Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Breaking News Live Updates : '...तर सुप्रिया सुळेंना लाडकी बहिण योजनेचे पैसे देईल', अनिल पाटलांचा सणसणीत टोला

Breaking News Live Updates : महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या? याविषयीची सविस्तर माहिती एका क्लिकवर... पाहा Breaking News Live Updates 

Breaking News Live Updates : '...तर सुप्रिया सुळेंना लाडकी बहिण योजनेचे पैसे देईल', अनिल पाटलांचा सणसणीत टोला
LIVE Blog

Breaking News Live Updates : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला असून, आज नवं काय? यासोबतच देश स्तरावरील घडामोडींचे राज्यात नेमके कसे पडसाद उमटत आहेत आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या? याविषयीची सविस्तर माहिती एका क्लिकवर... पाहा Breaking News Live Updates 

 

17 August 2024
20:59 PM

अनिल पाटलांचा सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला

खान्देश दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी बोचरी टीका केली आहे. ते नंदुरबार येथे बोलत होता. सरकार महिलांना लाच देत नसून भाऊबीजची ओवाळणी देत आहे, उद्धव ठाकरे यांना बहिणीला दिलेली ओवाळणी काय माहित राहील लाच म्हणून ते तमाम महाराष्ट्रातील महिलांचा अपमान करत आहे. सुप्रिया सुळे यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तर त्यांनाही राज्य सरकार लाडकी बहिण योजनेचे पंधराशे रुपये देईल, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मोफत वीज ही योजना बंद पाडतील माजी मंत्री अनिल पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

20:12 PM

अंबादास दानवे यांचं फडणवीसांवर सडकून टीका

आम्ही अनाजीपंताची औलाद नाही. आम्हाला कपटनीती जमत नाही. आम्ही शिवरायांची औलाद आहोत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना या राज्यात दंगली पाहिजेत. त्या दंगलीवर स्वतःच्या सत्तेची पोळी त्यांना भाजून घ्यायची आहे. आम्ही मर्दानगीने लढतो असं उत्तर अंबादास दानवे यांनी फडणवीस यांना दिलंय. मुख्यमंत्री यांनी समर्थन करताना जातीजातीत धर्माधर्मात भेदभाव करायचा का? धर्मात भांडण लावायची का की महाराष्ट्र गुण्या गोविंदाने नांदू द्यायचा, असंही ते म्हणाले.

17:22 PM

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनिती

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव राज्यव्यापी दौरा करणार आहेत. तर राज्यातील विविध भागांमध्ये जाऊन पक्षाची जिल्हानिहाय स्थिती, संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहेत.

16:34 PM

लाडक्या बहिणींना महाविकास आघाडीची डबल ऑफर

राज्यात काँग्रेसचे सरकार आले तर कर्नाटकसारखी महालक्ष्मी योजना सुरू करू, असा दावा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेच्या विरोधात काँग्रेसने ही नवी रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे.

16:04 PM

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका, म्हणाले....

आम्ही सावत्र कपटी भावांना फक्त पुरून उरलो नाही तर त्यांच्यावर मात केली. जे योजनेत खोडा घालायला आले त्यांना संधी येईल तेव्हा जोडा मारायला विसरू नका. आम्ही सावत्र कपटी भावांना फक्त पुरून उरलो नाही तर त्यांच्यावर मात केली. जे योजनेत खोडा घालायला आले त्यांना संधी येईल तेव्हा जोडा मारायला विसरू नका. मी एकही दिवस घरी बसलो नाही. तोंडाला फेस येईपर्यंत मी फेसबुक वरून बडबड केली नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

14:22 PM

Breaking News Live Updates : राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द कराः न्यायालयात याचिका दाखल 

राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द कराः भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका. याचिकेतून गृहमंत्रालयाला राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करण्यासाठी आदेश देण्याची मागणी. पुढच्या आठवड्यात या याचिकेवर सुनावणीची शक्यता. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या मते राहुल गांधी यांनी इग्लंडचं नागरिकत्व स्वीकारले होते. त्यामुळं त्यांचे नागरिकत्व रद्द करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. 

13:11 PM

Breaking News Live Updates : नवी मुंबईतील in orbit  मॉलमध्ये बॉम्बच्या अफवेमुळं गोंधळ 

नवी मुंबई मधील वाशी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या in orbit  मॉल खाली करण्यात आला आहे. बॉम्ब असल्याच्या मेल आल्याने सुरक्षा यंत्रणांकडून मॉल खाली करण्यात आला आहे. पोलीस, अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून, परिसरात शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे. 

13:09 PM

Breaking News Live Updates : ऐन सहामाईच्या तोंडावर शिक्षकांना इलेक्शन ड्युटी....

मुंबई महानगर पालिकेच्या शाळांतील 2 हजार शिक्षकांना निवडणुकीच्या कामांत जुंपलंय. ऐन सहामाही परीक्षेच्या काळात शिक्षक वर्गात नसल्यानं 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय. शिक्षकांशिवाय सहामाही परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण होईल का, याची चिंता पालकांनी व्यक्त केलीये. 

13:08 PM

Breaking News Live Updates : SRAवरुन हायकोर्टाचे राज्य सरकारला खडे बोल सुनावलेत

SRAवरुन हायकोर्टाचे राज्य सरकारला खडे बोल सुनावलेत. 30 वर्षानंतरही मुंबई झोपडपट्टीमुक्त का झाली नाही?,आपल्याला मोकळ्या जागांची गरज नाही का ? अशा प्रश्नांची सरबत्ती करत झोपडपट्टी पुनर्वसन म्हणजेच एसआरए कायदा निष्प्रभ ठरत असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं. 

12:31 PM

Breaking News Live Updates : मराठा बांधवांचा सुप्रिया सुळे यांना घेराव

जळगावात मराठा बांधवांनी खासदार सुप्रिया सुळे यांना घातला घेराव. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने मराठा आरक्षण संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी. सुप्रिया सुळे यांच्या आगमनावेळी मराठा बांधवांची जोरदार घोषणाबाजी. मराठा बांधवांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेत दिले विविध मागण्याचे निवेदन. 

12:05 PM

Breaking News Live Updates : आढळराव पाटलांची अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला दांडी 

आढळराव पाटलांची अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला दांडी मारल्यामुळे अनेक चर्चाना उधाण आलं आहे. अजित पवारांच्या जन सन्मान यात्रेकडे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी पाठ फिरवली आणि चर्चांनी डोकं वर काढलं. लोकसभा निवडणुकी नंतर आज अजित पवार यांची जन सन्मान यात्रा शिरूर लोकसभेतील राजगुरूनगर खेड येथे असताना या कडे आढळराव पाटलांनी पाठ फिरवल्याने आता त्यांचं पुढचं पाऊल काय असेल याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

12:04 PM

Breaking News Live Updates : एसटीच्या बसेस आता नव्या लूकमध्ये 

एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने 2250 गाड्या दाखल होणार आहेत, त्याची पहिली झलक समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात ऑक्टोबर महिन्यात 300 बसेस दाखल होणार असल्याची माहिती आहे . अशोक लेलॅंड कंपनीच्या ह्या गाड्यांची फाईल मागील एका वर्षांपासून मुख्यमंत्री कार्यालयात अडकली होती. 2250 बसेससाठी 1012 कोटी रूपये राज्य सरकार खर्च करणार आहे.

11:03 AM

Breaking News Live Updates : विनेश फोगाटचं मायदेशी आगमन 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकानं हुलकावणी दिल्यानंतर अखेर भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटनं मायदेशी पाऊल ठेवलं आहे. दिल्ली विमानतळावर आगमन होताच विनेशच्या स्वागतासाठी अनेकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. 

10:54 AM

Breaking News Live Updates : राज्यातील आरोग्य खात्याकडून उधळपट्टी? 

गरिबांवरील उपचारासाठी तीन कोटींचे एक वाहन खरेदी करणार असल्याची चर्चा रंगलीये. विशेष म्हणजे वित्त विभागाच्या आक्षेपानंतरही सार्वजनिक आरोग्य विभागाने 80 ते 100 वाहने खरेदी करण्याचा घाट घातल्याचं बोललं जातंय. राज्यातील ग्रामीण भागात पुरेशी आरोग्य व्यवस्था असताना महागड्या आलिशान वाहनांची गरज काय, असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय. आता हा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याची चर्चा आहे.

10:15 AM

Breaking News Live Updates : महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडेही उद्धव ठाकरेंसारखा चेहरा नाही - अंबादास दानवे

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सरकारवर सडकून टीका. मित्र पक्षातील काँग्रेसचाही घेतला खरपूस समाचार. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेप आहे, ते आम्हाला चालत नाही असे काँग्रेसने जाहीर करावे. मुळात महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडेही उद्धव ठाकरेंसारखा चेहरा नाही. अजित दादा असतील किंवा छगन भुजबळ असतील यांच्या पक्षाचा पराभव विधानसभेत अटळ आहे. 

10:15 AM

Breaking News Live Updates : कोल्हे आणि सुप्रिया सुळेंची विधानं नैराश्यातुन- तटकरे

राज्यात जन स्वराज्य आणि शिव स्वराज्य यात्रा सुरु या यात्रेतुन दोन्ही बाजुने प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला जातो यावेळी आरोप प्रत्यारोच्या फेरी रंगत असुन लाडकी बहिण योजनेच्या शुभारंभावर सुप्रिया सुळेंची ट्विट करत लाडक्या बहिणींना धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप केलाय यावरुन सुनील तटकरेंनी शेलक्या शब्दात सुप्रिया सुळेंना सुनावले. अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे आम्हाला मिळत असलेल्या वाढत्या प्रतिसादामुळे नैराश्यातुन बोलत आहेत असं ते म्हणाले. 

09:42 AM

Breaking News Live Updates : आज ठरणार भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष? 

आज, शनिवारी राजधानी दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक पार पडणार असून, या बैठकीमध्ये भाजप अध्यक्षासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीत सदस्य नोंदणी अभियानासंदर्भात चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याशिवाय भाजपमधील संघटनात्मक मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह उपस्थित राहतील. 

09:32 AM

Breaking News Live Updates : राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेवर वाहतूक पोलिसांचा आक्षेप 

मुंबईतील राहुल गांधींच्या सभेवर पोलिसांनी आक्षेप नोंदवलाय. सभेमुळे वाहतूक कोंडी होण्याचा पोलिसांनी दावा केलाय. 20 ऑगस्टला वांद्रे-कुर्ला संकुलाच्या फटाका मैदानात राहुल गांधींची सभा होणारेय. नुकत्याच बंद करण्यात आलेल्या सायन ROBचं कारण देत वाहतूक पोलिसांचा सभेवर आक्षेप नोंदवलाय. MMRDAकडे त्यांनी हा आक्षेप नोंदवलाय. काँग्रेसची सभा कार्यालयीन दिवसात होत असल्याने मोठ्या वाहतूक कोंडीची भीती पोलिसांनी व्यक्त केलीय. 

09:31 AM

Breaking News Live Updates : नाशिकमधील तणाव निवळला... 

नाशिक बंदच्या पार्श्वभूमीवर भद्रकाली परिसरात निर्माण झालेला तणाव आता पूर्णपणे सामान्य झालाय.  गेल्या बारा तासापासून संपूर्ण परिसरामध्ये ट्रेकिंग फोर्सचा रूट मार्च हा सुरू आहे. 

09:13 AM

Breaking News Live Updates :  आईच्या निधनाचा विरह न सहन झाल्याने उच्चशिक्षित भाऊ बहिणीची आत्महत्या

कोल्हापुरात दोन दिवसापूर्वी आईच्या निधनाचा विरह न सहन झाल्याने उच्चशिक्षित भाऊ बहिणींनी आत्महत्या केली होती. या आत्महत्येची चौकशी केल्यानंतर भूषण कुलकर्णी आणि भाग्यश्री कुलकर्णी या भावंडांनी आत्महत्या पूर्वी सेवाभावी संस्थांना सर्व मालमत्ता दान केल्याचं पोलीस तपासात उघड झाल आहे.. या दोन्ही भावंडांनी आत्महत्या पूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये आई शिवाय जगू शकत नाही. चाललो आईकडे अस लिहिले होत. आईच्या प्रेमापोटी आत्महत्या केलेल्या या दोन्ही भावंडांची माहिती मिळाल्यानंतर हळहळ व्यक्त होत आहे.

09:12 AM

Breaking News Live Updates :  नालासोपाऱ्यात पेल्हार परीसरात कचऱ्याचे साम्राज्य

नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार परीसरातील अनेक भागात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून पालिकेच्या वतीने भागात स्वच्छता करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे ... रोज साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून मच्छरांच्या साम्राज्यामुळे डेंगू मलेरिया सारखे रोग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, अनेकदा पालिकेला याबाबत तक्रार करूनही कचरा उचलला जात नसल्याने कचऱ्याचे ढीग पालिकेच्या दालनात टाकू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. 

08:50 AM

Breaking News Live Updates :  कपिल पाटील महाविकास आघाडीची साथ सोडण्याच्या तयारीत

समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटील महाविकास आघाडीची साथ सोडण्याच्या तयारीत. मुंबईत काल झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात कपिल पाटील हजर राहिले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि कपिल पाटील यांच्यातील दुरावा वाढला आहे. आज राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा कपिल पाटील यांनी मुंबईत गोरेगावात आयोजित केलेला आहे. त्यामध्ये कपिल पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत. कपिल पाटील हे गोरेगाव विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. 

08:33 AM

Breaking News Live Updates : झारखंडमध्ये ऑपरेशन लोटस? 

झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन आणि माजी आमदार लोबिन हेमब्रम यांच्यासह पक्षाचे आणखी काही आमदार मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. येत्या एक-दोन दिवसांत भाजपच्या काही बड्या नेत्यांची भेट घेऊन चंपाई सोरेन दिल्लीतच भाजपचे सदस्यत्व घेऊ शकतात. 

08:01 AM

Breaking News Live Updates : पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीत बदल; वीकेंडसाठी निघताय? आधी हे वाचा...

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण या योजनेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुण्यात बालेवाडी मधील शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी पुणे शहर तसेच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर महिला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्याकडे येणाऱ्या महामार्गांवरील वाहतूक जड वाहनांसाठी बंद राहणार आहे. 
पुणे सोलापूर, पुणे सातारा, पुणे नगर, पुणे नाशिक, पुणे मुंबई जुना महामार्ग, तसेच पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग या महामार्गांवरील जड वाहनांची वाहतूक शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी रात्रीपर्यंत बंद करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी बाहेर जाऊन येणारी वाहने लक्षात घेता बालेवाडी परिसरातील वाहतूक देखील पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

08:00 AM

Breaking News Live Updates : पालघर जिल्हा भूकंपानं हादरला 

पालघर जिल्हा भूकंपाच्या धक्क्यानं हादरलाय. डहाणू, गंजाड, कासा परिसरात भूकंपाचा धक्का जाणवलाय. सकाळी साडेसाह वाजताच्या सुमारास हा भूकंप झालाय. या भूकंपाची तिव्रता 3.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आलीये.. भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण झालंय. 

06:44 AM

Breaking News Live Updates : कोकणकरांसाठी भाजपचा महामेगाप्लॅन 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणी मतदारांना खूश करण्यासाठी भाजपनं महामेगाप्लॅन आखलाय..गणपतीमध्ये गावी जाणा-या चाकरमान्यांनासाठी भाजप विशेष ट्रेन आणि बस सोडणार आहे. मुंबई महानगरातून कोकणात तब्बल 700 बसेस आणि 6 ट्रेनचं नियोजन करण्यात आलंय.

06:43 AM

Breaking News Live Updates : अंजली दमानिया यांच्याकडून अजित पवारांना आवाहन 

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा आव्हान दिलं आहे. एक्स समाजमाध्यमावर पोस्ट करुन त्यांनी हे आव्हान दिलंय. मी माझ्या उत्पन्नाच्या स्रोताचे दाखले घेऊन येते, अजित पवारांनीही त्यांच्या मिळकतीच्या तपशीलाचे दाखले उद्या आणावेत, असं आव्हानच अंजली दमानिया यांनी दिले.

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More