Marathi News> महाराष्ट्र
Advertisement
LIVE NOW

Loksabha Election 2024 :मुंबईत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मतदानावेळी मृत्यू

Maharashtra Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीतील आज पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील 13 मतदारसंघात मतदान होणार असून हा शेवटचा टप्पा आहे. यानंतर महाराष्ट्राला प्रतीक्षा असेल ती 4 जूनच्या निकालाची. 

Loksabha Election 2024 :मुंबईत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मतदानावेळी मृत्यू
LIVE Blog

Maharashtra Loksabha Nkivadnuk 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. देशातील 49 जांगासह महाराष्ट्रातील 13 मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील अंतिम टप्प्या असून नाशिक, धुळे, दिंडोरी, पालघर, ठाणे, कल्याण, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघाचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. 

20 May 2024
20:31 PM

मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. 62 वर्षीय मनोहर नलगे यांचा मृत्यू झाला आहे.  लोअर परळ इथल्या पोलिंग बुथवर ही घटना घडली. उष्माघातामुळे शिवसैनिकाचा मृत्यू झाल्याची ्प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

20:26 PM

  देशात सायंकाळी वाजेपर्यंत 56.68 टक्के तर राज्यात 48.88 टक्के मतदान झाले. मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र मतदानाचा वेग मंदावल्यानं मतदारांनी नाराजी व्यक्त केली. 

17:59 PM

Loksabha Election: देशभरात संध्याकाळी 5 पर्यंत 48.66 टक्के मतदान, जम्मू-काश्मीरपेक्षाही राज्यात कमी मतदान 

महाराष्ट्रात सरासरी - 48.66
भिवंडी - 48.89
धुळे - 48.81
दिंडोरी - 57.06
कल्याण - 41.70
उत्तर मुंबई - 46.91
उत्तर-मध्य मुंबई - 47.32
उत्तर-पूर्व मुंबई - 48.67
उत्तर-पश्चिम मुंबई - 49.79
दक्षिण मुंबई - 44.22
दक्षिण-मध्य मुंबई - 48.26
नाशिक - 51.16
पालघर - 54.32
ठाणे - 45.38

17:58 PM

Loksabha Election: संध्याकाळी 6 पर्यंत जे मतदार रांगेत उभे आहेत त्यांना मतदान करु दिले जाणार

सायंकाळी 6.00 वाजता जे मतदार मतदानासाठी रांगेत उभे असतील त्यांना मतदान करु दिले जाणार आहे. या वेळेपर्यंत रांगेत उभे असलेल्या सर्व मतदारांचे मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्राचे कामकाज सुरू राहील, अशी सूचना मा. निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

17:56 PM

पालघर मध्ये बोगस मतदान झाल्याचा उघड; पालघर मधील आर्यन शाळेतील मतदान केंद्रावर घडली घटना

17:12 PM

Loksabha Election Live Update: कल्याण लोकसभेतील मतदान केंद्रांवर जाऊन मुख्यमंत्री घेतायत आढावा

कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या भेट देत आहेत. डोंबिवली शहरातील मतदान केंद्रांवर ठिकठिकाणी जाऊन मतदानाची व्यवस्था पुरेशी आहे का? मतदारांना काही त्रास होतोय का या संबंधीचा सगळा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जातोय.

16:14 PM

Loksabha Election Live Update: कितीही वाजले तरी मतदान चुकवू नका, उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मतदारांचे हाल, मतदान केंद्रांमध्ये मुद्दाम विलंब केला जातोय, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. 

15:43 PM

Lok Sabha Election 2024: कल्याण लोकसभा, भिवंडी लोकसभा दुपारी  3 वाजेपर्यत मतदान आकडेवारी

दुपारी ३ वाजेपर्यंत भिवंडी लोकसभेत ३७. ६ टक्के मतदान तर, कल्याण लोकसभेत ३२.४३टक्के मतदान

15:11 PM

Live Blog Election 2024: राज्यात तीन वाजेपर्यंत 38.77 टक्के मतदान

 

15:06 PM

दक्षिण मुंबईतील ताडदेवच्या एमपी मिल कंपाऊड इथल्या मतदान केंद्रावर गोंधळ

मशालीचे बटण दाबले तरी व्हीव्हीपॅटला मशालीऐवजी इंग्रजी एल अक्षर दिसत असल्याचा ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा दावा. मतदान केंद्रातील अधिका-यांच्या निदर्शनास ही बाब आणूनही ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

14:18 PM

भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदार याद्यात घोळ; मतदार यादीतून नावच गायब

भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदार याद्यांत प्रचंड मोठा घोळ दिसून येतोय. अनेक ठिकाणी मतदार यादीतून नावच गायब झाल्याचा तक्रारी करण्यात येत आहे. भिवंडी लोकसभेतील कल्याण पश्चिम  मधील मुंबई विद्यापीठ उपकेंद्र मतदान केंद्रावर तर संतप्त मतदारांनी थेट मतदान केंद्र अधिकाऱ्याला घेराव घालत जाब विचारला.

14:16 PM

Loksabha Election 2024 Live Updates: भगव्या कपड्यांवर जय बाबाजी लिहल्यामुळं शांतिगिरी महाराजांच्या कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

गवे कपड्यांवर जय बाबाजी असं लिहिलंय म्हणून पोलिसांनी शांतिगिरी महाराजांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. अंबड पोलीस ठाण्यात स्वतः शांतिगिरी महाराज पोहचले. मतदान याद्याही पोलिसांनी जप्त केल्या

14:16 PM

Loksabha Election 2024 Live Updates: नवी मुंबई मतदार यादीत घोळ असल्याचे समोर, नागरिकांमध्ये संताप

वाशीमधील अनेक मतदारांची नावे तुर्भे विभागातील मतदान केंद्रावर असल्याचे समोर. घरापासून तब्बल चार किलोमीटर लांब मतदान केंद्रावर नाव आल्याने नागरिकांनी व्यक्त केला रोष.

13:47 PM

महाराष्ट्रामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 28.51 टक्के मतदान

महाराष्ट्रामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 28.51 टक्के मतदान झालं आहे. महाराष्ट्रातील 14 मतदारसंघातील टक्केवारी खालीलप्रमाणे ---

महाराष्ट्र - 27.78
भिवंडी - 27.34
धुळे - 28.73
दिंडोरी - 33.25
कल्याण - 22.52
उत्तर मुंबई - 26.78
उत्तर-मध्य मुंबई - 28.05
उत्तर-पूर्व मुंबई - 28.82
उत्तर-पश्चिम मुंबई - 28.41
दक्षिण मुंबई - 24.46
दक्षिण-मध्य मुंबई - 27.21
नाशिक - 28.51
पालघर - 31.06
ठाणे - 26.05

13:25 PM

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच बोगस मतदान अन् ते ही बॅलेट पेपरवर

ठाणे शहारात आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना दुपारी मतदान करण्यासाठी येणारे मतदार निराश झाले. बोगस मतदार झाल्याने भरत बैवा ( 38 ) या मतदाराला मतदान करता आले नाही. दरम्यान, महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे बोगस मतदान वर लक्ष देण्याची मागणी केली आहे. भरत बैवा हे मतदान करण्यासाठी सेंट जॉन शाळेतील मतदानकेंद्रावर गेले असता तुमच्या नावावर आधीच मतदान झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने यावर योग्य कारवाई करून बोगस मतदानावर लक्ष दिले पाहिजे अशी मागणी भरत बैवा केली आहे. दरम्यान, मतदान केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी भरत बैवा याचे बॅलेट पेपरवर मतदान करून घेतले असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

13:05 PM

मानखुर्दमध्ये ईव्हीएम बंद

मानखुर्दमधील शिवाजीनगर येथील मतदान केंद्र क्रमांक 63 आणि 65 मधील ईव्हीएम मशीन मागील दीड तासापासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे.

13:01 PM

नाशिकमध्ये भाजपा विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे घोषणाबाजी

नाशिकमध्ये भाजपाचे आमदार देवयानी फरांदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीतेंचे समर्थक आमने-सामने! दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परिसरात तणाव निर्माण झाला असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

13:01 PM

रणवीर आणि दिपिकानेही केलं मतदान

प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दिपिका पदुकोण यांनाही मतदानाचा हक्क बजावला.

12:56 PM

सचिन तेंडुलकरने केलं मतदान

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्याचा पुत्र अर्जून तेंडुलकरबरोबर मतदानाचा हक्क बजावला.

12:36 PM

Loksabha Election 2024 Live Updates : ओशिवरा मध्ये भाजप- ठाकरे गटामध्ये वाद

मतदानाच्या पाचव्या टप्प्यादरम्यान ओशिवरा मध्ये भाजप- ठाकरे गटामध्ये वाद झाल्याची घटना समोर आली. भाजपचा झेंडा असलेली गाडी मतदान केंद्रावर नेल्याचा आरोप ठाकरे गटानं यावेळी केला. 

12:16 PM

Loksabha Election 2024 Live Updates : मतदानात अडथळा उन्हाच्या झळांचा?

महाराष्ट्रातील निवडणुकीचा शेवटचा म्हणजे पाचवा टप्पा पार पडतोय. नाशिक दिंडोरी सह मुंबईत देखील मोठ्या उत्साहामध्ये सकाळपासूनच मतदार राजाने आपला हक्क बजावत मतदान केलंय. मात्र काही मतदान केंद्रांवर मतदार राजाला दोन दोन तास उन्हाच्या झळा सोसत मतदान करावं लागतंय. मतदार केंद्रावर कुठल्याही प्रकारची सोय नसल्याची तक्रार मतदान करणाऱ्या नागरिकांनी केलीये. गेल्या दोन-तीन तासापासून नागरिक हे मतदान करण्यासाठी रांगेत उभे आहे. मात्र रांगेत असताना मंडप किंवा शेड नसल्याने उन्हाच्या झळा त्यांना बसत आहे. त्याचबरोबर मतदार केंद्रावर कुठल्याही प्रकारची पिण्याच्या पाण्याची सोय केल्या नसल्याची देखील नागरिकांनी सांगितल आहे. ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्या साठी जी मदत करायला हवी त्याची सोय केंद्रावर न केल्याची तक्रार देखील नागरिकांनी केली आहे.

12:14 PM

Loksabha Election 2024 Live Updates : राज्यपाल रमेश बैस - रामबाई बैस यांचं दक्षिण मुंबईत मतदान 

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाअंतर्गत मलबार हिल येथील राजभवन भवन क्लब मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस यांनी देखील मतदान केलं.

12:05 PM

Loksabha Election 2024 Live Updates : महिलांनी आपली काम बाजूला ठेवून मतदान करायला यावं- वंदना गुप्ते 

सिने आणि नाट्य अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी केलं मतदान. दादरच्या बालमोहन विद्यामंदिर मतदान केंद्रात केलं मतदान. सर्वांनी मतदान करावं विशेषतः महिलांनी आपली काम बाजूला ठेवून मतदान करायला यावं. आपला आवडता उमेदवार निवडून द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. 

12:03 PM

Loksabha Election 2024 Live Updates : मतदार यादीत घोळ 

भिवंडीमध्ये मतदार यादीत  घोळ असल्याची तक्रार नागरिकांनी केली असून, अनेक ठिकाणी मतदार यादी आणि मतदान कार्ड यांच्यात तफावत असल्याच्या तक्रारी केल्यात. त्यामुळे अनेक मतदार मतदान पासून वंचित. या सर्व प्रकरानंतर मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

12:03 PM

Loksabha Election 2024 Live Updates : निष्ठावंत विरुद्ध गद्दार असे चित्र या निवडणुकीत दिसत आहे- राजन विचारे 

'निष्ठावंत विरुद्ध गद्दार असे चित्र या निवडणुकीत दिसत आहे. मी देखील मोठ्या प्रमाणात काम केली आहे रेल्वे असेल दिवा पाटील एअरपोर्ट असेल किंवा अन्य रेल्वे स्थानकांची काम मी या परिसरात केली आहेत,  राजकीय कारकीर्दीत मी नगरसेवक झालो आमदार झालो आणि खासदारकीसाठी ती पुन्हा तिसऱ्यांदा रिंगणात उतरलो आहे आणि माझा विश्वास आहे की मी यावेळी देखील पुन्हा निवडून येईन. ठाण्यातील शिवसेना ही बाळासाहेबांची आणि आनंद दिघे  यांची शिवसेना आहे, त्यामुळे गद्दारांना इथे क्षमा नसते. दुसऱ्यांदा अशी गद्दारी ठाण्यात झालेली आहे. बोगस व्होटिंगला सुरुवात झाली असून सेंट ऑन हायस्कूलमध्ये त्याचं एक उदाहरण समोर आले आहे यासंदर्भात मी कालपासून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली आहे', असं मतदानाच्या दिवशी राजन विचारे म्हणाले. 

11:41 AM

Loksabha Election 2024 Live Updates : 11 वाजेपर्यंतची 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी 

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानात सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंतची 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी (एकूण) सरासरी 15.93 टक्के. 

धुळे- 17.38 टक्के
दिंडोरी- 19.50 टक्के
नाशिक - 16.30 टक्के
पालघर-   18.60 टक्के
भिवंडी-  14.89 टक्के
कल्याण  -  11.46  टक्के
ठाणे -   14.86 टक्के
मुंबई उत्तर - 14.71 टक्के
मुंबई उत्तर - पश्चिम -   17.53 टक्के
मुंबई उत्तर - पूर्व -   17.01 टक्के
मुंबई उत्तर - मध्य - 15.73 टक्के
मुंबई दक्षिण - मध्य- 16.69 टक्के
मुंबई दक्षिण - 12.75 टक्के

11:37 AM

Loksabha Election 2024 Live Updates : मुंबईत ईव्हीएम बंद पडण्याची घटना, मतदारांना मनस्ताप 

मुलुंड पूर्व बूथ क्रमांक 126 येथील ईव्हीएम मशीन अर्धा तासापासून बंद. मतदारांना मनस्ताप... 

11:21 AM

Loksabha Election 2024 Live Updates : एक मत देशाच्या विकासासाठी; मतदानानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया 

मतदानाचा अधिकार हा या लोकशाहीमध्ये एक पवित्र आणि एल मौल्यवान अधिकार आहे. तुमचं एक मत देशाचा विकास करेल, एक मत देशाला प्रगतीपथावर नेईल, एक मत देशाला महासत्तेच्या वाटेवर नेईल आणि एक मत महिलांना आदर मिळवून देईल. महायुतीचा महाराष्ट्रात विजय निश्चित.

11:15 AM

Loksabha Election 2024 Live Updates : हेमा मालिनी यांनी बजावला मतदानाचा हक्क 

ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आणि भाजपच्या विद्यमान खासदार हेमा मालिनी यांनी मुंबईतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांची मुलगी, अभिनेत्री ईशा देओल हिनंही मतदानाचा हक्क बजावला. 

11:03 AM

Loksabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क 

उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क. आजचं तुमचं मत लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी आवश्यक असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी केली. अनेक ठिकाणी मतदानाच्या रांगा पाहता मतदानाचा टक्का वाढेल असा विश्वासही त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला. 

fallbacks

10:53 AM

Loksabha Election 2024 Live Updates : राजू पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क 

कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी सपत्नीक बजावला मतदानचा हक्क. 

 

10:52 AM

Loksabha Election 2024 Live Updates : मतदानासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे रांगेत उभे 

 

10:16 AM

Loksabha Election 2024 Live Updates : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क

 

10:15 AM

Loksabha Election 2024 Live Updates : भांडूपच्या बूथवर  ईव्हीएमचा डेमो ठेवल्यामुळे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

भांडूपमध्ये पोलिंग बूथवर ईव्हीएमचा डेमो ठेवल्यामुळे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी आमदार सुनील राऊत यांची पोलिसांना कार्यकर्त्यांना अटक न करण्याची मागणी केली आहे. याशिवाय निवडणूक आयोगाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत आहेत

10:04 AM

Loksabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात पहिल्या दोन तासांत जम्मू काश्मीरपेक्षाही कमी मतदान

देशभरात सकाळी 9 पर्यंत 10.28% मतदान

  • महाराष्ट्रात सर्वात कमी 6.33% मतदान
  • सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये 15.35% मतदान
  • जम्मू काश्मीरमध्ये 7.63% मतदान
  • महाराष्ट्रात पहिल्या दोन तासांत जम्मू काश्मीरपेक्षाही कमी मतदान
09:46 AM

Loksabha Election 2024 Live Updates : कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत अंदाजे 5.39 टक्के मतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00वा.पासून सुरुवात झाली. 24 कल्याण मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सकाळी  9.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 5.39 टक्के मतदान झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे..

140 अंबरनाथ – 5.89 टक्के
141 उल्हासनगर – 3.27 टक्के
142 कल्याण पूर्व – 8.61 टक्के
143 डोंबिवली – 7.00 टक्के
144 कल्याण ग्रामीण – 3.51 टक्के
149 मुंब्रा कळवा  – 4.97 टक्के

09:38 AM

Loksabha Election 2024 Live Updates : ६.३३ टक्के राज्यात मतदान

  • भिंवडी - ४.८६
  • धुळे ६.९२
  • दिंडोरी - ६.४०
  • कल्याण - ५.३९
  • मुंबई उत्तर - ६.१९
  • मुंबई उत्तर मध्य - ६.०१
  • मुंबई उत्तर पूर्व -  ६.८३
  • मुंबई उत्तर पश्चिम - ६.८७
  • मुंबई - द. - ५.३४
  • मुंबई द. मध्य - ७.७९
  • नाशिक - ६.४५
  • पालघर - ७.९५
  • ठाणे - ५.६७
09:31 AM

Loksabha Election 2024 Live Updates : महायुती भाजपाचे उमेदवार हेमंत सवरा यांनी केलं मतदान

पालघर लोकसभेचे महायुती भाजपाचे उमेदवार हेमंत सवरा यांनी सहकुटुंब केलं मतदान केलं आहे. वाडाच्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये जाऊन सवरांच सहकुटुंब मतदान केलं आहे. हेमंत सवरा यांचं भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदान केलं आहे. 

09:28 AM

Loksabha Election 2024 Live Updates : नौपाड्यातील भागात 1 तास मतदानाची वेळ वाढवली

ठाण्यातील नौपाडा भागात evm जवळपास 1 तास बंद होतं. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. त्यामुळे आता या ठिकाणी 1 तास वेळ मतदानाची वाढवून द्यावी, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे

09:08 AM

Loksabha Election 2024 Live Updates : डोंबिवलीच्या मंजुनाथ शाळेतील ईव्हीएम सुरू

डोंबिवलीच्या मंजुनाथ शाळेतील मतदान केंद्रावरील बंद पडलेली ईव्हीएम सुरू झालं आहे.

09:04 AM

Loksabha Election 2024 Live Updates : मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं मतदान

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम यांनी सेंट ॲनिज हायस्कूल, मादाम कामा रोड, मुंबई येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

fallbacks

09:03 AM

Loksabha Election 2024 Live Updates : मराठी सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी केलं मतदान

08:59 AM

Loksabha Election 2024 Live Updates : पीयूष गोयल यांनी बजावला मतदानाचा हक्क 

उत्तर मुंबईचे लोकसभेचे उमेदवार पीयूष गोयल यांनी मतदानाचा हक्क बजावला. पीयूष गोयल यांच्यासह मतदानाला त्यांचं कुटुंबही उपस्थित होतं.पीयूष गोयलांची लढत ही काँग्रेसच्या भूषण पाटील यांच्याविरोधात होणार आहे.

08:46 AM

Loksabha Election 2024 Live Updates : सायनच्या प्रतिक्षानगरमध्ये मतदान केंद्रावर लांब रांगा 

सायनच्या प्रतिक्षानगरमध्ये मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील शाळेत मतदान रखडल्याचं दिसून आलंय. मतदान अत्यंत धीम्या गतीने होतं आहे. या ठिकाणी मतदार सकाळी ७ पासून अजूनही रांगेत उभे आहेत. 

08:41 AM

Loksabha Election 2024 Live Updates : विवेक फणसाळकरांनी आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला.

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदान केंद्रावर तैनात असलेल्या पोलिसांशी संवाद साधून परिस्थिती आढावा घेतला. तसंच प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

08:35 AM

Loksabha Election 2024 Live Updates :  मुंबईकर घराबाहेर पडा आणि मतदान करा - जान्हवी कपूर

08:33 AM

Loksabha Election 2024 Live Updates :  देशाप्रती ही एक मोठी जबाबदारी - राजकुमार राव

08:32 AM

Loksabha Election 2024 Live Updates : अभिनेत्री सान्या मल्होत्रा मतदानाचा हक्क बजावला

08:28 AM

Loksabha Election 2024 Live Updates : भारती कामडी यांनी मतदानाचा हक्क बजावला.

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार भारती कामडी यांनी सेलवाली या मतदान केंद्रावर कुटुंबसहित आपला मतदानाचा हक्क बजावला.

08:21 AM

Loksabha Election 2024 Live Updates : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मतदान केले

08:18 AM

Loksabha Election 2024 Live Updates : डोंबिवलीतील ईव्हीएम मशीन बंद

डोंबिवलीतील मंजुनाथ विद्यालय येथील मतदान केंद्रावरील एक ईव्हीएम मशीन बंद पडली त्यामुळे अर्धा पाऊण तासापासून नागरिक रांगेत

08:05 AM

Loksabha Election 2024 Live Updates : ठाण्यातील मतदारसंघात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड

25 ठाणे लोकसभा मतदासंघाच्या 148 विधानसभा मतदारसंघातील 346 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन काही तांत्रिक कारणामुळे बंद पडले होते मात्र तेथील अधिकाऱ्यांनी पुढील पंधरा मिनिटात तातडीने कार्यवाही करून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू केली आहे.

 

08:03 AM

Loksabha Election 2024 Live Updates : मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड 

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे वर्षा गायकवाड यांचं आवाहन आहे. 

07:53 AM

Loksabha Election 2024 Live Updates : शांतिगिरी महाराजांनी बजावला मतदानाचा हक्क

07:49 AM

Loksabha Election 2024 Live Updates : फरहान अख्तरने बजावला मतदानाचा हक्क

07:40 AM

Loksabha Election 2024 Live Updates : अक्षय कुमारने मुंबईकरांना मतदान करण्याचं केलं आवाहन

07:36 AM

Loksabha Election 2024 Live Updates : डोबिंवली - रवींद्र चव्हाण सहकुटुंबासह मतदान केलं

सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण सहकुटुंबासह मतदानाला स. वा. जोशी विद्यालयात मतदान केले. यावेळी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. 

 

07:35 AM

Loksabha Election 2024 Live Updates : सहपरिवार नाईक कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क

भाजप आमदार गणेश नाईक यांनी कोपरखैरणे मधील आर एफ नाईक विद्यालयात केले मतदान. माजी खासदार संजीव नाईक माजी महापौर सागर नाईक यांनी देखील मतदान करण्याचा हक्क बजावला.

 

07:25 AM

Loksabha Election 2024 Live Updates : यामिनी जाधव यांनी मतदान केलं

दक्षिण मुंबईतील शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मतदान केलं. यामिनी जाधव यांची शिवसेनेचे खासदार आणि उमेदवार अरविंद सावंत यांच्याशी लढत आहे.

07:19 AM

Loksabha Election 2024 Live Updates : अक्षय कुमार यांनी बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता अक्षय कुमारने मुंबईत मतदान केलं. सकाळी सकाळीच मतदानाला अक्षय कुमारने हजेरी लावत मतदान केलं. 

07:14 AM

Loksabha Election 2024 Live Updates : मुंबई पोलिसांकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

मुंबईत 2 हजार 752 पोलीस अधिकारी, 27 हजार 460 पोलीस अंमलदार, 6 हजार 200 होमगार्ड, 3 दंगल नियंत्रण पथक (आरसीपी) आणि 36 केंद्रीय सुरक्षा दल बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. 

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा - 30 हजार पोलीस, 3 दंगल पथकं आणि..; महाराष्ट्रातील मतदानाच्या शेवटच्या टप्प्यासाठी 'अशी' सुरु आहे तयारी

 

07:12 AM

Loksabha Election 2024 Live Updates : पालघरमध्ये मतदानाला सुरुवात 

पालघर मध्ये मतदानाला सुरुवात झालीय. पालघर लोकसभा मतदार संघात 21 लाख 48 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत . जिल्ह्यात 2270 मतदान केंद्र उभारण्यात आली असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून 13 हजार अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रांवर तैनात आहेत .

 

07:10 AM

Loksabha Election 2024 Live Updates : अनिल अंबानी आणि अक्षय कुमार यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांनी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. तर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही मतदान केलं. 

07:05 AM

Loksabha Election 2024 Live Updates : शांतिगिरी महाराजांनी बजावला मतदानाचा हक्क

त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा केल्यानंतर शांतिगिरी महाराज यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलंय. शांतिगिरी महाराज हे नाशिकमधील अपक्ष उमेदवार असून त्यांच्यासमोर गोडसे, वाजेंचं आव्हान आहे. 

 

07:02 AM

Loksabha Election 2024 Live Updates : आज मतदान केंद्रावर मोबाईल न्यायचा की नाही?

मतदारांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजेच आज मतदान केंद्रावर मोबाइल न्यायाचा की नाही? याचं उत्तर ही पोलिसांनी दिलं आहे. येथे जाणून घ्या नेमकं पोलिसांनी काय म्हटलं आहे.

बातमी सविस्तर वाचा - Mobile On Polling Booth: 20 तारखेला मतदान केंद्रावर मोबाइल न्यायचा की नाही? पोलिसांचे निर्देश काय सांगतात?

 

06:56 AM

Loksabha Election 2024 Live Updates : भांडूपमध्ये मतदारांचा उत्साह

भांडूपमध्ये मतदानासाठी नागरिकांनी रांगा लावल्यायत...मतदान सुरू होण्याआधीच नागरिक रांगेत उभे होते...ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील, मिहीर कोटेचांची प्रतिष्ठा पणाला आहे...

06:54 AM

Loksabha Election 2024 Live Updates : उमेदवार देवा चरणी नतमस्तक 

यामिनी जाधवांकडून मतदान सुरू होण्याआधी पूजा करण्यात आली. तर नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा केली. 

06:52 AM

Loksabha Election 2024 Live Updates : नाशिकमध्ये तिरंगी लढत 

नाशिकमध्ये हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे, शांतिगिरींमध्ये लढत पाहिला मिळणार आहे. तर दिंडोरीत भारती पवार, भास्कर भगरेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय. 

 

06:48 AM

Loksabha Election 2024 Live Updates : ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडीतील लढतींकडे लक्ष

ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडीतील लढतींकडे लक्ष लागलंय. राजन विचारे, नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे, वैशाली दरेकर, कपिल पाटील, भारती कामडी मैदानात आहेत. 

 

06:45 AM

Loksabha Election 2024 Live Updates : मुंबईत 'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होणार असून मुंबईत पियूष गोयल, अरविंद सावंत, वर्षा गायकवाड, शेवाळे, संजय दिना पाटील, उज्ज्वल निकमांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

 

06:43 AM

Loksabha Election 2024 Live Updates : महिला सबलीकरणासाठी सखी बुथ

महिला सबलीकरणासाठी निवडणूक आयोगाकडून सखी बुथ तयार करण्यात आलाय. या बुथवरील सर्व कर्मचारी या महिला असणार आहे. शिवाय या सखी बुथचा रंग गुलाबी ठेवण्यात आला असून गुलाबी फुलांनी सजावट करण्यात आलीय. 

 

06:39 AM

Loksabha Election 2024 Live Updates : पंतप्रधान मोदींनी मतदारांना केलं मतदान करण्याचं आवाहन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पाचव्या टप्प्यासाठी मतदान करण्याचे आवाहन खास मराठीत केलंय. '2024 लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात आज 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांसाठी मतदान होत आहे, ज्या जागांसाठी आज मतदान होत आहे त्यासाठी सर्वांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  विशेषत: महिला मतदारांना आणि तरुण मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे मी आवाहन करतो.'

06:35 AM

Loksabha Election 2024 Live Updates : मतदानासाठी मतदान केंद्र सज्ज

लोकसभा निवडणुकीचा उत्साह साजरा करण्यासाठी मुंबई निवडणूक आयोग सज्ज झालंय. मुंबईत  2520 मतदान केंद्रावर आज मतदान होणार असून याठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाचा कडाका लक्षात घेता मतदान केंद्रांवर मंडपाची सोय करण्यात आली आहे. शिवाय मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी रॅमची तसंच विल चेअरची व्यवस्था मतदारसंघात केली आहे. 

06:32 AM

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यासाठी आज मतदान 

पियूष गोयल, भारती पवार, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम, राजन विचारे, श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे आदी दिग्गजांचं भविष्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. 

 

Read More