Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on AUGUST 15 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
15 August 2024
13:18 PM

महायुतीमध्ये फाईल्सवरुन धुसफूस नाही-मुंडे

 

Dhananjay Munde : महायुतीतमध्ये फाईल्सवरुन धुसफूस असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्टिकरण कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी दिलंय.. मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वत: उपस्थिती होतो.. त्यामुळे या बैठकीत असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचं ते म्हणाले.. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेक फाईल्स मंजुरीसाठी मुख्ममंत्री एकनाथ शिंदेंकडे खोळंबल्या असल्याची चर्चा होती.. यावरुन महायुतीत फाईलवॉर सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र या चर्चांना धनंजय मुंडेंनी पूर्णविराम दिलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13:15 PM

नव्या खासगी शाळांवर नियंत्रण

 

School : राज्यात नव्या खासगी शाळा सुरु करण्यावर नियंत्रण येण्याची शक्यता आहे. खासगी शाळांचं प्रमाण वाढल्यानं आता सरकारनं त्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरु केलेत.. शाळांचा बृहद् आराखडा तयार करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय.. त्यासाठी अतिप्रगत आणि मागास असे दोन विभाग तयार करण्यात आलेत. प्रगत भागात शाळा सुरु करण्यासाठी कठोर नियमावली तर मागास भागातील नियम शिथिल करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.. या आराखड्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलीये.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13:13 PM

जय पवार विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात?

 

Ajit Pawar : बारामती विधानसभेबाबत अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय...जय पवारांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांनी संकेत दिलेयत...कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जय पवारांना संधी देऊ असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय...बारामती विधानसभा मी सात-आठ वेळा लढलोय मला इंटरेस्ट नाही असं अजित पवारांनी म्हटलंय...तर याआधी बारामती मतदारसंघात शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांनी लढण्याचे संकेत दिलेयत...त्यामुळे बारामतीत जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होण्याची शक्यताय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12:27 PM

80 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ - आदिती तटकरे

 

Aditi Tatkare : गेल्या 24 तासांत 80 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती मंत्री आदिती तटकरेंनी दिली. कालपासून पैसे हस्तांतरित करायला सुरुवात झालीय. पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतर करण्यासाठी महिला व बालविकास विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहोत, असं ट्विट त्यांनी केलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10:55 AM

बांगलादेशात हिंदूंना त्रास होतोय-भागवत

 

Nagpur Mohan Bhagwat : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर सरसंघचालक मोहन भागवतांनी चिंता व्यक्त केलीय...शेजारच्या देशात उत्पात होतोय... हिंदूना त्रास दिला जातोय...आपण कधीच दुस-यावर हल्ला केला नाही, दुस-याला अडचणीत मदतच केली...मात्र, बांगलादेशातील हिंदूंवर होत असल्याने भागवतांनी खंत व्यक्त केली...

10:53 AM

हिंदू, अल्पसंख्याक सुरक्षित असले पाहिजे - मोदी

 

Delhi Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून बांगलादेशात झालेल्या हिंदूवरील अत्याचारावरून चिंता व्यक्त केलीय. हिंदू आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक  सुरक्षित असले पाहिजे, असंही ते म्हणाले. तर शेजारील देशांनी सुख-शांतीच्या मार्गावर चालावं, असं आवाहनही त्यांनी केलीय. 

10:52 AM

देशात धर्मनिरपेक्ष नागरी कायदा असावा - मोदी

 

Delhi Narendra Modi : देशात एक धर्मनिरपेक्ष नागरी कायदा असावा, अशी भूमिका आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून मांडलीय. सुप्रीम कोर्टानं समान नागरी कायद्याबाबत सुनावणी घेतली. त्यावर चर्चा झाली. आतापर्यंत आपण कम्युनल सिविल कोडमध्ये 75 वर्षं घालवली. आता देशात धर्मनिरपेक्ष नागरी कायदा असावा. यामुळे देशातील धार्मिक भेदभावापासून नागरिकांना मुक्ती मिळेल, असं मोदींनी ठणकावून सांगितलं. तर धार्मिक आधारावर देश तोडणा-या कायद्यांनाही स्थान नाही. यावरही देशात व्यापक चर्चा व्हावी, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय. 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More