Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कोल्हापुरात 8 जणांना चिरडणारी 'ती' कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कुलगुरूंची, व्ही एम चव्हाण यांचाही मृत्यू

कार चालकाने चौकात उभ्या असलेल्या चार मोटार सायकलला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात 3 दुचाकी आणि एका कारचं मोठं नुकसान झाले आहे. 

कोल्हापुरात 8 जणांना चिरडणारी 'ती' कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कुलगुरूंची, व्ही एम चव्हाण यांचाही मृत्यू
Updated: Jun 03, 2024, 05:45 PM IST

Kolhapur Hit And Run Accident : कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात झाला. यावेळी भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. 

तीन जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमध्ये असलेल्या सायबर चौकात दुपारच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात एका कारने अनेक गाड्यांना धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण जखमी झाले आहेत. शिवाजी विद्यापीठ रोडवरुन येत असताना कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यानंतर कार चालकाने चौकात उभ्या असलेल्या चार मोटार सायकलला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात 3 दुचाकी आणि एका कारचं मोठं नुकसान झाले आहे. 

कोल्हापुरातील 'ती' कार माजी प्र. कुलगुरुंची

कोल्हापुरात सायबर चौकात झालेल्या कार अपघाताप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. तब्बल 8 जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र. कुलगुरुंची असल्याचे समोर आले आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरु व्ही एम चव्हाण यांच्या कारने दुचाकींना धडक दिली. या अपघातात शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू व्ही एम चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. व्ही एम चव्हाण यांची तब्येत बरी नसतानाही ते कार चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

वाहतुकीची मोठी कोंडी

कोल्हापुरात झालेल्या या अपघातामुळे चौकात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. यानंतर राजारामपुरी पोलीस आणि शहर वाहतूक शाखेच्या वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातही हिट अँड रन

दरम्यान सध्या पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. पुण्यातील कल्याणी नगर परिसरात बिल्डरच्या मुलाने पोर्शे कारने दोघांना चिरडलं. यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या जागी आईने स्वत:चं रक्त दिल्याची कबुली अखेर दिली आहे. मुलाच्या आई-वडिलांनी मिळूनच सगळा कट रचला होता. पुणे पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपाखाली मुलाची आई शिवानी अग्रवालला अटक केली होती. त्यांच्याआधी हॉस्पिटमधील डॉक्टर आणि वॉर्डबॉयला अटक करण्यात आली होती. आतापर्यंत पोलिसांनी मुलाची आई, वडील आणि आजोबा यांना बेड्या ठोकल्या आहेत.