Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मुंबई, उल्हासनगरमध्ये आढळला प्रत्येकी एक रुग्ण, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ४७ वर

 मुंबई आणि उल्हासनगर येथे प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळला 

मुंबई, उल्हासनगरमध्ये आढळला प्रत्येकी एक रुग्ण, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ४७ वर

मुंबई : मुंबई आणि उल्हासनगर येथे प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता ४७ वर गेली आहे. हे वृत्त कोरोनाबद्दल भीती पसरवण्यासाठी नसून कोरोनाबद्दलचे गांभीर्य अधिक कळावे यासाठी आहे. 

कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रत्येकाने सजग राहण्याची गरज वाढली आहे. राज्य शासनाने जारी केलेले निर्देश सक्तीने पाळण्याची गरज आहे. हात स्वच्छ धुवणे, गर्दीची ठिकाणे टाळणे, शिंकताना-खोकताना रुमाल वापरणे या गोष्टींचे पालन होणे गरजेचे आहे. असे न झाल्यास कोरोना वेगाने पसरण्याची शक्यता अधिक आहे. 

महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यापैकी महत्वाचे १० निर्णय. यात मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात आले आहे.  तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येणार आहेत. 

१. शासकीय कार्यालयात आता ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याची उद्यापासून अमलबजावणी करण्यात येरणार आहे.

२. रेल्वे, बस गाड्यांमधीलच प्रवाशी क्षमता कमी करणार. कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी संसर्ग कमी करण्यावर भर

३. राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज ५० टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्याचा निर्णय

४. तसेच रेल्वे, एसटी बसेस, खासगी बसेस, मेट्रो आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी  सूचना 

५. मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना 

६. मुंबई शहरांमध्ये बसेसची संख्या वाढविण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात येणार

७. दुकानांच्या वेळा ठरविणार. सर्व दुकाने अंतरा अंतराने सकाळी आणि दुपारी सुरु करण्याच्या सूचना.  बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल  

८. दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध ठेवण्याचे निर्देश. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री देखील उपलब्ध आहेत. 

९. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. परिसरात किंवा इतरत्र फिरू नये. अशा व्यक्तींवर शासनाचे लक्ष असून होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली तर तिला सक्तीने रुग्णालयात भरती करणार.

१०. जीवनावश्यक वस्तुंचा साठा करू नये. जनतेने जीवनावश्यक वस्तुंचा, अन्नधान्य, औषधी यांचा साठा करू नये. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जर कोणी व्यापारी साठेबाजी करीत असेल किंवा औषधांच्या, मास्कच्या किंमती अव्वाच्या सव्वा लावत असेल तर त्यावर कडक कारवाई करणार.

Read More