Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Central Cabinet Metro Approval : केंद्रीय कॅबिनेटची ठाणे, पुणे मेट्रोबाबत घोषणा

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on AUGUST 16 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Central Cabinet Metro Approval : केंद्रीय कॅबिनेटची ठाणे, पुणे मेट्रोबाबत घोषणा
LIVE Blog
16 August 2024
23:11 PM

ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाला मंजुरी, पुणे मेट्रो विस्तारीकरणाला हिरवा कंदील

 

Central Cabinet Metro Approval : केंद्रीय मंत्रिमंडळानं ठाणे रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तब्बल 12हजार200 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असणआर आहे. यामुळे ठाण्यातील नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत यासारखे महत्त्वाचे भाग मेट्रोने जोडले जाणार आहेत. सोबतच मंत्रिमंडळानं पुणे मेट्रो फेझ वनच्या विस्तारीकरणालाही मान्यता दिली आहे. त्यानुसार स्वारगेट ते कात्रज असा पाऊणे सहा किलोमीटर इतका, दक्षिण पुण्यात मेट्रोचा विस्तार होणार आहे. यासाठी सुमारे 3 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे दोन्ही प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

17:31 PM

जम्मू-काश्मीरमध्ये 3 टप्प्यांत निवडणुका, हरयाणात 1 ऑक्टोबरला निवडणूक

 

Assembly Election Schedule : केंद्रीय निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर आणि हरयाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेसाठी 3 टप्प्यांत मतदान होणार आहे. 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला मतदान होईल, तर 4 ऑक्टोबरला मतमोजणी केली जाईल. विशेष म्हणजे 1990पासून जम्मू काश्मीरच्या इतिहासातील ही सर्वात कमी कालावधीत होणारी विधानसभा निवडणूक आहे. तर हरयाणामध्ये एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे. 1 ऑक्टोबरला हरयाणात मतदान होईल, तर 4 ऑक्टोबरला मतमोजणी घेतली जाणार आहे. 

14:34 PM

स्टंटबाजी जिवावर बेतली

 

Nagpur : तलावाच्या सांडव्यावर उभं राहून स्टंटबाजी करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलंय.. नागपूर जिल्ह्याच्या उमरेड शहराजवळील मकरधोकडा तलावात ही घटना घडलीये.. स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्यानं मकरधोकडा तलावावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.. अशातच तीन तरुण अचानकच तलावाच्या सांडव्यावर चढू लागले.. यातील एक तरुण सांडव्यावर चढण्यात यशस्वी झाला तर दोघे खाली कोसळले.. मात्र सांडव्याच्या भिंतीवर चढलेला तरुणही पाय घसरून तलावात पडला.. त्याला पोहता येत नसल्यानं त्याचा तलावात बुडून मृत्यू झाला.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13:45 PM

बहिणीचं नातं आमच्या भावांना कळलंच नाही - सुप्रिया सुळे

 

Supriya Sule : बहिणीचं नातं आमच्या भावांना कळलंच नाही, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी सत्ताधारी नेत्यांचा चिमटा काढलाय. यांना प्रेम आणि व्यवसायातलं अंतर कळालं नाही. लोकसभेच्या निकालनंतरच बहीण आठवली, असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13:11 PM

अजित पवारांच्या भाषणावेळी बॅनरबाजी

 

Ajit Pawar : अजित पवारांचे भाषण सुरू असताना एका कार्यकर्त्याने घोषणाबाजी केली...यावेळी त्यांनी अजितदादा परत राष्ट्रवादीत या असे बॅनर दाखवले...यावेळी अजितदादांनी तुझ्याशी बोलतो नंतर असं म्हणत भाषण पुन्हा सुरू केले...तात्काळ पोलिसांनी कार्यकर्त्याकडे असलेले बॅनर काढून घेतले...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12:14 PM

म्हाडाचं घर घेणाऱ्यांना दिलासा

 

Mhada House Price : म्हाडाच्या घरांच्या किमती लवकरच कमी होणार आहेत... वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत आहे.. यामुळे घरांच्या किमती कमी करण्यासाठी लवकरच घोरणात्मक निर्णय घेणार असल्याचं,  आश्वासन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिलंय... म्हाडाच्या लोकशाही दिन कार्यक्रमावेळी अनेक रहिवाशांच्या तक्रारी आल्यामुळे, धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचं संजीव जयस्वालांनी म्हटलंय.. तसेच डीजी लॉकरच्या माध्यमाची बहूतांश नागरिकांना माहिती नसल्यामुळे,  डीजी लॉकरच्या  माध्यमातून कागदपत्रे सादर करण्याची अट शिथिल करून,  जुन्या पद्धतीने कागदपत्रे अपलोड करण्याची पद्धत देखील सुरु करण्याची हालचाल करण्यात येत आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12:06 PM

लाडकी बहीण योजना जाहिरातीसाठी निधी मंजूर

 

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीसाठी 199 कोटी रुपयांचा खर्च केला जाणारेय. योजनेच्या प्रसिद्धिसाठी 199 कोटी 81 लाख 47 हजार 436 रुपयांच्या निधीला महिला व बालविकास विभागाने मंजुरी दिलीय. फोन कॉल्स, सिनेमागृहे, एसटी स्टँड, मेट्रो, रेल्वे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी या योजनेची प्रसिद्धी केली जाणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11:43 AM

मराठवाडा निधीपासून वंचित

 

Marathwada : मराठवाड्याच्या विकासासाठी जाहीर करण्यात आलेला 59 हजार कोटी रुपयांचा निधी अजूनही मिळाला नाही. 11 महिन्यांपासून निधीचा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी धुळघात पडलाय. गेल्या वर्षी 16 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी तब्बल 45 हजार कोटी तर पश्चिम वाहिन्यांचं पाणी मराठवाड्याला मिळावं यासाठी 14 हजार 40 कोटींची स्वतंत्र तरतूद जाहीर करण्यात आली होती. आता विधानसभा निवडणुकीला काही दिवस बाकी असताना सरकारकडून घोषणांचा पाऊस पडतोय. मात्र,मराठवाड्याच्या निधीबाबतच्या निर्णयाची अंमलबावणी होत नाही. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11:36 AM

मविआतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर?

 

MVA : महाविकास आघाडीतील इतर पक्ष शिवसेना ठाकरे गटाचा फक्तं प्रचारासाठी वापर करून घेतील आणि स्व:ताच्या पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणतील अशी भीती शिवसैनिकांनी व्यक्त केलीये.. तशा आशयाचं पत्रच शिवसैनिकांनी मिलिंद नार्वेकरांना लिहीलंय.. 

09:59 AM

पुणे ड्रग्ज प्रकरणात 119 जण पोलिसांच्या रडारवर

 

Pune Drugs : पुणे ड्रग्जप्रकरणी 119 जण पोलिसांच्या रडावर आलेत.. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून पुणे पोलिसांनी या 119 जणांची यादी तयार केलीये. यात पुण्यातील IT कर्मचा-यांकडून सर्वाधक ड्रग्ज खरेदी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीये.. 25 ते 41 वयोगटातील लोकांनी सर्वाधिक ड्रग्ज घेतलं असून महिला आणि तृतीय पंथियांचाही यात सहभाग आहे.. पुणे पोलीस या सर्व 119 जणांना बोलावून त्यांची चौकशी तसंच समुपदेशन करणार आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09:48 AM

जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर होणार?

 

Election Commission : जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणारेय. या पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यापासून निवडणुका होत नाहीत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09:31 AM

पुणे महानगरपालिकेत पुन्हा पदभरती

 

Pune : पुणे महानगरपालिकेत पुन्हा पदभरती होणाराय...पुणे महानगरपालिकेत एकूण 682 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालीय...इच्छुक उमेदवारांकडून पुणे महानगरपालिकेने ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेयत...19 ऑगस्टपर्यंत इच्छुकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत...कनिष्ठ अभियंता, फोलमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिफिकेशन, वेल्डिंग, पेटिंग अशा पदांसाठी जाहिरात आहे...महापालिकेच्या साईटवर सर्व माहिती उपलब्ध आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09:00 AM

कोरोनानंतर जगावर मंकी पॉक्सचं संकट

 

WHO On M-Pox : कोरोनानंतर आता जगावर एमपॉक्सचं संकट ओढावलंय.. हा आजार पूर्वी मंकीपॉक्स नावाने ओळखला जात होता... कांगोसह आफ्रिकेतील 13 देशांमध्ये हा आजार वेगानं पसरत असून यामुळे आतापर्यंत 524जणांचा मृत्यू झालाय.. या आजाराचा धोका लक्षात घेताल जागतिक आरोग्य संघटनेनं एमपॉक्सला जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:39 AM

मुंबईला साथीच्या आजारांचा विळखा

 

Mumbai : मुंबईकरांनो आरोग्याची काळजी घ्या....कारण पावसानं सध्या काहीशी विश्रांती घेतली असली तरी साथीच्या आजारांचा दबा अजूनही कायम आहे. मुंबईत तब्बल 14 हजार ठिकाणी डेंग्यू तर अडीच हजार ठिकाणी मलेरियाचे डास आढळून आलेत. शिवाय गेल्या दोन आठवड्यात स्वाईन फ्लूचे 119 तर लेप्टोचे 172 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी. कोणतीही लक्षणं दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क करावा, असं आवाहान महापालिकेकडून देण्यात आलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:02 AM

Vijay Wadettiwar : सुप्रीम कोर्टाने SC-ST समाजाच्या वर्गीकरणाचा निर्णय घेतल्याने आदिवासी आणि दलित समाजात असंतोष निर्माण झाल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय...त्यामुळे राज्य सरकारने निर्णयाची अंमलबजावणी करू नये, अशीही मागणी केलीय.. तसेच जर आदिवासी आणि दलित समाजाने आंदोलन पुकारल्यास वडेट्टीवार ही आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07:52 AM

मराठी वाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर

 

Maharashtra AI Survey : मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये झी २४ तास आज रचणार आहे इतिहास... कारण मराठी वाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर झिनिया सादर करणार आहे महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे... लोकसभा निवडणुकीचा सर्वात अचूक AI एक्झिट पोल फक्त झी २४ तासने दाखवले होते.. आता झी २४ तास घेऊन आलाय महाराष्ट्राचा महा AI सर्व्हे.... हा सर्व्हे आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचा. लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रातली परिस्थिती बदलली आहे... तेव्हा महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कोणाचं सरकार येणार? लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरणार का ? मुख्यमंत्री म्हणून पसंती कोणाला मिळणार? जनतेच्या मनातल्या सर्व  प्रश्नांची उत्तर देणारा महा AI सर्व्हे झिनियासोबत तुम्ही पाहू शकता  संध्याकाळी 6 वाजता.. फक्त झी २४ तासवर.. महाराष्ट्राच्या महा AI सर्व्हेत राज्यातल्या लाखो लोकांचा कौल घेण्यात आलाय.. झी २४ ताससाठी महा AI सर्व्हे डेटा अ‍ॅनालिटिक्स कंपनी ICPL ने केला आहे... डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची मदत घेण्यात आली आहे.. तेव्हा झिनियासोबत पाहायला विसरु नका महा AI सर्व्हे..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07:49 AM

IMAचे डॉक्टर उद्या संपावर

 

IMA Strike : कोलकाता रेप आणि मर्डर केसच्या निर्षेधार्थ उद्या IMAच्या डॉक्टरांनी संप पुकारलाय... IMAचे डॉक्टर उद्या 24 तास संपवर जाणार आहेत.. संपादरम्यान OPDबंद असतील त्यामुळे रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे.. 

 

07:46 AM

मुंबईत महाविकासआघाडीचा आज मेळावा

 

Mumbai MVA Meeting : महाविकास आघाडीनं आगामी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केलीय. मुंबईत आज महाविकास आघाडीचा मेळावा पार पडणारेय. षण्मुखानंद सभागृहात हा मेळावा होणारेय. या मेळाव्याला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. शरद पवार गटाची राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. तर काँग्रेसनं गेल्या काही दिवसांत राज्यात निवडणुकीबाबत आढावा घेतला होता. त्यानतंर दिल्लीत राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची बैठकही पार पडली होती. त्यानंतर हा आजचा मेळावा पार पडतोय. तिन्ही पक्ष आगामी विधानसभा एकत्र लढणार आहेत. या मेळाव्यात विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर जागावाटपांदर्भात कधी बैठक घ्याची या संदर्भात मेळाव्यात चर्चा करू, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More