Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

ट्रेनमधून उतरताना फलाटावर पडून तरूणीचा मृत्यू

मीनल पाटील असं या तरुणीचं नाव असून ती मुळची नागपूरची आहे.

ट्रेनमधून उतरताना फलाटावर पडून तरूणीचा मृत्यू

ठाणे: चालत्या ट्रेनमधून उतरताना रेल्वेखाली पडल्यानं तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडलीये. मीनल पाटील असं या तरुणीचं नाव असून ती मुळची नागपूरची आहे. परिक्षेसाठी ती शुक्रवारी नागपूरहून मुंबईत आली होती. मात्र, कल्याण स्थानकात दुरांतो एक्स्प्रेस थांबत नसल्याचं तिला समजलं.. त्यामुळे तिनं चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न तिच्या जीवावर बेतला..

Read More