Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेनंतर ललित साळवे पोलीस सेवेत रुजू

लिंगबदलाची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर माजलगाव इथल्या ललित साळवे मंगळवारी पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाला.

लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेनंतर ललित साळवे पोलीस सेवेत रुजू

बीड : लिंगबदलाची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर माजलगाव इथल्या ललित साळवे मंगळवारी पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाला. सरकार, अधिकारी आणि नातेवाईक यांनी कठीण काळात संघर्षाला साथ दिल्याबद्दल ललित साळवेने साऱ्यांचे आभार मानले. या नव्या संधीचं सोनं करु असा विश्वास ललितने झी २४ तासशी बोलताना व्यक्त केलाय. माजलगाव इथं पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या ललिता साळवे हिनं लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली होती. पुरुष बनल्यानंतर नोकरीत कायम ठेवावे अशी मागणी तिने केली होती. मुख्यमंत्र्यांनी विशेष परवानगी देत तिचा अर्ज मंजूर केला होता. गेल्या महिन्यात तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर गावात परतलेल्या ललितचे गावात जंगी स्वागतही झालं. 

Read More