Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Monsoon Session 2023 Live: इरसालवाडी दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत निवेदन

Monsoon Session 2023 Live: मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर सर्वच स्तरातून विरोध सुरु आहे. अशातच राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

Monsoon Session 2023 Live: इरसालवाडी दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत निवेदन
LIVE Blog

Monsoon Session 2023 Live: मणिपूर हिसांचाराच्या घटनेसोबत राज्यातील शैक्षणिक धोरणावरुन विरोधकांनी राज्य सरकारला घेरलं आहे. मणिपूर घटनेवरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मणिपूर घटनेवरुन बोलू न दिल्याने विरोधकांनी सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर काही वेळातच सभात्याग केला आहे.

21 July 2023
15:49 PM

इरसालवाडी दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगडच्या इरसालवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली आहे. माणूसकी जपत अनेकांनी मदत केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपल्याकडे यंत्रणा असून वापरु शकलो नाही याची खंत आहे. पुन्हा तिथे बचावकार्य सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

14:15 PM

Monsoon Session 2023 Live: पालकमंत्री महापालिकेत कशासाठी? - आदित्य ठाकरेंचा सवाल

Monsoon Session 2023 Live: मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना महापालिकेत दिलेल्या कार्यालयावर आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. पालकमंत्री महापालिकेत कशासाठी? त्यांचा महापालिकेशी संबंध काय? त्यांनी कार्यालय तात्काळ रिकामं करावं. येत्या 24 तासात महापालिकेतील कार्यालय रिकामं केलं नाही तर मुंबईकर आपला राग दाखवतील, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

13:07 PM

Monsoon Session 2023 Live: मणिपूर सरकार बरखास्त झालं पाहिजे - आदित्य ठाकरे

"या देशाचे नागरिक म्हणून कोणावरही अत्याचार झाले तर संताप आलाच पाहिजे. मणिपूरच्या सरकारमुळे देशात आणि जगात आपलं  नाव खराब होत आहे. मणिपूर सरकार बरखास्त झालं पाहिजे. त्या सरकारची हकालपट्टी झाली पाहिजे. तिथे राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे," अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

12:18 PM

Monsoon Session 2023 Live: काँग्रेस नेत्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत संवाद

विधानभवन पोर्चमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांसोबत संवाद साधला आहे. यामध्ये बहुतेक काँग्रेस नेत्यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला. यामध्ये बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप हे काँग्रेस नेते होते.

12:14 PM

Monsoon Session 2023 Live: अजित पवार मुख्यमंत्री होतील यात शंका नाही - संजय राऊत

"अजित पवार भावी आहेत म्हणजे ते फार दिवस भावी राहणार नाहीत. मलाही राजकारण माहिती आहे. काय घडामोडी घडत आहेत ते मलाही माहिती आहे. मग त्या घडामोडी कायदेशीर असतील, घटनात्मक असतील अथवा राजकीय असतील. परंतु अजित पवार हे भविष्यातले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं हे भविष्य लवकर-लवकर जवळ येत आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री होतील यात शंका नाही. मी याआधीही सांगितलं आहे की, महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल," असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

12:07 PM

Monsoon Session 2023 Live: मणिपूरवर बोलायची संधीच दिली नाही - वर्षा गायकवाड 

"मणिपूरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तिथे दोन महिलांची नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. त्या घटनेसंदर्भात बोलण्यासाठी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे वेळ मागितली. परंतु आम्हाला बोलू दिलं नाही. मणिपूरच्या घटनेचा देशभरातील लोक निषेध करत आहेत. विधीमंडळाच्या माध्यमातून याबाबत एक ठराव झाला पाहिजे. त्या महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे. मणिपूर सरकारचा धिक्कार झाला पाहिजे. यासंदर्भात ठराव व्हावा, अशी भावना आम्ही व्यक्त केली. पण आम्हाला बोलायची संधी मिळाली नाही. विधानसभा अध्यक्षांनी पाच मिनिटंसुद्धा आम्हाला दिली नाहीत," असे आमदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.

12:05 PM

Monsoon Session 2023 Live: मणिपूर प्रकरणावर बोलण्यास परवानगी नाकारल्याने विरोधकांचा सभात्याग

मणिपूरमधील हिंसाचाराबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधकांनी विधानसभेच्या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे वेळ मागितला होता. पण, तशी संधी न मिळाल्याने विरोधीकांनी सभात्याग केला आहे.

Read More