Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक 'झी 24तास'वर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

 Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक 'झी 24तास'वर
LIVE Blog
19 January 2024
20:28 PM

मुंब्र्याच्या मैदानात जितेंद्र आव्हाडांविरोधात नजीब मुल्ला?

 

Jitendra Awhad vs Najib Mulla : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर मुंब्र्यातून आव्हाडांविरोधात नजीब मुल्लांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. नजीब मुल्लांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे गटाकडून त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर ठाण्यात लावण्यात आले आहेत. त्यात डॅशिंग दमदार, भावी आमदार असा उल्लेख करण्यात आलाय.
नजीब मुल्ला हे एकेकाळी जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. मात्र आता ते आव्हाडांचे कट्टर विरोधक आहेत. अलिकडेच शिंदे गटाचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नजीब मुल्लांचा उल्लेख आमदारकीसाठी परफेक्ट मटेरियल असा केला होता. त्यानंतर आता शिंदे गटाकडून मुल्लांचे बॅनर लागल्यानं त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातंय. अर्थात मुल्ला नेमके कोणत्या गटाचे..अजित पवार गटाचे की शिंदे गटाचे हे मात्र गुलदस्त्यातच आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

19:43 PM

संभाजीनगरमध्ये  ट्रकनं 3 कार, 3 दुचाकी चिरडल्या; 2 ठार

 

Sambhajinagar Accident : संभाजीनगर पैठण रोडवर भीषण अपघात झालाय...उतारावरून येणार ट्रक ने 3 कार आणि 3 दुचाकी चिरडल्या...धुळे सोलापूर हायवे वरून पैठण रोडवर खाली उतरत होता ट्रक... अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी झालेत...मृतांमध्ये एका महिलेचा समावेश...

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

18:37 PM

'मनोज जरांगेंनी लोकसभेची निवडणूक लढवावी', प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

 

Prakash Ambedkar on Manoj Jarange : मनोज जरांगेंनी लोकसभेची निवडणूक लढवावी असा सल्ला वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी दिलाय. लोकसभेत गेल्यानंतरच प्रश्न सुटतात, कायदेशीर मार्गानं प्रश्न सोडवायचे असतील तर लोकसभा निवडणुकीबाबत जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी असंही आंबेडकरांनी म्हंटलंय. 

18:27 PM

'कार्यक्रम घरांचा, बोलायचं पवारांवर', शरद पवारांचा मोदींना टोला

 

Sharad Pawar on PM Modi : मोदी सोलापुरात आले आहेत, शंभर टक्के सांगतो त्यांच्या भाषणात आपल्यावर टीका केली असणार, कार्यक्रम जरी घरांचा असला तरी बोलायचं पवारांवर हीच मोदींची भूमिका असते असं सांगत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावलाय. राज्यकर्त्यांनी आमचा संताजी-धनाजीसारखा धसका घेतलाय असही पवारांनी म्हंटलय. 

17:11 PM

22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर 

 

Ram Mandir Inaugration : 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीय. राम मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्त राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे 22 जानेवारीला सरकारी कार्यालयं, शाळा, कॉलेजेसना सुट्टी असेल. 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी अनेक आमदारांकडून करण्यात येत होती. त्यानंतर राज्य सरकारनं सुट्टीचा निर्णय जाहीर केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

16:53 PM

मुंबईच्या माजी महापौर​ किशोरी पेडणेकरांना ईडीचं समन्स

 

ED summons to Kishori Pednekar : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांना ईडीनं समन्स पाठवलंय... कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांनी चौकशी होणाराय.. येत्या गुरूवारी चौकशीसाठी हजर राहावं, असं फर्मान ईडीनं काढलंय.. शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा दणका मानला जातोय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

16:31 PM

 रोहित पवार यांना ईडी नोटीस 

 

ED notice to Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं नोटीस बजावलीय. बारामती ऍग्रो कंपनी तसच इतर खासगी कंपन्यांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीनं ही नोटीस बजावलीय. पुढील आठवड्यात ईडीमार्फत रोहित पवारांची चौकशी होण्याची शक्यता आहे. याआधीही रोहित पवार यांच्या कारखान्यांवर आयकर विभागानं छापे टाकले होते. 

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

15:52 PM

रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक 'झी 24तास'वर

 

Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक प्रथमच समोर आलीये.. फक्त झी 24तासच्या हाती रामलल्लाच्या आ मूर्तीची झलक पाहायला मिळतीये... मुख्य राम मंदिरातील गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे... याच मूर्तीची 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

15:12 PM

'संघर्ष न करणारे मलिदा लाटतायत', उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

 

 

Uddhav Thackeray on BJP : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज भाजप पदाधिकारी, संघ परिवारातील पदाधिकारी आणि उत्तर भारतीयांनी ठाकरे गटात प्रवेश केला...यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय...हिंदुत्त्वासाठी संघर्ष करणारे त्यावेळी वेगळे होते...मात्र, आता लाभ घेणारे वेगळे आहेत...ज्यांनी संघर्ष केला त्यांना बाजूला करण्यात आलंय... बाळासाहेबांनी वाचवलं तेच लोक शिवसेना संपवायला निघालेयत...त्यामुळे हिंदुत्वात भेद करणा-यांपासून सावध राहा असं म्हणत ठाकरेंनी भाजपला टोला लगावलाय...

14:21 PM

उपोषण सोडायला आलेले मंत्री कुठे आहेत? - मनोज जरांगे

 

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी मुंबईत येण्याचा निर्धारच केलाय...आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतून हटणार नसल्याचं जरांगेंनी म्हटलंय...उपोषण सोडायला आलेले ते मंत्री कुठे आहेत?...मराठ्यांना फसवून कुठे लपून बसणार असा सवाल विचारत मंत्री महाजनांवर रोष व्यक्त केलाय...तर 54 लाख नोंदी सापडूनही प्रमाणपत्र दिले नाही...मग मसुद्याचा काय फायदा? असा संतप्त सवाल उपस्थित केलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

14:11 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणादरम्यान भावुक

 

Solapur Prime Minister Narendra Modi : सोलापुरात भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले...आज मोदींच्या हस्ते सोलापुरात कामगारांसाठी बांधलेल्या 15 हजार घरांचं लोकार्पण करण्यात आलं...यावेळी ही घरं पाहिल्यानंतर मलादेखील लहानपणी असंच घर मिळायला हवं होतं...असं म्हणताना मोदींना अश्रू अनावर झाले...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13:07 PM

रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर

 

Aayodhya Ram Murti First Look : रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक प्रथमच समोर आलीये.. फक्त झी 24तासच्या हाती रामलल्लाच्या आ मूर्तीची झलक पाहायला मिळतीये...  मुख्य राम मंदिरातील गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे... याच मूर्तीची 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12:59 PM

क्लासमध्ये हार्ट अ‍ॅटॅकने मुलाचा मृत्यू

 

Madhya Pradesh Student Death : कोचिंग क्लासमध्ये शिकतानाच विद्यार्थ्यांचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू झालाय...विद्यार्थी क्लासमध्ये बसला होता...त्यावेळी तो अचानक बेंचवरून खाली कोसळला...हा सगळा प्रकार क्लासमधील सीसीटीव्हीत चित्रित झालाय...राजा लोधी असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे...तो 18 वर्षांचा होता...मध्य प्रदेशमधील पीएससीची तो तयारी करत होता...यावेळी क्लासमध्ये अचानक खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला...ही दुर्दैवी घटना मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये घडलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12:46 PM

PM Modi Solapur Visit Live : आमच्या सरकारच्या काळात 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले

"बराच वेळ गरिबी हटावच्या घोषणा देण्यात आल्या. पण या घोषणांनंतरही गरिबी गेली नाही. याचे सगळ्यात मोठं कारण म्हणजे गरिबांच्या नावावर योजना आणल्या जायच्या पण त्याचा लाभ योग्य लोकाना मिळत नव्हता. आधीच्या सरकारमध्ये गरिबांच्या हक्काचा पैसा मध्येच लुटला जायचा. आधीच्या सरकारची निती आणि निष्ठा चुकीची होती. पण आमची निती स्वच्छ आहे. आमची निष्ठा देशाप्रती आहे. भारताला विकसित राष्ट्र करण्यात आहे. मोदीनी गॅरंटी दिली की सरकारी लाभ हा थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचणार. लाभार्थ्यांच्या मध्ये असणाऱ्या बाजूला करण्याचे काम केलं. गेल्या दहा वर्षात 30 लाख कोटींपेक्षा जास्त पैसे गरीब, शेतकरी आणि युवकांच्या खात्यात जमा केले. जनधन, आधार आणि मोबाईल कवच बनवून जवळपास 10 कोटी बोगस लाभार्थ्यांना बाजूला गेलं. ज्यांचा जन्म सुद्धा झाला नाही ते तुमचे पैसे खात होते. आमच्या सरकारने काम सुरु केलं तेव्हा त्याचे परिणाम समोर आले. आमच्या सरकारच्या काळात 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

12:20 PM

PM Modi Solapur Visit Live : माझे सोलापूर सोबत जवळचे संबंध आहेत-  पंतप्रधान मोदी

आपल्या देशात बराच काळापासून गरिबी हटावच्या घोषणा देण्यात आल्या. पण या घोषणांमुळेही गरिबी दूर झाली नाही. अर्धी भाकरी खाऊ असे सांगायचे. पण असं का? लोक अर्धी भाकरी खाऊ आणि तुम्हाला मत देऊ असं सांगायचे. पण अर्धी भाकरी का खायची. मोदी आहे तर पूर्ण भाकरी खायला मिळणार आहे. जनतेचे हेच स्वप्न आहे. हाच फरक आहे. माझे सोलापूर सोबत जवळचे संबंध आहेत. अहमदाबादमध्ये पद्मशाली समाजाची अनेक कुटुंबे राहतात. माझं नशीब होतं की पूर्वी मला महिन्यातून तीन ते चार वेळा पद्मशाली समाजाचे लोक जेवायला घालत होते. छोटं घर असायचं पण मला कधी उपाशी पोटी झोपू नाही दिलं, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

12:11 PM

PM Modi Solapur Visit Live : तुमची स्वप्ने पूर्ण करणे हा माझा संकल्प - पंतप्रधान मोदी

2014 मध्ये सरकार आलं तेव्हाच मी सांगितलं होतं की माझं सरकार गरिबांना समर्पित सरकार आहे. त्यामुळे आम्ही एका मागून एक अशा योजना लागू केल्या ज्यामुळे गरिबांच्या जीवन सोप्प होईल. घर, शौचालय नसल्यामुळे गरिबांना अपमान सहन करावा लागत होता. त्यामुळे आम्ही घर आणि शौचालयाच्या बांधकामावर भर दिला. नव्या घरात राहायला जाणाऱ्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही मोठी स्वप्ने पाहा. मोदीची गॅरंटी आहे की तुमचं स्वप्न हा माझा संकल्प आहे. 

12:00 PM

PM Modi Solapur Visit Live : तुमचं जीवन सुखाने भरलेलं असावं ही प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना - पंतप्रधान मोदी

लाखो रुपयांची ही घरे तुमची संपत्ती आहे. ज्या कुटुंबांना ही घरे मिळाली आहेत त्यांच्या अनेक पिढ्या बेघर राहिल्या आहेत. मला विश्वास आहे की या घरांसोबत तुमच्या मुलांना तुम्ही जे पाहिलं ते पाहावं लागणार नाही.  22 जानेवारीला तुम्ही जी रामज्योती पेटवणार आहात त्याने तुमच्या जीवनात गरिबीचा अंधार दूर करण्याची प्रेरणा मिळेल. तुमचं जीवन आनंदाने, सुखाने भरलेलं असावं ही प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना आहे. आमचं सरकार पहिल्या दिवसापासून रामाच्या आदर्शावर चालून देशात चांगले प्रशासन आणि प्रामाणिकपणाचे राज्य असावे यासाठी प्रयत्न करत आहे. हे रामराज्य आहे ज्यामध्ये सर्वांच्या विकासाची प्रेरणा दिली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

12:00 PM

PM Modi Solapur Visit Live : तुमचं जीवन सुखाने भरलेलं असावं ही प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना - पंतप्रधान मोदी

लाखो रुपयांची ही घरे तुमची संपत्ती आहे. ज्या कुटुंबांना ही घरे मिळाली आहेत त्यांच्या अनेक पिढ्या बेघर राहिल्या आहेत. मला विश्वास आहे की या घरांसोबत तुमच्या मुलांना तुम्ही जे पाहिलं ते पाहावं लागणार नाही.  22 जानेवारीला तुम्ही जी रामज्योती पेटवणार आहात त्याने तुमच्या जीवनात गरिबीचा अंधार दूर करण्याची प्रेरणा मिळेल. तुमचं जीवन आनंदाने, सुखाने भरलेलं असावं ही प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना आहे. आमचं सरकार पहिल्या दिवसापासून रामाच्या आदर्शावर चालून देशात चांगले प्रशासन आणि प्रामाणिकपणाचे राज्य असावे यासाठी प्रयत्न करत आहे. हे रामराज्य आहे ज्यामध्ये सर्वांच्या विकासाची प्रेरणा दिली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

11:50 AM

PM Modi Solapur Visit Live : गृहप्रकल्प पाहून पंतप्रधान मोदी भावूक

सोलापुरातल्या हजारो मजुरांसाठी आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण होत आहे. आज पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशाच्या सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे उद्घाटन झालं आहे. मी ती घरं जाऊन पाहून आलो. ही घरं पाहिल्यानंतर मला देखील वाटलं मला पण बालपणी अशा घरात राहायची संधी मिळायला पाहिजे होतं. या गोष्टी पाहून मनाला आनंद होत आहे. हजारो कुटुंबाची स्वप्ने जेव्हा पूर्ण होतात तेव्हा त्यांचे आशीर्वाद ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यासाठी आलो होतो तेव्हा मी गॅरंटी दिली होती की उद्घाटनासुद्धा मीच येणार. आज मोदींनी गॅरंटी पूर्ण केली आहे.

11:31 AM

PM Modi Solapur Visit Live : प्रगतीशील सरकारमुळे महाराष्ट्राचे नाव होत आहे

महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांसाठी आज दोन हजार कोटी रुपयांचे सात अमृत प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली आहे. मी महाराष्ट्रातल्या लोकांना शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री म्हणाले की,  मोदींमुळे महाराष्ट्राचा गौरव होत आहे. हे ऐकायला खूप चांगले वाटते. प्रगतीशील सरकारमुळे महाराष्ट्राचे नाव होत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रास अभिनंदनास पात्र आहे.

10:39 AM

PM Modi Solapur Visit Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंधरा हजार घरांचे वाटप होणार आहे.  प्रातिनिधिक स्वरूपात पंतप्रधान मोदींना पाच लाभार्थ्यांना घराचे वाटप करणार आहेत.

10:21 AM

रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात

 

Buldhana Ravikant Tupkar : रेल रोको आंदोलन करण्यापूर्वीच रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पहायला मिळाले. तुपकरांच्या अटकेविरोधात आंदोलन करण्यात आलं. पहाटेच मलकापूरमध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रेलरोको करण्यात आला. तुपकरांच्या पत्नीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी यावेळी तुपकरांच्या पत्नीसह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सोयाबीन-कापसला दरवाढ, पीकविमा, नुकसान भरपाई, दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदत देण्याची मागणी रविकांत तुपकरांनी केलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:47 AM

16 वर्षांखालील मुलांना नो कोचिंग क्लास

 

Coaching Class New Rule : 16 वर्षांखालील मुलांना आता कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश मिळणार नाहीये....खासगी कोचिंग क्लासच्या मनमानी कारभारावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचललीयत...कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्यायत...त्यानुसार 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये प्रवेश देता येणार नाही...चांगले गुण, रँकबाबत गॅरंटी देणारे दावे करता येणार नाहीत...केंद्र सरकारच्या नियमांचं उल्लंघन केलं तर क्लासेसला 25 हजार ते 1 लाखांचा दंड आकारला जाणाराय...तसंच कुणालाही खासगी कोचिंग क्लास उघडता येणार नाही...त्यासाठी नोंदणी महत्त्वाची आहे...त्याशिवाय अव्वाच्या सव्वा फी वसूल केल्यास कारवाई केली जाणाराय...खाजगी कोचिंग सेंटर्सची वाढती संख्या आणि आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे केंद्र सरकारने ही मार्गदर्शक सूचना जारी केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:42 AM

उत्तर प्रदेश एटीएसनं 3 संशयितांना घेतलं ताब्यात

 

Ayodhya 3 Suspect Arrest : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी उत्तर प्रदेश एटीएसनं 3 संशयितांना ताब्यात घेतलंय. तिघेही संशयित हे अर्श डल्ला गँगचे सदस्य असल्याची माहिती समोर येतेय. 22 जानेवारीला राम मंदिरामध्ये होणा-या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. एसपीजी, सीआयएसएफ, स्पेशल कमांडो, सीआरपीएफ, एनएसजी आणि एटीएस यांनी अयोध्येमध्ये सुरक्षा व्यवस्थेचा मोर्चा सांभाळलेला आहे. अयोध्येजवळच्या सर्व सीमा सिल करण्यात आल्या आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह हजारो व्हीआयपी निमंत्रित उपस्थित राहणारेत. त्यामुळे अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:27 AM

गुजरातमध्ये बोट उलटून 16 जणांचा मृत्यू

 

Gujarat boat Drown : बडोद्यातील हरणी तलावात बोट उलटून 16 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 14 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा समावेश आहे. न्यू सनराइज शाळेचे विद्यार्थी हरणी तलावावर सहलीसाठी आले होते. बोटिंग करण्यासाठी 27 जण बोटीत बसले. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक जण बोटीत बसल्यानं बोट डगमगू लागली. यावेळी शाळकरी मुलांमध्ये मोठा गोंधळ उडाला आणि बोट बुडाली. त्यातील एकानेही सुरक्षेसाठी लाइफ जॅकेट घातलं नव्हतं. अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांचा शोध सुरू केलाय. क्षमतेपेक्षा अधिक जणांना बोटीत बसवणारा बोट मालक फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:24 AM

नागपुरात 2 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू

 

Nagpur Fire : नागपुरात शेकोटी पेटवताना दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झालाय.. कडाक्याच्या थंडीमुळे या दोघांनी घरातच शेकोटी पेटवली होती मात्र शेकोटीमुळे झोपडीला आग लागली आणि या आगीत दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला.. या दुर्घटनेत त्यांची बहीण थोडक्यात बचावली.. नागपुरातील हजारीपहाड गोरखेडा कॉम्प्लेक्स भागात ही दुर्घटना घडली.. यातील एका चिमुकल्याचं वय 7 तर दुस-याचंवय अवघं 2 वर्षे आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतीये..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:14 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर

 

Prime Minister Narendra Modi In Solapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत...सकाळी साडेदहा वाजता पंतप्रधान मोदी यांचे सोलापुरात आगमन होणार आहे...मोदींच्या हस्ते वृक्षारोपण केलं जाणार आहे...त्यानंतर रे नगर मॉडेल हाऊसची पाहणी करून विडी कामगारांशी संवाद साधणार आहेत...या संवादानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे . यावेळी एकूण 15 हजार घरकुलाचे वाटप केलं जाणार आहे. या घरकुलांमुळे असंघटित क्षेत्रातील 30 हजार कामगारांच्या घरकुलाचे स्वप्न साकार होणाराय...पंतप्रधान मोदी यांचा दीड तासाचा एकूण दौरा असून यावेळी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल उपस्थित असणार आहेत...विशेष म्हणजे महिनाभरात मोदी दुस-यांदा महाराष्ट्र दौ-यावर येत आहेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

Read More