Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Pune Car Accident Update : चालकाचं अपहरण, धमकावल्याप्रकरणी अग्रवाल पिता-पुत्राला न्यायालयीन कोठडी

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Pune Car Accident Update : चालकाचं अपहरण, धमकावल्याप्रकरणी अग्रवाल पिता-पुत्राला न्यायालयीन कोठडी
LIVE Blog
31 May 2024
18:22 PM

आरोपी सुरेंद्र आणि विशाल अग्रवाल दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

 

Pune Car Accident Update : पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हरला डांबून ठेवणं आणि धमकी देवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुरेंद्र आणि विशाल अग्रवालवर आहे...दोघांनाही आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये...सुरेंद्र अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला असून विशाल अग्रवालच्या भोवती सापळा अजून सैल झालेला नाही...विशाल अग्रवालवर ससूनमधील रक्ताचे नमुने फेरफार प्रकरणातही आरोप आहेत...त्यामुळे पुणे पोलीस त्याला या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यासाठी अर्ज करणारेत...न्यायलयाची मंजुरी मिळताच त्याला तिस-यांदा अटक करण्यात येईल...रक्त नुमने फेरफार प्रकरणात अनेक गोष्टींचा उलगडा होणं बाकी असल्याचं पोलिसांचं म्हणण आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

17:04 PM

इंजिनीअरिंग सेमिस्टर 8ची परीक्षा, BMS 5 वर्षे इंटिग्रेटेड सेमिस्टर 2ची परीक्षा पुढे ढकलली

 

Mumbai University Exam Postponed : मुंबई विद्यापीठाच्या उद्याच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेनं 63 तासांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. तसंच CSMT ते भायखळा आणि CSMT ते वडाळा रोड दरम्यानही 36 तासांचा विशेष जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे होणारी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तर या परीक्षांची नवी तारीख लवकरच कळवली जाणार आहे. 

 

14:22 PM

पंढरपूरच्या विठ्ठल गाभाऱ्यासमोर आढळलं तळघर 

 

Pandharpur Vitthal Temple : पंढरपूरच्या विठ्ठल गाभाऱ्यासमोर तळघर आढळलं...खचलेला दगड काढताना आढळलं तळघर...पुरातत्व विभागाचे अधिकारी करणार पाहणी...पुरातन काळातील काही माहिती, रहस्य समोर येणार?

14:01 PM

मनोज जरांगे यांना दिलासा, जरांगेंविरोधातील वॉरंट रद्द

 

Manoj Jarange : मनोज जरांगेंविरोधातील वॉरंट रद्द करण्यात आलंय...तसंच वॉरंट रद्द करताना कोर्टाने जरांगेंना 500 रुपयाचा दंड देखील ठोठावलाय...2013 मध्ये एका नाटकाचे आयोजन केलं होतं...त्या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर पैसे देण्यात आले नव्हते असा फसवणुकीचा आरोप जरांगेंवर होता...त्या फसवणुकीच्या गुन्ह्यात जरांगेंविरोधात वॉरंट जारी झालं होतं...त्यानंतर जरांगे आज कोर्टात हजर झाले...अखेर त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळालाय...

 

13:34 PM

उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होणार?

 

Uddhav Thackeray : मुंबईतील मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषद संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने केंद्रिय निवडणूक आयोगाला अहवाल पाठवला...पत्रकार परिषदेवर आक्षेप घेत भाजप नेते आशिष शेलार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती...त्यानंतर यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले होते...त्यानुसार पत्रकार परिषद तपासून तसा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला...राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला...
आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे...

13:01 PM

छगन भुजबळ महायुतीत नाराज?

 

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा जोरात सुरू आहे...काही दिवसांपूर्वीच भुजबळांनी शरद पवार, उद्धव ठाकरेंना सहानुभूती असल्याचं म्हटलं होतं...तर कालच भुजबळांनी मनुस्मृतीवरून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केलीय...त्यामुळे भुजबळ महायुतीत नाराज असल्याची चर्चा होतेय...मात्र, मी नाराज नाही, लोकसभा सोडली, राज्यसभेचं देखील सोडा...असं मिश्किलपणे भुजबळांनी म्हटलंय...

 

12:46 PM

विशाल अग्रवालच्या हॉटेलमधील बारवर कारवाई

 

Pune Car Accident Case : पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवालचं महाबळेश्वर कनेक्शन उघड झालंय. महाबळेश्वरमधलं एमपीएजी क्लब हे हॉटेल विशाल अग्रवालच्या मालकीचं असल्याचं समोर आलंय. या हॉटेलमध्ये अनधिकृत बार चालवला जात होता. त्यावर जिल्हा प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलाय. पोलिसांनी हा बार सील केला असून त्याचा परवानाही निलंबित करण्यात आलाय. ही जागा शासनानं पारसी जिमखाना यांना भाडे पट्टयावर रहिवासी कारणासाठी दिलेली आहे. मात्र त्या ठिकाणी हॉटेल उभारुन मोठ्या प्रमाणात वाणिज्य वापर केला जात असल्याचे समोर आलंय. प्रशासनानं बार बंद करून अग्रवालला दणका दिला असला तरी अनधिकृतपणे चालवले जाणारे हे हॉटेल कधी सील करणार असा सवाल विचारला जातोय. 

 

12:27 PM

अमरावती हिट अँड रनप्रकरणातील आरोपींना अटक

 

Amravati Hit And Run Case : अमरावती जिल्ह्यातील हिट अँड रन प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलीसांना अखेर यश आलंय.. तब्बल 27 दिवसानंतर पोलिसांनी याप्रकरणातील आरोपींना अटक केली असून यातील प्रमुख आरोपी हा आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक असल्याचं निष्पन्न झालंय.. 3 मे रोजी या आरोपींना भीमसेन वाहने या दुचाकी स्वाराला उडवलं होतं.. त्यांनतर जखमी भीमसेन यांना जागेवर टाकून हे आरोपी घटनस्थावरुन फरार झाले.. या दुर्घटनेत भीमसे वाहने यांचा मृत्यू झाला.. या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 4 पथकं तैनात केली होती... अखेर आज या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात..

11:34 AM

मराठा समाजाच्या जाहिरातीसाठी सरकार करणार 26 कोटी खर्च 

 

Maratha Community Advertisements :  मराठा समाजाच्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी आराखडा.....माहिती व जनसंपर्क संचालनालयाने काल केला आराखडा प्रसिद्........प्रसिद्धीसाठी सरकार खर्च करणार तब्बल २६ कोटी रुपये........योजनांची माहिती मराठा समाजापर्यंत पोचवण्याठी सरकारी जाहिराती

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11:02 AM

'महिलेला मारण्याचा प्रयत्न ही घटना दुर्दैवी', सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

 

Supriya Sule : पुण्यातील या घटनेवरून सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलीय...महिलेला मारण्याचा प्रयत्न ही घटना अतिशय दुर्दैवी घटना आहे...पुण्यात हिट अॅण्ड रन, ड्रग्ज सापडतं, आता महिलेला गाडण्याचा प्रयत्न होतोय...नक्की पुणे जिल्ह्यात चाललंय तरी काय? असा सवाल सुळेंनी उपस्थित केलाय...

10:27 AM

पुण्यात 22 वर्षीय तरुणीला जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न

 

Pune Crime : पुण्यात 22 वर्षीय तरुणीला जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडलीय...पुण्याच्या राजगड कोंढवळे गावात ही घटना घडली असून, एकच खळबळ उडालीय...जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याने हत्येचा प्रयत्न केल्याचा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय...या प्रकरणात 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यताय...संभाजी खोपडे, तानाजी खोपडे, बाळू भोरकर, उमेश जयस्वाल या चार जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ,धमकावणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात झालाय...याप्रकरणी पीडित तरुणीच्या आईने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली होती...त्यामुळे राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय...मात्र, या घटनेनं पुण्यात खळबळ उडालीय...

10:13 AM

नागपूरच्या कोराडीतील 660 मेगावॅटचा संच बंद

 

Nagpur Koradi 660 MW Set Issue : नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील 660 मेगावॅटचा एक संच बंद पडलाय. त्यामुळे बीज निर्मितीवर परिणाम झालाय...अचानक विजेची मागणी वाढल्यास वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती आहे. कोराडीतील संच क्रमांक आठचा बॉयलर हा ट्यूब लिकेजमुळे 28 मे पासून बंद पडलाय. विजेची मागणी अचानक वाढल्यास वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता यामुळे निर्माण झालीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

09:35 AM

नाना पटोले आज दुष्काळ पाहणी दौऱ्यावर

 

Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दुष्काळ पाहणी दौ-यावर आहेत...आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये दुष्काळाची पाहणी करणार आहेत...मराठवाड्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी दुष्काळाची भीषण स्थिती आहे...त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल होतायत...यावेळी सरकार उपाययोजना काही करतंय का...? याचा आढावा काँग्रेस नेत्यांकडून घेतला जाणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

09:01 AM

पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी 40 जादा बसेस

 

Pune ST Bus : मुंबईसाठी पुणे एसटी विभागाकडून जादा गाड्या...मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द..पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी 40 जादा बसेस...रेल्वे गाड्या रद्द असल्याने एसटीवर पडणार प्रवाशांचा ताण...याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून जादा गाड्याचं नियोजन...मुंबईसाठी पुणे स्टेशन येथून 40 जादा बसेस सोडण्यात येणार

बातमीचा व्हिडीओ पाहा-

08:39 AM

लातूरच्या औसा तांडा गावात भीषण दुष्काळ

 

Latur Water : रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करणा-या नागरिकांवर आता रात्रीचा दिवस करून पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आलीय...लातूरच्या औसा तांडा गावातील भीषण दुष्काळामुळे लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत पाण्यासाठी रात्र जागू काढावी लागतेय...रात्र जागून काढल्यानंतर कुठेतरी एकदोन हंडे पाणी या लोकांना मिळतंय...मात्र, हा संघर्ष रोजचाच असल्याने दुष्काळाला कंटाळून जवळपास 300 लोकांनी गाव सोडलाय...औसा तांडा हे 1200 लोकवस्तीचे गाव आहे...मात्र, गावात शासनाकडून एकही बोअर दिली नाही, तर पाण्याचा टँकरही देण्यात आलेला नाही...त्यामुळे गावातील लोकांनीच बोअर खोदून पाण्याची सोय केली...मात्र, पाणीपातळी खालावल्याने एका घागरीसाठी रात्रभर बसून पाण्याची वाट पाहावी लागतेय...त्यामुळे आता तरी सरकार याकडे लक्ष देणार का...? रात्रभर पाण्यासाठी जागणा-या या नागरिकांचा हा वनवास संपणार तरी कधी हाच प्रश्न आहे...

08:09 AM

विशाल-सुरेंद्र अग्रवालची पोलीस कोठडी आज संपणार

 

Pune Porsche Car Accident  : ड्रायव्हरचे अपहरण आणि धमकावल्याप्रकरणी अटकेत असलेल्या विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवालची पोलीस कोठडी आज संपणार आहे...त्यामुळे दोघांना दुपारी अडीच नंतर पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे...अपघातानंतर मुलाचा गुन्हा तुझ्या अंगावर घे अशी धमकी दिल्याची तक्रार ड्रायव्हरने केली होती...त्याप्रकरणी अग्रवालवर कारवाई झालीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

07:36 AM

प्रज्वल रेवण्णाला बंगळुरु विमानतळावरून अटक

 

Prajwal Revanna Arrested : महिला अत्याचार प्रकरणात फरार असलेल्या प्रज्वल रेवण्णाला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. प्रज्वल रेवण्णा जर्मनीतून बंगळुरु एअरपोर्टवर पोहोचताच कर्नाटक पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याला थेट एसआयटी ऑफिसमध्ये नेलं. आजच कोर्टात हजरही केलं जाणारेय. महिला अत्याचाराचे प्रज्वल रेवण्णाचे व्हिडीओ सार्वजनिक झाले होते. प्रज्वल रेवण्णा विरोधात महिला अत्याचाराच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हे प्रकरण देशभर गाजलं. रेवण्णाला 27 एप्रिलला देश सोडून पलायन केलं होतं. कर्नाटक सरकारनं त्यांच्या तपासासाठी SITची स्थापना केली. आता 38 दिवसांनंतर प्रज्वल रेवण्णा भारतात दाखतल झाला असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्यायत.

07:27 AM

मध्य रेल्वेवर आजपासून 63 तासांचा जम्बो ब्लॉक 

 

Mumbai Megablock : मध्य रेल्वेवर आजपासून 63 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आलाय...त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. कारण या ब्लॉकदरम्यान तब्बल 930 लोकल फे-या तसंच 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्यायत...रविवारी दुपारी 3.30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल...ब्लॉकदरम्यान काही गाड्या शॉर्ट टर्मिनस करण्यात आल्यायत...सीएसएमटीवरील 10 आणि 11 क्रमांकाच्या फलाटाची लांबी वाढवण्यासाठी तर ठाणे स्थानकावरील 5 आणि 6 फलाट क्रमांकांची रुंदी वाढवण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात आलाय...या ब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊनये म्हणून बेस्ट कडून जादा गाड्या सोडण्यात आल्यायत...तर सरकारी आणि खासगी कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होम देण्यांच आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय...
 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

Read More