Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
15 January 2024
22:13 PM

पळपुट्यांनी राम मंदिरावर बोलू नये- संजय राऊत

 

Sanjay Raut : राम मंदिरासंदर्भातलं शिवसेनेचं योगदान प्रत्येक हिंदूला माहिती आहे.. असा पलटवार संजय राऊतांनी फडणवीसांवर केलाय.. राम मंदिरासाठी आम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या, तेव्हा उद्धव ठाकरे फोटोग्राफी करायचे अशी टीका काल फडणवीसांनी केली होती. त्यालाच राऊतांनी जोरदार उत्तर दिलंय. अयोध्येचं मैदान सोडून पळणा-यांनी राम मंदिरावर बोलू नये असा टोलाही राऊतांनी लगावलाय. तर राऊतांनी राम मंदिरातल्या योगदानाचा एकतरी पुरावा द्यावा.. सामना वृत्तपत्रात एक महिना नोकरी करेन असं आव्हान भाजप आमदार नितेश राणेंनी दिलंय..

21:38 PM

धारावीकरांना मिळणार 350चौ. फुटाचं घर

 

Dharavi Redevelopment : धारावी पुनर्विकास प्रकल्पात पात्र झोपडीधारकांना 350 चौरस फुटाचं घर मिळणाराय... धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवणा-या अदानी समुहाच्या कंपनीनं ही अधिकृत घोषणा केलीय... स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालयं असणारी ही घरं असतील. इतर एसआरए योजनेपेक्षा 17 टक्के जादा चटई क्षेत्रफळ धारावीत दिलं जाणाराय, अशी माहिती डीआरपीपीएल कंपनीनं दिलीय.. १ जानेवारी २००० आधीच्या झोपड्या या योजनेत पात्र ठरणार आहेत. दरम्यान, धारावीकर नागरिक 400 ते 500 चौरस फुट घरासाठी आग्रही आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

21:20 PM

'प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला श्रीराम येणार नाहीत', तेजप्रताप यादवांचा दावा

 

Tejpratap Yadav : प्रभू श्रीराम 22 जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येणार नाहीत.. असा दावा बिहारचे मंत्री तेजप्रताप यादव यांनी केलंय. प्रभू श्रीराम हे आपल्या स्वप्नात आले.. 22 जानेवारीला होणारा सोहळा हे सगळं ढोंग असून त्या कार्यक्रमाला ते येणार नाहीत असा दावा तेजप्रताप यांनी केला. तेजप्रताप यादव हे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पूत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे बंधू आहेत.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

20:39 PM

काँग्रेसचे आमदार शिवसेनेच्या वाटेवर?

 

Maharashtra Politics : मिलिंद देवरांच्या शिवसेना प्रवेशानंतर काँग्रेसला आणखी धक्का बसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...काँग्रेसचे 6 ते 7 आमदार शिवसेनेच्या वाटेवर असून, गुप्त बैठका पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर अनेक काँग्रेस आमदार शिवसेनेत येण्यात तयार आहेत...येणाऱ्या काळात शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

19:59 PM

अकोल्याची जागा  प्रकाश आंबेडकरांना सोडणार- रामदास आठवले

 

Ramdas Athawale on Prakash Ambedkar : अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडलीय असं मोठं विधान रामदास आठवलेंनी केलंय. जागावाटपाबाबत त्यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी हे विधान केलंय. आता आठवले म्हणतात तसं महायुती खरंच अकोल्याची जागा आंबेडकरांना देणार का, यावरूनही राजकीय खल होण्याची शक्यता आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

18:36 PM

'आम्ही बंड केल्यामुळेच भाजप सत्तेत',गुलाबराव पाटलांचा दावा

 

Gulabrao Patil : शिंदे गटाने बंड केल्यामुळेच भाजप सत्तेत आली असा दावा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय.. आम्ही बंड केलं नसतं तर तुम्हाला सत्ता मिळाली असती का? असा सवालच गुलाबरावांनी भाजप नेत्यांना केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17:39 PM

 राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात याचिका दाखल

 

Shivsena MLA Disqualification Case : आमदार  अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका केलीय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आलाय. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांनी लवकर घ्यावा, यासाठी आधीच सुनिल प्रभू यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर उद्या सुनावणी होणार होती, मात्र याचा निकाल लागल्यानं प्रभूंची याचिका निकाली काढली जाईल. आता आज नव्यानं दाखल झालेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

17:06 PM

'उद्धव ठाकरे-शरद पवार म्हणजे विक्रम वेताळ',राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला

 

Radhakrishna Vikhe Patil : उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणजे विक्रम वेताळ अशी उपमा भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीय. ते अहमदनगरमधल्या महायुतीच्या मेळाव्यात बोलत होते. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

16:34 PM

ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्राची- संजय राऊत

 

Sanjay Raut vs Nitesh  Rane : तर भविष्यात काय घडलं तर ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्राची आणि महाराष्ट्रातील गृहखात्याची असल्याचं राऊतांनी म्हटलंय... तर स्वतःच संरक्षण वाढविण्यासाठी हा बनाव आहे असा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

16:10 PM

उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीबाहेर घातपाताचा कट?

 

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीबाहेर घातपाताचा कट असल्याचा कॉल महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आलाय...फोन करणा-या व्यक्तीने मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणा-या 4 ते 5 मुस्लीम व्यक्तींचे संभाषण ऐकून ही माहिती दिली...हे मुस्लीम तरुण उर्दूतून संभाषण करत असल्याची माहिती दिली...संभाषण करणारे मोहम्मद अली रोड येथे रुम भाड्यावर घेणार असल्याचंही नियंत्रण कक्षाला सांगितलं...या माहितीनंतर मुंबई पोलीस सतर्क झालेयत...
 

14:20 PM

दाओस दौऱ्यासाठी 50 लोकं कशासाठी? - आदित्य ठाकरे

 

Aaditya Thackeray : दाओस दौ-यावरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. 10 लोकांना परवानगी असताना 50 लोक कशासाठी. मुख्यमंत्र्यांचे पीए, ओएसी, दोन-तीन दलाल, लहान मुलं हे सगळं सुट्टी आणि मजेसाठी चाललंय का असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. व-हाड निघालंय दाओसला अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

14:12 PM

KYC अपडेट नसेल तर फास्टॅग रद्द होणार

 

Fastag KYC Update : तुम्हाला दुप्पट टोल भरायचा नसेल तर तातडीनं केवायसी अपडेट करा. अन्यथा तुमचा फास्टॅग रद्द होईल, फास्टऍग रद्द झाल्यास तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल. 3 जानेवारीपूर्वी केवायसी अपडेट करा. वन व्हेईकल वन फास्टॅगनं ही मोहिम सुरु केलीय. तेव्हा आता तातडीनं केवायसी अपडेट करा....

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13:16 PM

बसपा लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार

 

Loksabha Election 2024 : बसपा अध्यक्ष मायावती यांनी आज मोठी घोषणा केलीय. आगामी लोकसभा निवडणूक स्वबळाव लढणार असल्याची घोषणा त्यांनी केलीय. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. धर्माच्या आडून राजकारण केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. इंडियामध्ये सामिल होण्यासाठी अनेक नेत्यांनी मायावती यांना विनंती केली. मात्र, त्यांनी एकला चलो रे.. ची भूमिका घेतली

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12:06 PM

शरद मोहोळ हत्येप्रकरणी आणखी 11 जणांना अटक

 

Sharad Mohol : पुण्यातल्या कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केलीय.. हत्येचा मास्टरमाईंड रामदास मारणेसह मुळशीचा गुंड विठ्ठल शेलारलाही बेड्या ठोकल्यायत.. पनवेल पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईत एकूण 11 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.. मागील दोन दिवसांपासून गुन्हे शाखेचे पोलीस या आरोपींच्या मागावर होते. मात्र ते पोलिसांना हुलकावणी देत होते. अखेर रविवारी मध्यरात्री पनवेल ते वाशी या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सर्वांना अटक केली. शरद मोहोळ हत्येप्रकरणी आतापर्यंत दोन वकिलांसह 23 जणांना अटक करण्यात आलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11:58 AM

आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा - मनोज जरांगे

 

Manoj Jarange : जरांगे 20 जानेवारीला मुंबईत येण्यावर ठाम आहेत...मुंबईत येण्याआधी 19 जानेवारीला विशेष अधिवेशन घेऊन सग्या सोय-यांना लाभ देण्यासाठी कायदा बनवा...20 तारखेच्या आत नोंदी सापडलेल्या 54 लाख मराठ्यांसह नातेवाईकांना तातडीनं कुणबी प्रमाणपत्र द्या...अशी मागणी जरांगेंनी केलीय...बच्चू कडूंनी जरांगेंची भेट घेतली यावेळी दोघांमध्ये यावर चर्चा झाली...सगे सोयरे या शब्दाची सरकारनं केलेली व्याख्या आणि जरांगे पाटलांनी केलेली व्याख्या यात दुरुस्ती करण्याची मागणी जरांगेंची आहे...याबाबत तोडगा कसा निघेल यासाठी सरकारशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन कडूंनी दिलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11:56 AM

मनोज जरांगेंचा मुंबईत दौरा ठरला

 

Manoj Jarange : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई दौरा ठरलाय... जरांगे मुंबईत मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरु करणार आहेत... 20 जानेवारीला सकाळी 9 च्या मुहूर्तावर जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होतील.. तर 26 जानेवारीपासून जरांगेंचं मुंबईत बेमुदत उपोषणाला सुरुवात करतील.. मुंबईपर्यंतच्या प्रवासात जरांगे दररोज 90 ते 100 किमी प्रवास करणार आहेत.. ज्यांना शक्य आहे त्यांनी चालावं, तर इतरांनी गाडीत बसून प्रवास करावा असं आवाहन जरांगेंनी केलंय.. जरांगेंचा मुक्काम ज्याठिकाणी असेल त्या मुक्काम स्थळाच्या शेजारी असलेल्या गावक-यांकडून जेवणाची सोय केली जाणार

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11:03 AM

सोलापुरात नरेंद्र मोदींचा रोड शो?

 

Narendra Modi Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी महिन्याभरात पुन्हा एकदा महाराष्ट्र दौ-यावर येणार आहेत... 19 जानेवारीला नरेंद्र मोदींचा सोलापूर दौरा होणार आहे.. सोलापुरातल्या रे नगरमध्ये सर्वात मोठी कामगार वसाहत साकारत आहे.. 30 हजार कामगारांना मोदींच्या हस्ते चावी देण्यात येणार आहे.. मात्र कार्यक्रमाचं हे ठिकाण शहरापासून दूर असल्याने मोदींच्या रोड शोसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु झाले आहेत.. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसंच सोलापुरातले भाजप नेतेही मोदींच्या रोड शोसाठी आग्रही आहेत. नरेंद्र मोदींच्या रोड शो साठी पीएमओ कार्यालयाला विनंती करण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10:34 AM

निफाडचा पारा 6.5 अंशांवर

 

Niphad Temprature Drop : नाशिक शहर आणि निफाड तालुक्याच्या पा-यामध्ये आज मोठ्या प्रमाणात घसरण झालीये...निफाडमध्ये पारा 12 अंशांवरून थेट 6.5 अंशांवर घसरलाय...तर नाशिक शहरामध्ये 15.4 अंशांवरून थेट 11.1 अंशांवर पारा आलाय...यंदाच्या मोसमातील तापमानाची ही पहिलीच निच्चांकी नोंद निफाडमध्ये करण्यात आलीये...पारा घसरल्याचा फायदा गहू आणि कांदा पिकाला होणार असला तरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत...गारठ्यामुळे द्राक्षांना तडे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय...तर परभणीतही तापमान 10.5 अंश नोंदवण्यात आलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10:31 AM

शिंदे गटानं बंड केल्यानं भाजप सत्तेत - गुलाबराव पाटील

 

Gulabarao Patil : शिंदे गटाने बंड केल्यामुळेच भाजप सत्तेत आली असा दावा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय.. आम्ही बंड केलं नसतं तर तुम्हाला सत्ता मिळाली असती का? असा सवालच गुलाबरावांनी भाजप नेत्यांना केलाय...

10:02 AM

अंधेरीत बोगस कॉल सेंटरवर धाड, 10 जण अटकेत

 

Mumbai Andheri Call Center : अंधेरीत बोगस कॉल सेंटरवर धाड टाकलीय...मुंबई पोलिसांच्या कारवाईत 10 जणांना अटक करण्यात आलीय... अमेरिकेतील नागरिकांना औषधे विकण्याच्या नावाखाली बोगस धंदा सुरू होता...या कॉल सेंटरच्या माध्यमातून डॉलर्समध्ये पैसे घेतले जायचे...मात्र, औषधं पाठवलीच जात नव्हती...हा सगळा प्रकार पोलिसांना कळताच धाड टाकून 10 जणांना अटक केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09:34 AM

अयोध्येत ताजमहालपेक्षाही भव्य मशीद उभी राहणार

 

Ayodhya Masjid : अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे.. मात्र राम मंदिरापाठोपाठ आता अयोध्येत ताजमहालपेक्षाही भव्यदिव्य अशी मशीद बांधण्यात येणार आहे.. अयोध्येपासून 25 किमी अंतरावर धन्नीपूरमध्ये ही मशीद बांधण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये मशीदीसाठी पाच एकर भूखंड देण्यात आला होता... मोहम्मद बिन अब्दुल्ला ही मशीद भारतातल्या सर्वात मोठ्या मशिदीपैकी एक असणार आहे.. अयोध्येतल्या या मशिदीत जगातील सर्वात मोठे 21 फूटांचे कुराण उभारण्यात येणार आहे.. पाच मिनार असलेली भारतातील ही पहिली मशीद असेल. रमजाननंतर 2024 च्या उत्तरार्धात मशिदीचे बांधकाम सुरू होण्याची अपेक्षा आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:05 AM

टीसीएसच्या 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

 

TCS : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत कॉपी पुरवल्याप्रकरणी टीसीएसच्या दोन कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. डिसेंबरमध्ये लातूरच्या केंद्रावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पदभरतीसाठी परीक्षा झाली होती. त्यावेळी टीसीएस कंपनीच्या दोन कर्मचा-यांनी कॉपी पुरवल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे खासगी कंपनीमार्फत केल्या जाणा-या संपूर्ण नोकरभरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. सर्व परीक्षा MPSC मार्फत घेतल्या जाव्यात अशी मागणी केली जातेय.. TCS कंपनीने याप्रकरणी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:00 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अलिबागच्या दौऱ्यावर

 

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अलिबाग दौ-यावर जाणार आहेत. सकाळी 9.30 च्या सुमारास राज ठाकरे रेवदंडामध्ये महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतील. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधतील... रायगडमध्ये विविध प्रकल्पाच्या नावावर जमिनींचं अधिग्रहण होतंय.. अनेक परप्रांतातील रायगड जिल्ह्यात जमिनी खरेदी करत आहेत. त्यामुळे मूळ शेतकरी भूमीहीन होत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. याबाबत जनजागृती करण्यासाठी मनसेकडून जमीन परिषदेचेही आयोजन केले जाणार आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

Read More