Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Breaking News Live Updates: स्पाइसजेटच्या महिला कर्मचाऱ्याने CISF जवानाला मारली थप्पड

Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस विधानसभेच्या अधिवेशनामुळे गाजण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे देशभरातील वेगवेगळ्या घडामोडींसहीत परदेशातील घडामोडींवरही या ब्लॉगच्या माध्यमातून आपलं लक्ष राहणार आहे. जाणून घ्या क्षणोक्षणाच्या अपडेट्स...

Breaking News Live Updates: स्पाइसजेटच्या महिला कर्मचाऱ्याने CISF जवानाला मारली थप्पड
LIVE Blog

Maharashtra Breaking News Today: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाबरोबरच वरळीमधील हिट अँड रन प्रकरण आजही गाजण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये आजही तिव्र ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये पावसाने उसंत घेतली असली तरी देशातील अनेक भागांमध्ये पाऊस कोसळतोय. या आणि अशाच सर्व बातम्यांसंदर्भातील अपडेट्स आपण या ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहेत. क्षणोक्षणाच्या लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा.

11 July 2024
22:22 PM

स्पाइसजेटच्या महिला कर्मचाऱ्याने CISF जवानाला थप्पड लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जयपूर विमानतळावरची ही घटना असून सुरक्षा तपासणीवरुन वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. 
थप्पड लगावणाऱ्या स्पाईसजेटच्या महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सुरक्षा कर्मचाऱ्याने अयोग्य भाषेचा वापर केल्याचा स्पाईसजेटचा दावा आहे. 'ड्युटी संपल्यावर घरी येऊन भेट' असं महिलेला सागितल्याचा आरोप जवानावर करण्यात आलय. महिला कर्मचाऱ्यांसोबत उभे राहण्याचा स्पाईसजेटने निर्णय घेतलाय.

 

19:09 PM

छगन भुजबळांना राज्यात जातीय दंगली घडवायच्या आहेत असं म्हणत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधलाय. नावं सांगणार त्याला विधानसभेला पाडायचं म्हणजे पाडायचं. असं जाहीर आवाहन मनोज जरांगेंनी उपस्थित मराठा समाज बांधवांना केलंय. बीडमधील रॅलीत भाषणादरम्यान त्यांनी हे आवाहन केलंय.

17:47 PM

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची आज बीडमध्ये जनजागृती रॅली होतेय. या रॅलीसाठी मोठ्या संख्येने तरुण सहभागी झालेयत. रॅलीमध्ये तीन हजारांहून अधिक स्वयंसेवक नेमण्यात आलेयत. सगेसोयरेंच्या मागणीसाठी मनोज जरांगे ठाम आहेत. या मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी मराठा तरुण रॅलीत सहभागी झालेयत. बीड जिल्ह्याने सर्वांची हवा टाईट केली असून रॅलीला रेकॉर्डब्रेक गर्दी झाल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ही रॅली निघणार आहे...सुभाष रोड, माळीवेस चौक, अण्णाभाऊ साठे चौक, जालना रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप होणाराय...त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भव्य अशी जाहीर सभा देखील होणाराय...रॅलीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय..

 

14:55 PM

बीकेसीमधील पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेसचा राडा; अदानींविरोधातील आंदोलनादरम्यान घडला प्रकार

मुंबईतील बीकेसीमधील पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेसने राडा केला आहे. अदानींविरोधात वीज बीलदरवाढीविरुद्ध काँग्रेसने केलेल्या आंदोलनादरम्यान हा प्रकार घडला आहे.

13:13 PM

धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही: मुनगंटीवार

अबू आझमींनी उपस्थित केलेल्या मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी, "मुस्लिम धर्मातील काही जातींना आरक्षण आहेच.  धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. मुस्लिम धर्मातील गरीब जातींना आरक्षण दिल गेलं आहे," असं म्हटलं आहे. 

13:13 PM

मुस्लिम आरक्षणावरुन अबू आझमींचा महाविकास आघाडीला टोला

अबू आझमी यांनी विधानसभेमध्ये मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. "मराठा आरक्षण बाबत चर्चा होते मुस्लिम समाजाला आरक्षण आम्हला दिलं जात नाही," असं आझमी म्हणाले. महाविकास आघाडीला टोला लगावताना अबू आझमींनी, "जे आमची मत घेतात ते हि आरक्षणावर काही बोलत नाहीत," असंही म्हटलं. 

13:01 PM

'कल्याणजवळ 7000 कोटींचा घोटाळा; एका बिल्डरने...'

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कल्याण जवळील एका कथित 7 हजार कोटींच्या घोटाळ्यासंदर्भात धक्कादायक दावा विधानसभेत केला आहे. "कल्याणजवळच्या एका गावात 63 एकर शासकीय जमीन बिल्डरच्या घशात घातली आहे. 7000 कोटींचा घोटाळा झाला आहे. बिल्डरने ही जमीन ताब्यात घेवून 30 हजार कोटींचा प्रकल्प राबवत आहे," असं वडेट्टीवार म्हणाले. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणामध्ये सरकारने लक्ष घालावं असे निर्देश दिलेत.

13:01 PM

...तर कोणालाही अर्बन नक्षल म्हणून अटक होईल : पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेमध्ये आज जनसुरक्षा विधेयकावरुन सरकारला प्रश्न विचारला आहे. "जनसुरक्षा विधेयक सरकार आणत आहे. त्याची एवढी तातडीने गरज आहे ‌का?" असं पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारलं आहे. "हा कायदा जर पास झाला तर कोणालाही अर्बन नक्षल म्हणून अटक करता येईल. हे निवडणुकीच्या तयारीसाठी आहे का‌? ते विधेयक तरी उपलब्ध करुन द्यावे," अशी मागणी त्यांनी केली.

12:16 PM

Mumbai Rains: मुंबईसाठी पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे

पुढील 4 ते 5 तासांत मुंबईमध्ये  काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पुढील 4 तास मुंबईसाठी महत्त्वाचे आहेत. मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. 

 

11:15 AM

वरळी हिट अँड रन प्रकरण : धक्कादायक खुलासा! अपघाताच्या आदल्या रात्री...

वरळी हिट अँड रन प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातापूर्वी मिहीर आणि त्याच्या मित्रांनी 12 मद्यपान केले होते असे पोलीस चौकशी समोर आले आहे. मिहीर शाह याने आपघात करण्यापूर्वी दारूचे अनेक पेग पोटात रिचवले होते. आदल्या रात्री म्हणजे शनिवारी रात्री  आरोपी मिहिर आणि त्याच्या मित्रांनी जुहूतल्या बारमध्ये 12 विस्कीचे पेग रिचवले होते. अपघाताच्या 4 तास आधी मिहीर शहा आणि मित्रांनी विस्कीचे 12 पेग प्यायल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. वयाची 25 वर्षे पूर्ण नसतानाही आरोपीला विस्की देण्यात आली होती म्हणूनच बारवर कारवाई करण्यात आली होती. 

11:10 AM

राहुल गांधी चालतच वारीमध्ये सहभागी होतील : पटोले

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होण्यासंदर्भातील अजून कुठलाही कार्यक्रम आमच्यापर्यंत आलेला नाही. जर आले तर वारकरी प्रथेप्रमाणे ते वारीत चालतच सहभागी होतील. त्यांना चालायची सवय आहे, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. राहुल गांधी 14 जुलै रोजी वारीत सहभागी होतील असं सांगण्यात आलं आहे.

 

11:04 AM

राज्य सरकारने लोकशाहीचा खून केला : पटोले

"काल राज्य सरकारने विधासभेत लोकशाहीचा खून केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही," अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे. "मराठा आणि ओबीसी आरक्षण चे सरकारच्या अधिकारात आहे, देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला आरक्षणाचा गाजर दाखवलं होतं. ते केंद्रात आणि राज्यात पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे, बहुमत त्यांच्याकडे आहे. स्वतःच्याच आमदारांच्या हाताने सहभागृहांमध्ये गोंधळ करायचा आणि आरोप विरोधकांवर टाकायचा," अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.  

09:33 AM

वादग्रस्त IAS अधिकाऱ्याचं ते प्रमाणपत्रंही खोटं?

दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (IBSNAA) ने डॉ. पूजा खेडकर यांच्या वादग्रस्त ओबीसी जात प्रमाणपत्र प्रकरणाबाबत कारवाई सुरू केली आहे.  यासोबतच कॅटने तिच्या विरोधात तक्रार केल्यानंतरही पूजा खेडकर यांनी सहा वेळा वैद्यकीय चाचणी देण्यास नकार दिला होता.  यासंदर्भात अहवालही मागविण्यात येणार आहे. 

09:32 AM

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीत बदल

मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून तीन दिवस चार तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. कोलाडजवळ पुई इथं म्हैसदारा नदीवर नवीन पुलाचा कामासाठी गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 असे दररोज 4 तास हे काम चालणार आहे. महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे.  प्रवाशांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. कोकणात येणारी वाकण-पाली-माणगाव मार्गे तर मुंबईकडे जाणारी वाहतूक कोलाड-रोहा-भिसे खिंड मार्गे नागोठणे अशी वळवण्यात आली आहे. 

09:28 AM

मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, राज्यात मोसमी पावसाला पोषक हवामान आहे. किनारपट्टीवर अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

09:27 AM

किनारपट्टी, पश्चिम घाट परिसरात उद्यापासून 3 दिवस पावसाचा जोर

किनारपट्टीसह पश्चिम घाट आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपासून (12 जुलैपासून) पुढील तीन दिवस हवामान विभागाने किनारपट्टीसह पुणे, सातारा जिल्ह्यांना नारंगी इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील बाष्पयुक्त हवा वेगाने किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भ आणि विदर्भाला जोडून असलेल्या मराठवाड्याला पिवळा इशारा देण्यात आला असून, तिथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

09:25 AM

भाजपाची आज महत्त्वाची बैठक

भाजपा महाराष्ट्र कोअर कमिटीची आज सकाळी 10 वाजता बैठक पार पडणार आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात ही बैठक होणार असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, महाराष्ट्र भाजपा प्रभारी भूपेंद्र यादव बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला जाणार असून विधान परिषदेच्या निवडणूकीवर  देखील चर्चा होणार असल्याचे समजते.

09:23 AM

कोस्टल रोडला साडेतीन किमीचा टप्पा आज सुरु होणार

मुंबईमधील कोस्टल रोडचा हजी आली ते वरळीचा खान अब्दुल गफार खान पर्यंतचा उत्तर दिशेने जाणारा साडेतीन किलोमीटरच्या मार्गीका गुरुवार 11 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे.

09:23 AM

अदानींविरोधात काँग्रेसचं आंदोलन

वाढत्या वीज बिलाच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने आदानींच्या मुख्य कार्यालयावर आज दुपारी मोर्चा नेला जाणार आहे.

09:21 AM

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुतेसाठी रवाना

तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बरड इथला मुक्काम आटोपून पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाली. धर्मपुरी इथे दुपारचा विसावा घेऊन माऊलींची पालखी नातेपुते इथे दाखल होईल. आज नातेपुते इथं माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे

09:19 AM

तुकाराम महाराजांची पालखी सराटीकडे मार्गस्थ

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूरकरांचा पाहुणचार घेऊन पुढे मार्गस्थ झाली. आज तुकोबारायांची पालखी वडापुरी मार्गे सराटीकडे मार्गस्थ झाली. सराटी इथं पालखीचा मुक्काम असणार आहे.

09:18 AM

आज अधिवेशनात काय होणार?

मराठा आरक्षण बैठकीवरून सत्ताधारी आमदारांच्या गोंधळामुळे बुधवारी दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. त्यामुळं बुधवारचे अर्धवट राहिलेले कामकाज गुरूवारी घेतले जाईल. तसंच पुरवणी मागण्या गोंधळात मंजूर केल्या असल्या तरी यावर गुरूवारी चर्चा होईल. तसंच अंतिम आठवडा प्रस्तावावरही चर्चा होईल.

09:17 AM

चार पक्षांच्या आमदारांचा मुक्काम हॉटेलमध्ये

कफ परेड येथील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये भाजपच्या सर्व आमदारांना ठेवण्यात आले आहे जेणेकरून विधानपरिषदेच्या निवडणुकीत दगाफटका होणार नाही. ही काळही ठाकरे गटाने घेतली आहे. ठाकरे गट, शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपने आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. हॉटेल राजकारणापासून मात्र काँग्रेस आणि शरद पवार गट वंचित आहेत.

09:16 AM

मतदानाची रंगीत तालीम

भाजपच्या 5 उमेदवारांना कोणत्या पसंतीची मते द्यायची क्रमानुसार मतदान कसे करायचे याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा आमदारांना विधानभवनातील भाजपच्या कर्यायात मर्गदशन केले. मतदान कसं करायचे याबाबत या बैठकीत साध्या कागदावर रंगीत तालीम घेण्यात आली. 

09:15 AM

फडणवीसांकडून आमदारांची पाठशाळा

12 जुलै रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने अर्थात महायुतीने कंबर कसली आहे. आपला एकही मत वाया जाणार नाही याची काळजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेताना दिसत आहे. काल रात्री विधानभवनातील भाजपच्या कर्यायात रात्री 9 वाजता बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या आमदारांची पाठशाळा देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More