Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
28 January 2024
22:35 PM

एकनाथ खडसेंची जीभ घसरली

 

Eknath Khadse on Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजनांवर टीका करताना एकनाथ खडसेंची जीभ घसरलीय. माझ्या नावाचा जप करतील तर गिरीश भाऊला कायमची मुक्ती मिळेल असं विधान एकनाथ खडसेंनी केलंय. राम नामाचा जप केल्यानं मुक्ती मिळते तसं माझे नाव घेतल्यानं गिरीश महाजन यांना कायमची मुक्ती मिळेल असं खडसे म्हणालेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

21:13 PM

3 फेब्रुवारीला अहमदनगरला एल्गार मेळावा- छगन भुजबळ

 

Chhagan Bhujbal Live | Marathi News LIVE Today : सगे सोयऱ्यांच्या मसुद्यावर हरकती नोंदवणार...3 फेब्रुवारीला अहमदनगरला एल्गार मेळावा...झुंडशाहीला रोखण्यासाठी प्रतिकार करा...1 फेब्रुवारीला तहसीलदारांसमोर आंदोलन.. छगन भुजबळ यांची माहिती.

 

21:01 PM

'मराठा आरक्षणाची अधिसूचन रद्द करावी', छगन भुजबळांची मागणी

 

Chhagan Bhujbal Live | Marathi News LIVE Today : ओबीसी बैठकीत काही ठराव मंजूर...मराठा आरक्षणाची अधिसूचन रद्द करावी...मागासवर्ग आयोग, न्या शिंदे समिती रद्द करा...मराठा कुणबी प्रमाणपत्राला स्थगिती द्या... छगन भुजबळ यांची राज्य सरकारकडे मागणी.

20:53 PM

मागासवर्गीय आयोग नव्हे मराठा आयोग- छगन भुजबळ

 

Chhagan Bhujbal Live | Marathi News LIVE Today : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट...मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही...सरकारकडून ओबीसींवर अन्याय, नेत्यांची भावना...आमच्या तोंडचा घास हिरावून घेतला जातोय...आयोगाच्या अध्यक्षांकडून मराठा समाजाला झुकतं माप...मागासवर्गीय आयोग नव्हे मराठा आयोग... छगन भुजबळ यांचा आरोप

 

18:10 PM

'पोलीस माझं काही वाकडं करु शकणार नाहीत',नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य

 

Nitesh Rane : जे लोक हिंदूंना त्रास देतात, त्यांचा कार्यक्रम करुन मला फोन करा.. पोलीस माझं काही वाकडं करु शकणार नाहीत, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय असा उघड धमकीवजा इशारा नितेश राणेंनी दिलाय, पंढरपूरमध्ये नितेश राणेंनी हे प्रक्षोभक विधान केलंय. त्यामुळे नवा वाद निर्माण झालाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

17:06 PM

नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री

 

Bihar Political Crisis : नितीश कुमारांनी नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, तर भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय कुमार नवे उपमुख्यमंत्री..

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

16:46 PM

 सरकार असंवेदनशील- सुप्रिया सुळे

 

Supriya Sule : अध्यादेशासाठी जरांगेंना मुंबईला यावं लागलं...सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय....

बातमीचा व्हिडीओ पाहा-

15:48 PM

ओबीसी आरक्षणाला तर धक्का लागलाच- पंकजा मुंडे

 

Pankaja Munde : मनोज जरांगेंनी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं..असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलंय....मराठा आरक्षण मिळाल्यानंतर पंकजा मुंडे अभिनंदन करताना बोलत होत्या...त्याचबरोबर ओबीसीला धक्का लागल्याचंही त्या म्हणाल्या....

बातमीचा  व्हिडीओ पाहा-

14:21 PM

पहिली ते दहावी मराठी भाषेची सक्ती करा - राज ठाकरे

 

Raj Thackeray : महाराष्ट्रात पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करा...अशी विनंती राज ठाकरेंनी शिक्षणमंत्र्यांना केली...हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही...मात्र, मराठी लोक बोलताना हिंदी भाषेचा का वापर करतात?... असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला...तर कुणीही समोर येऊदेत तुम्ही मराठीतच बोला...समोरचा मराठी बोलताना चुकला तर त्याची चेष्टा करू नका असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12:22 PM

नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

 

Bihar Nitish Kumar : बिहारमध्ये राजकीय भूकंप झालाय.. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवलाय. त्यांनी नव्यानं सरकार स्थापन करणार असल्याचा दावाही केलाय. आजच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.. ते 9व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिलीये.. संध्याकाळी 4 वाजता राजभवनात हा शपथविधी होण्यीच शक्यता आहे.. त्यासाठी राजभवनात तयारी करण्यात आलीये.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12:20 PM

आमदार आणि खासदारांमध्ये रंगला कलगीतुरा

 

Yashomati Thakur vs Navneet Rana : अमरावतीमध्ये खासदार आणि आमदारांमध्येच जुंपल्याचं पहायला मिळालं....खासदार नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यामध्ये रस्त्याच्या भूमिपूजनावरून श्रेयवादाची लढाई पहायला मिळाली...एकाच रस्त्याचं दोन वेळा भूमिपूजन करण्यात आलं...इलेक्शन आलं म्हणून हिरोईन मटकत असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवर केली...तर ज्यांचं लेकरू त्यांनीच बारसं करावं शेजारच्यांनी नाही असा पलटवार नवनीत राणांनी यशोमती ठाकूर यांच्यावर केला....

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12:15 PM

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला नारायण राणेंचा विरोध

 

Narayan Rane : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी विरोध केलाय...राज्य सरकारच्या निर्णयाशी आणि आश्वासनाशी सहमत नसल्याचं राणेंनी म्हटलंय...यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11:51 AM

मनोज जरांगेंनी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं - पंकजा मुंडे

 

Pankaja Munde : मनोज जरांगेंनी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं..असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलंय....मराठा आरक्षण मिळाल्यानंतर पंकजा मुंडे अभिनंदन करताना बोलत होत्या...त्याचबरोबर ओबीसीला धक्का लागल्याचंही त्या म्हणाल्या....

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11:47 AM

ओबीसींना बाहेर काढण्याचं काम - छगन भुजबळ

 

Chagan Bhujbal : मराठा आरक्षणावरून भुजबळांनी पुन्हा एकदा सरकारवरच निशाणा साधलाय...एका समाजाचे सरकारकडून सगळे हट्ट पुरवण्याचे काम सुरू आहेत...54 लाख ओबीसीत आले तर धक्का लागणार नाही का? असा सवाल विचारत ओबीसींना धक्का मारून बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय...तसंच ओबीसी समाजही मतदान करतो हे विसरू नका असा इशारा भुजबळांनी सरकारला दिलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10:09 AM

शेतकऱ्यांसमोर शिंदे महत्त्वाचे नाहीत - बच्चू कडू

 

Bacchu Kadu On CM Eknath Shinde : शेतक-यांसमोर शिंदे महत्त्वाचे नाहीत...असं म्हणत बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घरचा आहेर दिलाय...आमची पार्टी दोन आमदारांची असली तरी एकटा बच्चू कडू शंभर आमदारांना पुरेसा असल्याचं म्हणत बच्चू कडूंनी इशाराच दिलाय...अनेक सरकारं बदलली मात्र शेतक-यांबाबतच धोरण बदललं नाही...अमरावती येथे कबड्डी सामन्यामध्ये ते बोलत होते...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09:23 AM

शरद मोहोळ खून प्रकरणी गुन्हे शाखेने मोठी कारवाई 

 

Pune Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणी गुन्हे शाखेने मोठी कारवाई केलीय. टोळीप्रमुख गुंड विठ्ठल शेलार, गणेश मारणेसह तब्बल सतरा जणांवर गुन्हे शाखेकडून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदाराने गोळ्या झाडून शरद मोहोळचा खून केला होता. बारा तासाच्या आत गुन्हे शाखेने मुन्ना आणि इतरांना अटक केली होती. आत्तापर्यंत या  प्रकरणात १५ जणांना अटक करण्यात आलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09:21 AM

मराठा आरक्षणावरुन खडसे-पाटील आमनेसामने

 

Eknath Khadse & Gulabrao Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर टीका केलीय...शासनाने काढलेला जीआर म्हणजे मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आहे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाला नाराज न करता घोंगडं झटकण्याचं काम सरकारने केल्याची टीका खडसेंनी केलीय...तर मागील काळात आरक्षण का दिले नाही?  असा प्रश्न उपस्थित करत गुलाबराव पाटलांनी खडसेंना उत्तर दिलं..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:37 AM

उद्धव ठाकरे फेब्रुवारीत रायगड दौऱ्यावर

 

Raigad Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे 1 आणि 2 फेब्रुवारी असे दोन दिवस रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधणार आहेत. 1 फेब्रुवारी रोजी पेण, अलिबाग आणि रोहा तर 2 फेब्रुवारी रोजी पोलादपूर, म्हसळा आणि माणगाव इथं त्यांच्या सभा होतील. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते सुभाष देसाई आणि रायगड लोकसभेचे संभाव्य उमेदवार अनंत गीते असणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:11 AM

नितीश कुमार आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ?

 

Bihar Nitish Kumar : नितीश कुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.. ते 9व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिलीये.. संध्याकाळी 4 वाजता राजभवनात हा शपथविधी होण्यीच शक्यता आहे.. त्यासाठी राजभवनात तयारी करण्यात आलीये. नितीश कुमारांसह भाजप आणि जेडीयूचे 3-3 मंत्रीही आज शपथ घेण्याची शक्यता आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:06 AM

सिन्नरमध्ये बिबट्याची दहशत, नागरिक भयभीत

 

Sinnar Leopard : सिन्नरमध्ये तीन बिबट्यांच्या मुक्तसंचारामुळे नागरिक भयभीत झालेत...मनेगावच्या धोंडवीरनगर येथील विलास रभाजी पवार यांच्या अंगणात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला...तर 3 बिबट्यांचा वावर सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय...या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे...स्थानिकांनी वन विभागाने पिंजरा लावून या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी केलीये...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

Read More