा फोंडा घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.. पर्यायी मार्गाचा वापर करा असं आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागानं केलंय. त्यामुळे करूळ घाटानंतर आता फोंडाघाटही अवजड वाहनांना बंद राहणार आहे.. त्यासोबतच देवगड- निपाणी रस्त्यावरही अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलीय. रस्त्यावरील पाईप खचल्याने दुरूस्तीसाठी हा रस्ता बंद राहणार आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

21:23 PM

उद्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकणात सर्व शाळांना सुट्टी जाहीर

 

School Holiday : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणातून मोठी बातमी समोर येतेय.. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.. नवी मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी हा आदेश दिलाय.. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळा उद्या बंद राहणार आहेत.. ठाणे जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळा तसंच बारावीपर्यंत कॉलेजेसना सुट्टी देण्यात आलीय. तसंच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कॉलेजेसना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलीय. रत्नागिरी जिल्ह्यात उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, कॉलेजना सुट्टी देण्यात आलीय.

21:07 PM

31 जुलैपर्यंत रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग बंद राहणार 

 

Raigad Fort : किल्ले रायगडावर ढगफुटीसारखा पाऊस झालाय. किल्ल्याच्या पाय-यांवर मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट वाहताना दिसतायेत. यामुळे पर्यटकांची तारांबळ उडालीये. परतीच्या मार्गावर किल्ल्याच्या भिंतींचा आधार घेत एकमेकांना पकडून पर्यटक कसेबसे खाली उतरले. काहींनी संरक्षक कठड्यावर उभे राहून तर अनेकांनी बॅरीगेटींगला पकडून स्वत:चा जीव वाचवला. रविवारी असल्यानं रायगडावर आलेल्या पर्यटकांची संख्या प्रमाणात होती. दरम्यान पावसाचा जोर वाढल्यानं पर्यटकांचे हाल झाले. प्रशासनाने आता रायगड किल्ल्यावर जाणारा रोप वे आणि पायरी मार्ग बंद केलाय.. रायगडचा पायरी मार्ग आजपासून 31 जुलै पर्यंत बंद राहणार आहे.

20:13 PM

किल्ले रायगडावर ढगफुटीसदृश पाऊस

 

Raigad Fort Rain : किल्ले रायगडावर ढगफुटीसारखा पाऊस झालाय. किल्ल्याच्या पाय-यांवर मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट वाहताना दिसतायेत. यामुळे पर्यटकांची तारांबळ उडालीये. परतीच्या मार्गावर किल्ल्याच्या भिंतींचा आधार घेत एकमेकांना पकडून पर्यटक कसेबसे खाली उतरले. काहींनी संरक्षक कठड्यावर उभे राहून तर अनेकांनी बॅरीगेटींगला पकडून स्वत:चा जीव वाचवला. रविवारी असल्यानं रायगडावर आलेल्या पर्यटकांची संख्या प्रमाणात होती. दरम्यान पावसाचा जोर वाढल्यानं पर्यटकांचे हाल झाले.

19:15 PM

CNG  आणि घरगुती पाईप गॅस दरात वाढ

 

CNG Gas Price : सीएनजी आणि पाईप गॅस दरात वाढ करण्याचा निर्णय महानगर गॅस कंपनीनं घेतलाय.. त्यानुसार सीएनजीच्या दरात प्रति किलो 1.50 रुपयाने वाढ करण्यात आलीय. तर घरगुती पाईप गॅसच्या किंमती 1 रुपयाने वाढणार आहेत... सोमवारी मध्यरात्रीपासूनच ही नवी दरवाढ लागू होणाराय.. त्यामुळं आता सीएनजीची किंमत 75 रुपये प्रति किलो होईल. तर घरगुती पाईप गॅसची किंमत 48 रुपये प्रति SCM एवढी असेल...

18:15 PM

वरळी हिट अँड रन प्रकरणी राजेश शाहाला जामीन मंजूर 

 

 Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणी राजेश शाह यांना शिवडी कोर्टानं  जामीन मंजूर  केलाय...15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर राजेश शहा यांची अटक कोर्टाने ठरवली बेकायदेशीर तर चालक राजऋषी बिडावत याला एका दिवसाची पोलीस कोठडी

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17:12 PM

पाय घसरून महिला रेल्वे रुळावर पडली, बेलापूर-सीबीडी रेल्वे स्टेशनवरील घटना

 

Belapur Train Accident : रेल्वेचा खोळंबा, प्रवाशांची गर्दी यातच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशनवर घडली.... पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर-सीबीडी रेल्वे स्टेशनला आली. रेल्वे विस्कळीत असल्यामुळे जी रेल्वे येईल ती पकडण्यासाठी गर्दी होती. याचदरम्यान एका महिलेचा पाय घसरून ती रुळावर पडली. त्यामुळे एकच तारांबळ उडाली. मात्र रेल्वे आणि पोलिस प्रशासनाने काही वेळातच रेल्वे मागे घेतली. महिला रेल्वे रुळामध्ये झोपून राहील्याने तिचा जीव वाचला मात्र महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाहीत. या अपघाताचा थरार कॅमेरात चित्रित झालाय. 

16:41 PM

वरळी हिट  अँड  रन प्रकरण, मुख्य आरोपी  मिहिर शहाविरोधात लूक आऊट नोटीस जारी

 

Worli Hit and Run Case : वरळी हिट  अँड  रन प्रकरण...मुख्य आरोपी मिहीर शहाच्या विरोधात लुक आउट नोटीस जारी...मुंबई पोलीसांकडून तपास सुरू...अपघात झाल्यापासून मिहीर फरार

16:20 PM

हार्बर रेल्वेची वाहतूक सुरळीत, वाशी-सीएसएमटी मार्गाची वाहतूक सुरळीत

 

Harbour Railway : वाशी ते सीएसएमटीकडे जाणारी रेल्वे वाहतूक सुरळीत...वाशी रेल्वे स्थानकातून मुंबईकडे जाणारी लोकल सुरू....वाशीहून सीएसएमटीकडे जाणारी पहिली गाडी रवाना....जोरदार पावसानंतर हार्बर रेल्वे मार्ग अखेर सुरळीत

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

15:51 PM

मुंबईसह सातारा, कोल्हापुरात मुसळधार पावसाची शक्यता

 

Mumbai Rain : मुंबईसह सातारा कोल्हापुरातही मुसळधार पावसाची शक्यता आहे...सातारा कोल्हापूर परिसरातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय...पुढील काही तास मुंबईसह उपनगरांत पाऊस थैमान घालणारे...हवामान विभागानं मुंबईला ऑरेंज अलर्ट दिलाय...मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीये...हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिलीये...

15:28 PM

ठाण्यात पुढील 3 दिवस अनियमीत पाणीपुरवठा

 

Thane Water : ठाण्यात पुढील तीन दिवस अनियमीत पाणीपुरवठा...नदी पात्रातील गाळामुळे पंपिंग स्टेशनवर परिणाम....मुसळधार पावसाचा ठाण्याच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम

बातमीचा व्हिडीओ पाहा-

13:55 PM

London Tiger Claws : अफजल खान वधावेळी शिवाजी महाराजांनी वापरलेली हीच वाघनखं असल्याबाबत अनिश्चितता आहे...असं स्पष्टीकरण विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलंय...इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांनी पत्रव्यवहार केला होता...त्यावरून ही माहिती समोर आलीय असा दावा इंद्रजीत सावंतांनी केलाय...महाराष्ट्र सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघ नखं आणत असल्याचा दावा केलाय...मात्र, प्रत्यक्षात आणली जाणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाच्या वधा वेळी वापरली असल्याचा कोणताच पुरावा नसल्याचे स्पष्टीकरण लंडन स्थित विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलंय...इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना केलेल्या पत्र व्यवहारात विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने हे स्पष्टीकरण दिलंय...

बातमी पाहा - लंडनहून आणलेली वाघनखं महाराजांची नाहीत? म्युझियमनेच केला मोठा खुलासा

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13:04 PM

वरळी हिट अँड रन प्रकरणावर विरोधक आक्रमक

 

Worli Hit And Run Update : वरळी हिट अँड रनप्रकरणी विरोधक आक्रमक झालेत. सरकारची तगडी यंत्रणा असूनही आरोपी अद्यापही फरार आहे. या घटनेबाबत सरकारला गांभीर्य नाही, असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. तर आपल्या नेत्याला वाचवत असाल तर हा कायद्याशी अपराध आहे, असं त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीही या घटनेवरुन सरकारवर निशाणा साधलाय. या घटनेवर सरकारला उत्तर द्यावं लागेल. राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही, असं त्यांनी म्हटलंय.

12:22 PM

Vashi Lady : रेल्वेचा खोळंबा, प्रवाशांची गर्दी यातच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशनवर घडली....पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर-सीबीडी रेल्वे स्टेशनला आली. रेल्वे विस्कळीत असल्यामुळे जी रेल्वे येईल ती पकडण्यासाठी गर्दी होती. याचदरम्यान एका महिलेचा पाय घसरून ती रुळावर पडली. त्यामुळे एकच तारांबळ उडाली. मात्र रेल्वे आणि पोलिस प्रशासनाने काही वेळातच रेल्वे मागे घेतली. महिला रेल्वे रुळामध्ये झोपून राहील्याने तिचा जीव वाचला  मात्र  महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाहीत. या अपघाताचा थरार कॅमेरात चित्रित झालाय. 

बातमी पाहा - Mumbai Rain : लोकल पकडताना महिला पाय घसरुन रुळांवर पडली; अंगावरून ट्रेन गेली, जीव वाचला पण...

11:11 AM

आंबेरी पुलाला मोठं भगदाड

 

Sindhudurga Rain : सिंधुदुर्गात काल दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका आंबेरी मार्गाला बसलाय. कुडाळ इथल्या माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलाला भलं मोठं भगदाड पडलं.  हा मार्ग आता पूर्णतः बंद झालाय. नवीन बांधण्यात आलेला पुल अद्यापही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नसल्याने आंबेरी मार्गावरील माणगाव खोऱ्यातील तब्बल २७ गावांचा येण्याजाण्याचा मार्ग बंद झालाय. नव्याने बांधण्यात आलेला पुल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी स्थानिकांनी केलीय

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11:08 AM

पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना

 

Pune Hit And Run : मुंबईतली घटना ताजी असतानाच आता पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडलीये. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रीजच्याखाली भरधाव वेगात असलेल्या कारचालकानं दोन पोलिसांना उडवलं. रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास गस्त घालण्यासाठी दोन पोलिस कॉन्स्टेबल दुचाकीवरून जात असताना समोरुन कारचालकानं जोरदार धडक दिली. यात एका पोलिस कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू झालाय. समाधान कोळी असं त्यांचं नाव आहे. तर दुसरे संजोग शिंदे हे गंभीर जखमी झालेत. अपघातानंतर कारचालक फरार झालाय. दोन्ही पोलिस कॉन्स्टेबल खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून कार्यरत होते. या घटनेवरून पुण्यात हिट अँड रनचं सत्र सुरूच असल्याचं दिसून येतंय. आता या घटनेवर आळा कधी बसणार? असा प्रश्न निर्माण झालाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10:56 AM

मुंबईत मुसळधार पावसाचा आमदारांना फटका

 

Mumbai Rain: मुंबईतील मुसळधार पावसाचा मंत्री आणि आमदारांना फटका बसलाय...लांब पल्ल्याची एक्स्प्रेस बंद पडल्याने 7 आमदार ट्रेनमध्येच अडकले...उशीर झाल्यामुळे आमदारांना ट्रॅकवरून चालण्याची वेळ आली...ट्रेनमधून उतरून आमदार मंत्र्यांनी ट्रॅकवरून पायी प्रवास केला...अधिवेशन सुरू असल्याने वेळेत पोहोचण्यासाठी आमदारांनी पायी चालत मार्ग काढला...यामध्ये मंत्री अनिल पाटील, आमदार मिटकरी, संजय गायकवाड असे 7 आमदार ट्रेनमध्येच अडकले होते...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09:43 AM

मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा इशारा

 

Mumbai Rain Alert : मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. रात्रभर पडणा-या पावसामुळे मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. रस्त्यावर पाणी साचलंय. शाळा-कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. अनेकांच्या घरात पाणी शिरलंय.  महानगरपालिकेचे कर्मचारी वेगवगळ्या ठिकाणी कार्यरत झालेत. हवामान विभागानं आजही अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. त्यामुळे यंत्रणा सतर्क झालीय. अफवांवर विश्वास ठेवू नका. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन महानगरपालिकेच्या प्रशासनानं केलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09:11 AM

कोल्हापुरात पावसाची दमदार हजेरी

 

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात देखील गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झालाय. हे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडलंय. सद्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 32 फूट 2 इंच झालीय. एका रात्रीत दीड फूट पाणी वाढलंय. जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली गेलेत. तर 14 धरण क्षेत्रात ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:24 AM

अलिबागच्या नेहुली खंडाळा परिसरात जोरदार पाऊस

 

Alibagh Rain Fall : अलिबाग तालुक्यातील नेहुली खंडाळा परिसरात पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. गावातील 6 ते 7 घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. या घरात साधारण दीड फुटापर्यंत पाणी शिरलं. घरातील अन्नधान्य आणि अन्य वस्तू भिजून मोठं नुकसान झालं. पावसामुळे गावा जवळचा नाला ओसंडून वाहू लागला आणि त्याचं पाणी गावात शिरलं. गावातील रस्त्याला नाल्याचं स्वरूप आलं

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:20 AM

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस

 

Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावलीय. पूर्व आणि पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस झालाय. यामुळे रस्त्यावर पाणी साचलंय. दादर, सायन, माटुंग्यातील रस्त्याला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय. त्यामुळे वाहतूक ठप्प झालीय. तर या पावसाचा रेल्वे सेवेलाही फटका बसलाय. मध्य आणि हार्बर लाईनवरील सेवा ठप्प झालीय. सायन कुर्ला दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय. तर हार्बर लाईवरील मानखुर्द स्टेशनजवळ ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळीत झालीय. त्यामुळे सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडणा-यांची तारांबळ उडालीय.

पावसाचे अपडेट्स पाहा - Breaking News Live Updates: मध्य रेल्वेवरील सायन आणि भांडुप स्थानकातील लोकल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More