Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कल्याण येथे भरदिवसा पेट्रोल पंपाची लाखोंची कॅश लुटली

कल्याणमध्ये भरदिवसा पेट्रोल पंपाची लाखो रुपयांची लुट करण्यात आली आहे.  

कल्याण येथे भरदिवसा पेट्रोल पंपाची लाखोंची कॅश लुटली

ठाणे : कल्याणमध्ये भरदिवसा पेट्रोल पंपाची लाखो रुपयांची लुट करण्यात आली आहे. बँकेत भरणा करण्यासाठी ही लाखो रुपयांची रोकड लुटली गेली. यामुळे कल्याण शहरात खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमेकडील मुरबाड मार्गावर हा लुटीचा प्रकार आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला. भरदिवसा रोकड लुटल्याने कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

मुरबाड रोड परिसरात हा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपाची रोकड बँकेत भरण्यासाठी सकाळी पेट्रोल पंपावरी कर्मचारी चालला होता. मुरबाड रोडवरील फूटपाथवरून जात असताना अचानक तीन जणांनी मागून त्याच्यावर हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर कर्मचारी भयभीत झाला. त्याला काही कळायच्या आत त्याच्या हातातील पैशाची बॅग घेऊन लुटारुनी पोबारा केला. 

दरम्यान, तीन लुटारुंपैकी एकाने पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्याला लाडकी दांडक्याने मारहाण केल्याची माहितीही समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह पोलीस यंत्रणेनेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेत. त्यांच्याकडून तपास सुरू आहे. शहरात दिवसाढवळ्या आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. 

Read More