Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कोरोनाच्या ७ संशयितांचे 'स्वॅब', आता घरी देखरेखीखाली राहणार

 कोरोनाग्रस्ताच्या घरी काम करणारे कुटुंब लातूर जिल्ह्यात

कोरोनाच्या ७ संशयितांचे 'स्वॅब', आता घरी देखरेखीखाली राहणार

लातूर : पुणे इथे एका कोरोनाग्रस्ताच्या घरी काम करणारे कुटुंब लातूर जिल्ह्यात दाखल झाले. मूळचे उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील ते कुटुंब स्वतःच्या गावी न जाता लातूर तालुक्यातील नातेवाईकांकडे आले. याची माहिती पुणे आणि उस्मानाबाद प्रशासनाने लातूरच्या प्रशासनाला दिली. त्यानुसार डिस्ट्रिक्ट सर्व्हीलन्स टीममधील डॉक्टरांचे पथक आणि पोलिसांनी लातूर तालुक्यातील एका गावातून त्या सातही जणांना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या कोरोना कक्षात दाखल केले. ज्यात ४ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश होता. 

यावेळी त्या सातही जणांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. मात्र त्यांच्यात कोरोनाची कसलीही लक्षणे दिसून आले नाहीत. किंवा त्यांना ताप, सर्दी, खोकलाही नव्हता. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्या सर्व सात जणांच्या 'स्वॅब'चे नमुने पुणे येथील एनआययव्ही संस्थेकडे पाठविण्यात आले. 

त्यानंतर त्या सातही जणांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले असून पुढील १४ दिवस त्यांना डिस्ट्रिक्ट सर्व्हीलन्स टीमच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली आहे. 

डिस्ट्रिक्ट सर्व्हीलन्स टीमकडून ७ संशयितांना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संस्थेत आणण्यात आले. सर्वांची तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. कुणामध्येही खोकला, ताप तसेच इतर लक्षणे आढळून आली नाहीत. तरी खबरदारी म्हणून सर्वांचे स्वॅब पुणे NIV ला पाठविण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.

आता त्यांना डिस्ट्रिक्ट सर्व्हीलन्स टीमच्या निगरानीखाली घरीच ठेवण्यात आले आहे. त्याला होम आयसोलेट म्हणतात. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असेही ते म्हणाले. 

Read More