Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

परशुराम वाघमारेकडून पानसरे हत्येपूर्वी रेकी? मुख्य साक्षीदार 'झी २४ तास'वर

परशुराम वाघमारेनं गौरी लंकेश याच्या हत्येची कबुली दिली आहे.

परशुराम वाघमारेकडून पानसरे हत्येपूर्वी रेकी? मुख्य साक्षीदार 'झी २४ तास'वर

कोल्हापूर : परशुराम वाघमारेनं गौरी लंकेश याच्या हत्येची कबुली दिली आहे. कर्नाटकच्या एसआयटीनं हा दावा केला आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येची कबुली देणारा वाघमारेच पानसरेंच्या हत्येपूर्वी रेकी करायला आला होता का हे त्याला पाहिल्याशिवाय सांगता येणार नसल्याचं या प्रकरणातील मुख्य साक्षीदारानं झी २४ तासला सांगितलंय. पानसरेंची रेकी करण्यासाठी काही जण आले होते. मात्र वाघमारेच होता का हे त्याला पाहिल्यानंतरच सांगता येणार असल्याचं या साक्षीदारानं सांगितंलय.

दरम्यान कर्नाटक पोलिसांनी गौरी लंकेश हत्याप्रकरणातील प्रमुख संशयीत आरोपी परशुराम वाघमारे याचा ताबा महाराष्ट्र एसआयटीला देण्यास नकार दिलाय. मात्र वाघमारेची कर्नाटकातच दोन तास चौकशी करण्याची परवानगी महाराष्ट्र एसआयटीला देण्यात आलीय. परशुराम वाघमारे यांच्या चौकशीतून दाभोलकर आणि पानसरेंच्या हत्या प्रकरणाचे काही धागेदोरे हाती लागतात का हे या तपासातून पुढं येण्याची शक्यता आहे. मात्र केवळ दोन तासांत महाराष्ट्र एसआयटीला तपास करण्यात किती यश येणार हा खरा प्रश्न आहे. 

Read More