Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
09 June 2024
16:26 PM

सांगलीत कोयता गँगची दहशत 

 

Sangli Koyta Gang : सांगलीत कोयता गँगची दहशत दिसून येतेय. मिरजेमध्ये एका टोळीनं कोयते आणि लोखंडी रॉड घेऊन 20 ते 25 बाईकची तोडफोड केलीय.शहरातल्या ढेरे गल्ली आणि कोष्टी गल्लीमध्ये हा प्रकार घडला. 4 जणांच्या टोळक्याकडून हातात कोयते, लोखंडी रॉडसह धारदार शस्त्र घेऊन भर रस्त्यावर दहशत माजवली. त्यानंतर एकामागून एक वीस ते पंचवीस बाईकची आणि एका कारची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. घटनेनंतर मिरज शहर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. कोयता गँगवर कडक कारवाई करण्याची मागणी सांगलीकर करतायत.

12:48 PM

नारायण राणे आणि भागवत कराडांना मंत्रिमंडळात स्थान नाही

 

Narayan Rane & Bhagwat Karad : नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिमंडळ स्थान दिले जाणार नाही अशी माहिती भाजप हायकमांडकडून मिळालीय...राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रीमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात आलंय...नारायण राणे एमएसएमई मंत्री होते तर कराड अर्थ राज्यमंत्री होते...यावेळी दोन्ही खासदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाहीये...

12:21 PM

एकनाथ खडसे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार

 

Eknath Khadse : एकनाथ खडसे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत...खडसेंनी अजून भाजपमध्ये प्रवेश केलेला नाहीयेत...तरीदेखील ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत...रक्षा खडसेंची मंत्रिपदी वर्णी लागल्याने परिवारातील एक सदस्य केंद्रातील मंत्रिमंडळात जातोय याचा आनंद खडसेंना झालाय...

11:24 AM

महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन

 

Maharashtra Minster : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन आलेयत...भाजपचे नितीन गडकरी, पियूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे...तर रामदास आठवलेंना पुन्हा केंद्रात मंत्रिपदाची संधी देण्यात आलीय...तर शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांनाही मंत्रिपदासाठी पंतप्रधान कार्यालयातून फोन आलाय...यावेळी प्रतापराव जाधव आणि रक्षा खडसे पहिल्यांदाच केंद्रात मंत्री होणार आहेत...तर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागलीय..

 

09:48 AM

सिंधुदुर्गात रस्ता खचला

 

Sindhudurga Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मोंड गावात काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला.या पावसामुळे कॉलेज ते गावठण रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं.भरधाव वेगाने पाण्याचा प्रवाह या रस्त्यावरून वाहून गेल्याने जवळजवळ दीड किलोमीटरचा रस्ता पार उखडून गेला.रस्त्याची माती नागरिकांच्या घरात गेली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09:15 AM

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

 

Narendra Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारेत...राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरूये. शपथविधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला राजधानी दिल्ली सजलीये. राष्ट्रपती भवनावर दिमाखदार विद्युत रोषणाई करण्यात आलीये तर 9 आणि 10 जूनला दिल्लीत नो फ्लाइंड झोन घोषित करण्यात आलाय. ड्रोन, पॅराग्लायडिंग, पॅराजम्प, तसंच रिमोट ऑपरेटेड फ्लाइंड मशिन्सच्याही वापराला बंदी घालण्यात आलीये. सुमारे 10 हजार नागरिक शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असतील. दिल्ली पोलिसांचे 3 हजार कर्मचारी, पॅरामिलिट्री फोर्सच्या 15 तुकड्या, NSG आणि SPG तसंच इंटलिजन्स विंगचे अधिकारीही तैनात असणार आहेत. संध्याकाळी 5 वाजल्यापासून पाहुण्यांचं आगमन सुरु होईल, तर सव्वा सात वाजता शपथविधी सोहळा आरंभ होईल. जवळपास 8 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल. कार्यक्रम निमित्तानं नवी दिल्लीच्या सीमेकडे येणा-या सर्व रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त असणार आहे. 

08:29 AM

मुसळधार पावसामुळं पुणे शहर जलमय

 

Pune Rescue Operation : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय.. या पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागात पाणी साचलं.. लोहगाव, कलवड वस्ती येथून पाण्यात अडकलेल्या 3 व्यक्तींची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली.. शहरातील विविध भागात अजूनही पाणी साचलं असून अग्निशमन दालाकडून रेस्क्यू ऑपरेशन वेगानं सुरु आहे.. दर्यान काल पुण्यात अंगावर झाड कोसळून एका व्यक्तीच्या मृत्यू झाला... अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या विविध झाडं तसंच भिंत कोसळण्याच्या 79 घटना घडल्यात.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08:11 AM

टी-20 वर्ल्ड कप - भारत वि. पाकिस्तान मॅच

 

T-20 World Cup - India Vs Pakistan Match : टी-20 वर्ल्डकपमध्ये आज भारत पाकिस्तान मॅचचा थरार रंगणारेय.  न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणारेय. स्पर्धेत दोन्ही टीमचा हा दुसरा सामना असणारेय. पहिल्या मॅचमध्ये भारतानं आयर्लंडचा पराभव केलाय. तर पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये पाकिस्तानवर मोठा दबाव असणारेय. या मॅचवर पावसाचं सावट आहे..

08:06 AM

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस

 

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. सगे सोयरे कायद्याच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांनी कालपासून आमरण उपोषण सुरू केलंय.त् काल डॉक्टरांच्या पथकाने 2 वेळा जरांगे पाटलांची तपासणी केली.दरम्यान अंबडच्या महिला तहसीलदारांनीही जरांगे पाटलांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली मात्र ही विनंती जरांगे यांनी धुडकावून लावली.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07:57 AM

मुंबई-अहमदाबाद मार्ग खचला

 

Mumbai-Ahmedabad Highway Crack : पहिल्याच पावसात मुंबई अहमदाबाद महामार्ग खचलाय.. महामार्गावरुन जाणा-या अनेक अवजड वाहनांची चाके महामार्गात रुतलीत.. त्यामुळे नायगाव आणि  भाईंदर दरम्यान दोन्ही मार्गावर वाहतूक ठप्प झालीये.. या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.. पहिल्याच पावसात हा रस्ता खचल्यानं या रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जाची  पोलखोल झालीये.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07:52 AM

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

 

Railway Megablock : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेण्यात येतोय. रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतोय. मध्यरेल्वेच्या सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणारेय. सकाळी ११.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणआर आहे.  हार्बर मार्गावर सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर  सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट – मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत.  

07:51 AM

आजपासून पावसाची जोरदार बॅटिंग

 

IMD Rain Alert : आजपासून मंगळवारपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.. या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे याठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलीये. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपासून कोकणासह मुंबईतत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, आणि साता-या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय....

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

Read More