Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Government Delegation Visits Jarange : राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Government Delegation Visits Jarange : राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला
LIVE Blog
18 January 2024
20:18 PM

जरांगे आणि शिष्टमंडळ बैठकीत नव्या मसुद्यावर तोडगा नाहीच

 

Government Delegation Visits Jarange : जरांगे आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्या आजच्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. सरकारच्या शिष्टमंडळानं आज सलग दुसऱ्या दिवशी जरांगेंची अंतरवाली सराटीत भेट घेतली. या भेटीत सरकारनं सगे सोयरे मसुद्यावर चर्चा झाली. या नव्या मसुद्यावर जरांगे उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत निर्णय घेणार आहेत. दरम्यान कुणबी नोंदी मिळूनही नोंदी न दिल्यानं जरांगे आक्रमक झालेत. नोंदी न मिळाल्याची तक्रार करताच बच्चू कडूंनीही विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. कलेक्टर झोपा काढतायत का? अशा शब्दांत कडूंनी  कानउघडणी केली.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

18:47 PM

बीएमसी खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणला ईडी कोठडी

 

Suraj Chavan in ED Custody : सूरज चव्हाणला चार दिवसांची ईडी कोठडी.. ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाणला 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी.. बीएमसी खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाणला अटक.. ईडी अधिकाऱ्यांनी सूरज चव्हाणची वैद्यकीय चौकशी केली.. सूरज चव्हाणची ईडी कोठडीत रवानगी.

 

17:26 PM

अहमदनगरमध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटेंकडून तोडफोड

 

Vandalism in Ahmednagar : अहमदनगर जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांच्याकडून पाणीपुरवठा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. नगर तालुक्यातील काही गावांमध्ये जल जीवन मिशनच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रकाश पोटे यांनी केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

17:05 PM

पुण्यात चिकन, मटण दुकानं बंद ठेवण्याचा कुरेशी समाजाचा निर्णय

 

Pune no Non-Veg : 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुण्यातली चिकन, मटणाची दुकानं बंद राहणार आहेत. पुणे शहर कुरेशी समाजानं हा निर्णय घेतलाय. 22 जानेवारीला मटण, चिकन दुकानं बंद ठेवून, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लाडू आणि पेढे वाटप करण्यात येणार आहे. ऑल इंडिया जमीयतुल कुरेश एक्शन कमेटीच्यावतीने 22 जानेवारीला कुरेशी समाज आपले सर्व व्यवहार बंद करून या कार्यक्रमात आनंद उत्साहाने सहभागी होणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

16:18 PM

22 जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे सुट्टी

 

Big News for Central Employees : कर्मचार्‍यांच्या उदंड भावना आणि त्यांच्या विनंतीमुळे, अयोध्येत राम मंदिरात होणाऱ्या रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापना निमित्त केंद्र सरकारने 22 जानेवारी 2024 रोजी सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापनांमध्ये दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

14:29 PM

'मोदींचं वय 80च्या पुढे गेल्यावर विचारू', अजित पवारांचा नाना पटोलेंना टोला

 

Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : आरक्षण कायदेशीर कसं देता येईल याचा विचार होईल...प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांना बळी पडू नका...आम्ही सगळ्यांना सामावून घेणारी माणसं...गाडीतील व्हिडिओ व्हायरल करणारा मुर्ख...व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांची कीव येते...नाना किती पार्ट्या फिरून आलेत...मोदींचं वय 80च्या पुढे गेल्यावर विचारू...उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाना पटोलेंना टोला

बातमीचा व्हिडीओ पाहा-

13:44 PM

'अजित पवारांनी मोदींचं वय विचारावं',नाना पटोलेंचं अजित पवारांना आव्हान

 

Nana Patole on Ajit Pawar : अजित पवार आपल्या काकांचं काय वय विचारता त्यांनी मोदी साहेबांचं वय विचारलं पाहिजे...असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांना आव्हान केलंय....अजित पवार सातत्याने शरद पवारांच्या वयावरून जाहीर भाषणातून टीका करत आहेत...त्याला नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळतंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

13:02 PM

मराठा समाजाचं सर्वेक्षण होणार

 

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे सर्वेक्षण 23 जानेवारीपासून सुरू होणार...महसूल विभागाअंतर्गत मराठा समाजाचे संपूर्णपणे सर्वेक्षण केलं जाणार.. या संदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 20 जानेवारीला जिल्हाधिकार्यालय आणि महानगरपालिका या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

12:37 PM

अंबादास दानवेंना भाजपची ऑफर?

 

Ambadas Danve : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर असल्याचा दावा केलाय. मात्र आपण शिवसैनिक असून गद्दारीचा टिळा कपाळावर लावणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

12:16 PM

'साळवी, चव्हाणांवर राजकीय सूडानं कारवाई',संजय राऊतांचा आरोप

 

Sanjay Raut : राजन साळवी आणि सूरज चव्हाण यांच्यावर राजकीय सूडाने कारवाया होत असून, शिवसेना सोडून शिंदे गटात येण्यासाठी दबाव असल्याचा आरोप राऊतांनी केलाय...दोन दिवसांपूर्वी मुंबईत जनता न्यायालय घेतल्यानंतर सूरज चव्हाण यांच्यावर लगेच कारवाई करण्यात आली...ही राजकीय अटक असल्याची प्रतिक्रिया राऊतांनी दिलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11:32 AM

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींवर गुन्हा दाखल

 

Rajan Salvi :  एसीबी चौकशीनंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आलाय. उत्पन्नापेक्षा 118% संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आलाय. तसंच आरोपी म्हणून स्वतः राजन साळवी, पत्नी आणि त्यांच्या मुलाचा समावेश आहे. राजन साळवींच्या यांच्या घरी आज सकाळीच एसीबीनं धाड टाकली...रत्नागिरी, राजापूरसह इतर ठिकाणी धाड टाकली. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत...मालमत्ता प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी झालीय...आता एसीबीनं गुन्हा दाखल केल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ झालीय. 

11:04 AM

राजू शेट्टींना भाजपची ऑफर?

 

Raju Shetty : सुशीलकुमार शिंदेंनीतर आता स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनीही भाजपकडून ऑफर आल्याचा दावा केलाय.. भाजपनं मध्यस्थामार्फत आपल्याशी संपर्क साधला आणि दिल्लीत येऊन अमित शाह आणि इतर नेत्यांना भेटावं असं सांगण्यात आल्याचा दावा राजू शेट्टींनी केलाय. मात्र आपल्याला भाजपशी हातमिळवणी करण्याची इच्छा नाही असं म्हणत शेट्टींनी भाजपची ऑफर धुडकावलीये... शेतक-यांच्या प्रश्नांवरुन सगळ्यांनी आपल्याला फसवलंय त्यामुळे आता कोणासोबतही जाणार नाही असा निर्णय शेट्टींनी घेतलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

10:30 AM

21 जानेवारीला उद्धव ठाकरेंचा शिवनेरी दौरा

 

Uddhav Thackeray will visit Shivneri​ :  उद्धव ठाकरे यांचा 21 जानेवारीला शिवनेरी दौरा...शिवनेरी गडावर जाऊन तिथली माती कलशात भरुन काळाराम मंदिरात घेऊन जाणार...उद्धव ठाकरे 22 जानेवारीला काळाराम मंदिरात रामाची आरती करणार आहेत, तसंच गोदावरीच्या काठी आरती करणार आहेत...यावेळी शिवनेरी गडावरची माती गोदावरीमध्ये सोडणार असल्याची माहिती...तर 23 जानेवारीला नाशिकमध्ये मोठा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

10:01 AM

आमदार राजन साळवींच्या घरी ACBची धाड

 

ACB raids MLA Rajan Salvi's house : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या यांच्या घरी एसीबीची धाड पडलीय...रत्नागिरी, राजापूरसह इतर ठिकाणी धाड टाकल्याची माहिती समोर आलीय...गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत...मालमत्ता प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी झालीय...आता एसीबीने घरावर धाड टाकल्याने साळवींच्या अडचणीत वाढ झालीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

09:23 AM

जालन्यातील स्टील कंपन्यांवर GSTचे छापे

 

GST Raids in Jalna : जालना औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या गिताई आणि रुपम स्टील कंपन्यांवर केंद्रीय जीएसटी विभागाचे छापेमारी केलीय.सलग 3 दिवस छापेमारी सुरू होती. या छापेमारीत काही रेकॉर्ड जप्त केल्याचीही माहिती समोर आलीय. या कारवाईमुळे औद्योगिक क्षेत्रात एकाच खळबळ उडालीय. या कंपन्यांनी स्टील विक्रीच्या बिलात हेराफेरी केल्याचा संशय व्यक्त केला जातोय.त्यामुळेच जीएसटी विभागाने ही छापेमारी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

09:09 AM

अंधेरीचा गोखले पूल खुला होणार?

 

Andheri Gokhale Bridge : मुंबईच्या अंधेरीतील गोखले पुलाचा पहिला टप्पा नागरिकांसाठी खुला होऊ शकतो...पहिल्या टप्प्याचे काम फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करा...मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी याबाबत निर्देश दिलेत...अंधेरी पूर्व आणि पश्चिमच्या वाहतुकीसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे...नोव्हेंबर 2022मध्ये हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता...तांत्रिक बाबींमुळे पुलाच्या कामाला अतिरिक्त कालावधी लागल्याचं महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय...तरीही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्याचे निर्देश चहल यांनी दिलेत..

08:31 AM

पाकिस्तानचा इराणमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला

 

Pakistan attack on Iran : पाकिस्तान आणि इराण या दोन देशांतील तणाव विकोपाला गेलाय.. इराणनं बलुचिस्तानवर केलेल्या हल्ल्याचा बदला पाकिस्ताननं घेतलाय. पाकिस्ताननंही इराणवर हल्ला केलाय. इराणमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केल्याची माहिती पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांनी दिलीये.. इराणननं बलुचिस्तानातील जैश उल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळावर एअरस्ट्राइक केला होता. यात दोन लहान मुली दगावल्याचा आरोप पाकिस्तानं केला. या हल्ल्याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील असा इशाराही पाकिस्ताननं दिला होता. दोन्ही देशांतील द्विपक्षीय चर्चाही बंद करण्यात आली होती. तसंच पाकिस्ताननं आपल्या राजदूतांनाही माघारी बोलावलं होतं. त्यानंतर पाकिस्तानं इराणवर हा हल्ला केलाय.

08:02 AM

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर आज 6 तासांचा ब्लॉक

 

Pune Mumbai Expressway Block : पुणे-मुंबई एक्सप्रेसवर आज सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे...एक्सप्रेसवर मुंबईकडील लेनवर कामासाठी हा ब्लॉक घेतला जातोय...मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन तर्फे पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचे काम चिखले ब्रिज येथे करण्यात येणार आहे...त्यासाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणाराय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

07:26 AM

बदलापूर खरवई एमआयडीसीत भीषण स्फोट, 5 कामगार गंभीर जखमी

 

Badlapur MIDC Blast : बदलापूर-खरवई एमआयडीसीतील व्ही. के.केमिकल कंपनीत भीषण स्फोट झालाय. पहाटे पावणेपाच वाजता ही घटना घडली. कंपनीबाहेर दोन टेम्पो उभे होते. त्यातील केमिकलनं आधी पेट घेतला आणि त्यानंतर संपूर्ण कंपनीत आग पसरल्याचं कामगारांनी सांगितलंय. स्फोट एवढा भीषण होता की त्याचे हादरे जवळपासच्या 4 ते 5 किलोमीटरपर्यंत जाणवले. या दुर्घटनेत कंपनीतील 4 ते 5 कामगार गंभीर जखमी झालेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

07:23 AM

साताऱ्याच्या कराडमध्ये  भीषण स्फोटात, 7 ते 8 जण जखमी

 

Satara Blast : साता-यातही भीषण स्फोटात 7 ते 8 जणं जखमी झालेत. कराडच्या बुधवार पेठेत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. रात्री साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गॅस गळतीमुळे सिलेंडरचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय. या स्फोटातील काही जखमींना कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात तर काहींना कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

Read More