Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

भिवंडीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण व हत्या, पुण्यातून सराईत गुन्हेगाराला अटक

Marathi News Today: भिवंडीतून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला पुण्यातून अटक केली आहे. या घटनेने परिसरातून एकच खळबळ उडाली आहे. 

भिवंडीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण व हत्या, पुण्यातून सराईत गुन्हेगाराला अटक

Pune News Today: भिवंडीत अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. बंडगार्डन पोलिसांनी ताडीवाला रस्ता परिसरातून एकाला ताब्यात घेतलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातून 14 फेब्रुवारी रोजी एका मुलाचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्याचा मृतदेहदेखील आढळला होता. या प्रकरणी संशयितांवर गुन्हादेखील दाखल करण्यात आले होते. तसंच, फरार झालेल्या आरोपींचा भिवंडी पोलिस कसून शोध घेत होते. 

भिवंडी पोलिसांकडून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत होता. त्याचवेळी पुण्यातील बंडगार्डन पोलिसांना घटनास्थळावरचे सीसीटीव्ही फुटेज तसंच, आरोपींचे फोटोदेखील उपलब्ध झाले होते. त्याआधारे पुन्हा पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. समोर आलेले पुरावे आणि धागेदोरे तपासून पोलिसांनी सापळा रचला. 

भिवंडीतील अल्पवयीन मुलाच्या अपहरण आणि खून प्रकरणात पुण्यातील ताडीवाला रस्ता परिसरातील सराईत गुन्हेगार रामनाथ सोनावणे सामील असल्याची माहिती तपासात उघड झाली. यानंतर  भिवंडी पोलिसांनी पुणे पोलिसांची मदत घेत सापळा रचला आणि रामनाथच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक तयार केले. पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार, रस्ता परिसरातील नदीकिनारी असलेल्या शंकर मंदिराजवळ आरोपी थांबला होता. 

पोलिसांना आरोपीची माहिती मिळताच त्याला अटक करण्यासाठी पथक रवाना झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र गावडे, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे यांनी ही कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या. 

जेवण वाढताना वाद 

जेवण वाढताना वाद झाल्यामुळं महिलेकडून पतीवर चाकूने वार करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चक्क चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जया रमेश ससाणे (वय ३४, रा. पत्र्याची चाळ, जयभीम मित्र मंडळाजवळ, भवानी पेठ) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर, या बाबत तिचा पती रमेश बबन ससाणे (वय ४३) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

Read More