Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

चौथ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, १२ मुलं अडकली

अंबरनाथमध्ये एका इमारतीत चौथ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली. गंभीर बाब म्हणजे या लिफ्टच्या आत

चौथ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, १२ मुलं अडकली

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका इमारतीत चौथ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली. गंभीर बाब म्हणजे या लिफ्टच्या आत १२ मुलं अडकली होती. अंबरनाथ पश्चिमेला जॉय हब नावाच्या इमारतीत हा अपघात घ़डला. सुदैवाने या मुलांपैकी कोणीही जखमी झाले नाही. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कोचिंग क्लासेस आहेत. तिथे जाण्यासाठी मुलं लिफ्टचा वापर करतात. 

मात्र चौथ्या मजल्यावर पोहोचल्यावर लिफ्टचा दरवाजा उघडण्याऐवजी लिफ्ट वेगाने तळमजल्यावर येऊन आदळली. या वेगामुळे लिफ्ट जमिनीत तीन  फूट रूतली. मुलांनी आरडाओरडा केल्यामुळे क्लासेसचे चालक आणि इतरांनी लिफ्टकडे धाव घेतली. याआधीही इथे असाच प्रकार घडला होता. त्यावेळी बिल्डरला सांगूनही लिफ्टची दुरूस्ती झाली नाही. आता कोणाचा जीव गेल्यावरच बिल्डरला जाग येणार का अशा सवाल उपस्थित केला जातोय. 

Read More