Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
23 May 2024
20:47 PM

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांना मद्यविक्रीला मनाई

 

Nashik Alcohol : पुणे शहरातील कल्याणीनगरात झालेल्या ड्रंक अँड ड्राइव्ह घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. अशातच आता नाशिक शहर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. शहरामध्ये अल्पवयीन मुलामुलींना मद्यविक्री केल्यास संबंधित हॉटेल आणि बार चालकावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसंच संबंधित मुलामुलींच्या पालकांवरही कायदेशीर कारवाई होणार आहे. नियमानुसार मद्यविक्रीची वयोमर्यादा पाळण्याची सूचना नाशिक पोलिसांकडून करण्यात आली आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

19:45 PM

मुंबईत पुण्यातील अल्पवयीन कार अपघाताची पुनरावृत्ती

 

Mumbai Accident : मुंबईत पुण्यातील अल्पवयीन कार अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे. माझगाव भागात 15 वर्षीय दुचाकीस्वाराची दुस-या दुचाकीस्वाराला जोरदार धडक झाली. यात 32 वर्षीय इरफान शेख या तरुणाचा मृत्यू झाला. या नंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. तर या प्रकरणी मुलाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. 

18:57 PM

पुण्यातील अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईकांची मुजोरी

 

Pune Car Accident Case : पुण्यातील कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईकांचा मुजोरपणा.....पत्रकारांवरच संतापले अग्रवालचे नातेवाईक....पत्रकारांचा कॅमेरा हिसकवण्याचाही प्रयत्न

बातमीचा व्हिडीओ पाहा-

18:19 PM

अहमदनगरमध्ये बोगस एफडी घोटाळा 

 

Ahmednagar Bogus FD scam : नाशिकमधील नॅशनल बँकेतील बोगस एफडी प्रकरण ताजं असतानाच नगरमध्येही तशीच घटना घडलीये....अहमदनगर येथे एका मल्टिस्टेट बँकेकडून ठेविदारांना गंडा घातल्याचा प्रकार घडलाय...फसवल्या गेलेल्या ठेवीदारांनी फसवणुकीसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केलीये...113 ठेविदारांची 5 कोटी 74 लाखांची फसवणूक झालीये...नगर जिल्ह्यातील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक झालेल्यांनी तक्रार दिलीये...सात संचालकांसह अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय...14.40 टक्के व्याजाचं आमिष देण्यात आल्याचा आरोप या ठेविदारांनी केलाय..मुदत पूर्ण झाल्यानंतर पैसे काढण्यासाठी गेलेल्या ठेविदारांना पैसे देण्यात टाळाटाळ करण्यात आल्याने फसवणूक झाल्याचं लक्षात आलं..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17:21 PM

 'डोंबिवलीतील कंपन्या अंबरनाथमध्ये हलवणार', मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

 

CM Eknath Shinde :  'डोंबिवलीतील कंपन्या अंबरनाथमध्ये हलवणार'...'रासायनिक कंपन्या अंबरनाथला हलवणार'...'कंपन्या अगोदर आल्या मग वसाहती आल्या' ...डोंबिवलीतील स्फोटानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

बातमीचा व्हिडीओ पाहा-

16:14 PM

डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट, 3 जणांचा मृत्यू

 

Dombivli MIDC Blast : स्फोटानं डोंबिवली एमआयडीसी हादरलीये...एमआयडीसीमधील मेट्रोपॉलिटन कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झालाय...स्फोटामध्ये काही कामगार आणि नागरिक जखमी झालेत...तर 200 मीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्याचीही माहिती मिळतेय...त्याचबरोबर जवळपासच्या केजी कंपनी, आंबोधन या कंपन्यांमध्येही आग लागलीये..या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे...स्फोटामध्ये 3 जण जणांचा मृत्यू..तर 40 जण जखमी झालेत

14:49 PM

डोंबिवली एमआयडीसीमधील अंबर कंपनीत भीषण स्फोट

 

Explosion in company in Dombivli : डोंबिवली एमआयडीसीमधील अंबर कंपनीत भीषण स्फोट...स्फोटानं 200 मीटर परिसर हादरला...अनेक घरांच्या काचा फुटल्या....नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण..स्फोटामध्ये कामगारांसह अनेक नागरिक जखमी... अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

12:35 PM

शेततळ्यात बुडून 2 जणांचा मृत्यू

 

Shirur Drown : शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय..शिरुर तालुक्यातील पाबळ इथं ही घटना घडीलये..उन्हाळी सुट्टीला पाबळ येथे मामाच्या गावाला आलेले दोघे भाऊ आजोबांसोबत शेतशिवात गेले होते.. कडाक्याच्या उन्हामुळे दोघे शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले.. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघंही भावंड तळ्यात बुडाले.. स्थानिक नागरिकांनी या दोघांना बाहेर काढून रुग्णालयात नेलं मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.. आर्यन आणि आयुष नवले अशी या दोघांची नावं आहेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12:16 PM

सांगलीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जुंपली

 

Sangli Thackeray Camp : सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजन कार्यक्रमात बंडखोर उमेदवार विशाल पाटलांनी उपस्थिती लावल्याने ठाकरे गटाने काँग्रेसला इशारा दिलाय...विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांची हक्कालपट्टी करा...अन्यथा यापुढे महाविकास आघाडी राहणार नाही असा इशारा सांगलीतील ठाकरे गटाने दिलाय...लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या दिवसापासून काँग्रेसकडून गद्दारी झाली...त्या गद्दारीचाच अधिकृत पुरावा म्हणजेच काँग्रेसचे स्नेहभोजन असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी काँग्रेसवर केलीय...तर काँग्रेसचे कार्यकर्ते रिचार्ज व्हावेत म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं...विशाल पाटील काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत...यामागे दुसरा कोणताही उद्देश नव्हता असं स्पष्टीकरण सांगली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11:46 AM

कार कालव्यात पडून एकाचा मृत्यू

 

Haveli Car Accident : हवेली तालुक्यात एक भरधाव कार थेट कालव्यात पडलीये.. या कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघांना वाचवण्यात यश आलंय.  शिंदवणे येथे बेल्हे जेजुरी महामार्गावर हा अपघात झालाय. अमर घाडगे असं मृताचे नाव आहे.. तर जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.. महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने हा अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. 

11:45 AM

बीडमध्ये कारचा अपघात, एकाचा मृत्यू

 

Beed Accident : बीड जवळील चा-हाटा परिसरात कारचा भीषण अपघात झालाय.. कारचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार रस्ता सोडून थेट शेतात पलटी झाली... बीड अहमदनगर महामार्गावर ही दुर्घटना घडली.. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला.. सीसीटीव्हीमध्ये या अपघाताचा थरारक चित्रित झालाय... दरम्यान समोरून कुठलेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

11:19 AM

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर

 

Maharashtra Drougt Situation : राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती गंभीर झालीय...त्यामुळे तात्काळ मदत आणि उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथील करा अशी विनंती राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाला केलीय...महाराष्ट्रातील शेवटच्या 5 व्या टप्पाचं मतदान संपून दोन दिवस झालेत...लोकसभा निवडणुक आचारसंहिता शिथील झाल्यास राज्य सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांना गती मिळणार आहे...त्यामुळे आज याबाबत निवडणूक आयोगाकडून निर्णय होण्याची दाट शक्यताय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11:00 AM

कोथिंबीर जुडी 75 रुपये तर मेथी जुडी 50 रुपये

 

Nashik : कोथिंबीर जुडी ७५ रुपये तर मेथी जुडी ५० रुपयांवर पोहचलीय. नाशिक बाजार समितीत आवक घटल्यामुळे बाजारभावावर परिणाम झालाय.. पाण्याचा तुटवडा आणि उन्हाच्या तडाख्याने आवक घटलीय.. कोथिंबीर मेथीसह इतर पालेभाज्याही तेजीत आहेत. ५० टक्के आवक घटल्याचं नाशिकच्या बाजार समितीत चित्र आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10:47 AM

SDRF पथकाची बोट उलटली, 3 जणांचा मृत्यू

 

SDRF Boat Drown : अहमदनगरच्या अकोला तालुक्यात SDRF पथकाची बोट उलटून पथकातील तिघांचा मृत्यू झालाय....तर दोघांचा शोध सुरू आहे...प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध SDRF पथक घेत होतं...यावेळी ही धक्कादायक घटना घडलीय...SDRF पथकातील 4 जणांसह 1 स्थानिक बुडालाय...अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ ही घटना घडलीय...प्रवरा नदीत काल दोन जण बुडाले होते...त्यातील एकाला शोधण्यासाठी सकाळी SDRF चे पथक बोलावले होते...मात्र, SDRF पथकाची बोट उलटून ही दुर्घटना घडली...दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत...अशी माहिती प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिलीय...माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी दाखल झालेयत...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10:12 AM

गुजरातमध्ये पकडलेले दहशतवादी 40 वेळा आले होते भारतात

 

Gujarat : गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर आलेत... नुसरत आणि नफरान हे दशतवादी आतापर्यंत 40 वेळा भारतात आले होते.. तसंच सोनं आणि ड्रग्ज तस्करितही त्यांचा सहभाग होता.. श्रीलंकेतही या दहशतवाद्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.. या दहशतवाद्यांनी भारतात आणलेली हत्यारं कोणाला दिली.. आणि त्यांच्या टार्गेटवर कोण आहेत याचा तपास गुजरात एटीएसची टीम करत आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09:50 AM

मुख्यमंत्र्यांची संभाजीनगरात दुष्काळा आढावा बैठक

 

CM Eknath Shinde In Sambhajinagar : मराठवाड्याच्या दुष्काळ आणि पाणीटंचाई परिस्थितीबाबत आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढावा बैठक घेणार आहेत.. छत्रपती संभाजी नगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक होणार आहे... यासाठी मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ संभाजी नगरात बोलवण्यात आलंय.. तर आठही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी सुद्धा उपस्थित रहावे अशा पद्धतीच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.. दुपारी दोनच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजी नगरात येणार आहेत आणि त्यानंतर ही बैठक होईल

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09:48 AM

मराठवाड्याला पाणीटंचाईच्या झळा

 

Marathwada Tanker : मराठवाड्याला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यायत...उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने मराठवाडा टँकरवाडा झालाय...मराठवाड्यात सध्या 1 हजार 837 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे...मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात आता टँकरनं पाणीपुरवठा करण्याची वेळ आलीय...आणि यात सर्वाधिक टँकर हे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आहेत...संभाजीनगर जिल्ह्यात 698 टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे.. त्यामुळं मराठवाड्याचा आता थेट टँकरवाडा होण्याकडे प्रवास सुरुय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09:19 AM

मुंबईवर पाणीकपातीचं संकट

 

Mumbai Water : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये साडे 10 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहीलाय. वाढत्या उष्णतेमुळे मुंबईवर पाणी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झालीय. वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन होत असल्याने पाणी साठा कमी होतोय. तसंच 120 किलोमीटर अंतरावर पाण्याच्या पाईपलाइन मधून पाणी गळतीही होतेय.  जूनमध्ये मान्सूनचं आगमन झाले नाही तर मुंबईवर पाणी कपातीचं संकट येऊ शकते. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करावा असं आवाहन करण्यात येतंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:47 AM

जळगाव शहरात गँगवॉर सुरुच

 

Jalgaon Gangwar : जळगाव शहरात गँगवॉर सुरुच असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जुन्या वादातून तीन ते चार जणांनी धारदार शस्त्रानं वार करत तरुणाचा निर्घृण खून केला.. किशोर सोनवणे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. खुनाप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय तर इतर मारेकरी फरार झालेत. रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु होतं.. 

07:58 AM

काँग्रेसच्या स्नेहभोजनात बंडखोर विशाल पाटलांची उपस्थिती

 

Sangli Vishal Patil : सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजन कार्यक्रमात बंडखोर उमेदवार विशाल पाटलांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय...विशाल पाटलांच्या उपस्थितीमुळे सांगलीत नक्की काँग्रेसचा पाठिंबा कुणाला होता...? असा प्रश्न उपस्थित केला जातोय...काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणुकीत प्रचारासाठी राबलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजन आयोजित केलं होतं...विशेष म्हणजे स्नेहभोजनाच्या कार्यक्रम पत्रिकेत प्रमुख उपस्थिती म्हणून विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या नावांचा उल्लेख होता...वास्तविक मविआतील सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस असल्याचा निवडणुकीदरम्यान काँग्रेसकडून वारंवार सांगण्यात आलं होतं...मात्र, स्नेह भोजनाला विशाल पाटलांची प्रमुख उपस्थिती असल्याने चर्चांना उधाण आलंय...

07:23 AM

इरसालवाडी दरडग्रस्तांची परवड सुरुच

 

Raigad Irasalwadi : रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसालवाडी येथील दरडग्रस्तांची अजूनही परवड सुरू आहे. जुलै महिन्यात इरसाल वाडीवर दरड कोसळून 84 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर उर्वरित दरडग्रस्तांचे चौक जवळ तात्पुरत्या कंटेनर शेडमध्ये पुनर्वसन करण्यात आले. या कुटुंबांसाठी मानिवली इथं सिडकोच्या माध्यमातून घरे बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र त्यांचे काम अद्याप अपूर्ण आहे. दुसरीकडे कंटेनर शेड मध्ये राहणाऱ्या कुटुंबांना वीज, पाणी टंचाई बरोबरच उन्हाचे चटके सहन करावे लागतायत. सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा हे ग्रामस्थ व्यक्त करतायत..  

07:21 AM

काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील यांचं निधन

 

Kolhapur MLA : काँग्रेसचे करवीरचे आमदार पी एन पाटील यांचं निधन झालंय. वयाच्या ७१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.. पी. एन. पाटील यांच्यावर चार दिवसांपासून उपचार सुरू होते. बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता.. गांधी घराण्याच्या जवळचे म्हणून आमदार पीएन पाटील यांची ओळख होती.. करवीर विधानसभा मतदारसंघातून 2004 आणि 2019 असे 2 टर्म ते आमदार झाले होते. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

Read More