Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कोल्हापूर जि.प. पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव, महाराष्ट्र विकासआघाडीचा विजय

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दतवाड मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाची चव चाखावी लागली आहे.

कोल्हापूर जि.प. पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव, महाराष्ट्र विकासआघाडीचा विजय

कोल्हापूर :  प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे गेलेल्या महाराष्ट्र विकासआघाडीचा पहिला विजय कोल्हापुरात पाहाला मिळाला. दत्तावड जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत प्रवीण माने विजयी झालेत. तर भाजपचे प्रमोद पाटील यांनी पराभव धक्का बसला आहे. या निकालानंतर महाराष्ट्र विकासआघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. सर्वपक्षीय विरुद्ध भाजप अशी निवडणूक झाली होती. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दतवाड मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाची चव चाखावी लागली आहे.

काँग्रेसचे प्रविण माने यांनी ८००१ मते मिळवत भाजपचे प्रमोद पाटील यांचा पराभव केला. त्यांना ७१२७ मते पडली. प्रविण माने ६०५ मतांनी विजयी झाले. भाजपला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र विकासआघाडीने दे धक्का दिला आहे. अपक्ष विजितसिंह शिंदे यांना ७३९६ मते मिळाली. 

 जिल्हा परिषदेची ही पोटनिवडणूक काँग्रेस, शिवसेना आणि शेतकरी संघटनेने आघाडी करून लढविली. महाराष्ट्र विकासआघाडीचा सामना भाजपशी होईल अशी अपेक्षा होती. मात्र, भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. येथे अपक्ष उमेदवारांने जोरदार टक्कर दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते बंडा माने यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणुक झाली. विजयी उमेदवार प्रविण माने हे दिवंगत  बंडा माने यांचे नातू आहेत.

उमेदवारांना पडलेली मते

प्रविण माने (काँग्रेस) – ८००१
प्रमोद पाटील (भाजप) – ७१२७
विजितसिंग शिंदे (अपक्ष) – ७३९६
प्रविण माने ६०५ मतांनी काँग्रेस विजयी

Read More