Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कोल्हा विहिरीत पडला आणि...

पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला नागरिक आणि वनविभागाने जीवदान दिले. 

कोल्हा विहिरीत पडला आणि...

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला नागरिक आणि वनविभागाने जीवदान दिले. 

कोतोली गावचे सरपंच पी. एम. पाटील यांच्या विहिरीत हा कोल्हा आढळून आला. विहिरीचे सर्व कठडे बांधीव असल्याने कोल्ह्याला बाहेर पडता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे कोल्ह्याची जीव वाचवण्याची धडपड सुरू होती. नागरिकांनी याची कल्पना तात्काळ वनविभागाला दिली. 

त्यानंतर दाखल झालेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने दोन्ही बाजूला साडी बांधली. या साडीच्या माध्यमातून कोल्ह्याची सुटका करण्यात आली. विहिरीतून बाहेर पडताच कोल्ह्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

Read More