Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Kolhapur Crime : सॉरी आई - नाना, त्याला माफ करु नका.... 19 वर्षाच्या तरुणीचे उचललं टोकाचं पाऊल

Crime News : कोल्हापुरातल्या या घटनेने सर्वांना हादरवून सोडलं आहे. नातेवाईकांच्या घरी आलेल्या तरुणीने ओढणीने गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे

Kolhapur Crime : सॉरी आई - नाना, त्याला माफ करु नका.... 19 वर्षाच्या तरुणीचे उचललं टोकाचं पाऊल

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : तरुणाच्या त्रासाला कंटाळून 19 वर्षाच्या तरुणीने आपलं आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात (Kolhapur Crime) समोर आला आहे. नातेवाईकांच्या घरात गळफास घेत तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्येपूर्वी तरुणीने दोन सुसाईड नोट लिहील्या असल्याचे समोर आले आहे. त्रास देणाऱ्या तरुणाला फाशीची शिक्षा देण्यात यावी असे या तरुणीने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.

कोल्हापुरच्या बोंद्रे नगर परिसरात बुधवारी हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. बोंद्रे नगरात नात्यातीलच तरुणाच्या त्रासाला कंटाळून आपल्या राहत्या घरातच ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. नकुशा बोडेकर असे गळफास लावून जीवन संपवलेल्या तरुणीच नाव असून तिनं आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीली होती. आपल्या आत्महत्येला त्यांच्याच नात्यातील मारूती हरी बोडेकर जबाबदार असल्याचं तरुणीने आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. 

आत्महत्या केलेली तरुणी आपल्या नातेवाईकांकडे बोंद्रे नगर येथे आली होती. घरी कोणीही नसल्याचे पाहून तिने छताच्या लोखंडी अँगलला ओढणीचा गळफास लावला आणि स्वतःला संपवलं. काही वेळाने नातेवाईक आल्याने तरुणीने दरवाजा न उघडल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी तरुणी मृतावस्थेत आढळून आली. या तरुणीने दहावीच्या शिक्षणानंतर घरकाम करुन कुटुंबियांना मदत करण्यास सुरुवात केली होती. मात्र तिने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

आत्महत्या केलेल्या तरुणीने स्वतःला संपवताना दोन सुसाईड नोट लिहिल्याचे यावेळी समोर आले आहे. निळ्या आणि लाल रंगाच्या शाईने तरुणीने दोन चिठ्ठ्या लिहील्या होत्या. निळ्या चिठ्ठीमध्ये तरुणीने, "एका तरुणामुळे मी जीव देत आहे. बोंद्रेनगरात राहायला गेलीस तर मी तुला सोडणार नाही. सापडशील तिथे मारणार, अशी धमकी त्याने दिली होती. तो मला सुखाने जगू देणार नाही. त्याच्यामुळेच मी जीव देत आहे. सॉरी आई, नाना. त्याला माफ करु नका," असे म्हटले होते. तर लाल रंगाच्या चिठ्ठीमध्ये नातेवाईकचा उल्लेख करत त्याला आत्महत्येसाठी जबाबदार ठरवले होते. "माझा जीव फक्त त्याच्यामुळेच रडत रडत गेलाय. त्याला शिक्षा द्या. तरच माझ्या आत्म्याला शांती लाभेल," असे या तरुणीने म्हटले आहे.

Read More