Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'पोलीस आहे, बाजूला चल...' तरुणी खाडी किनारी फिरायला आली होती, त्यांनी तिला धमकावलं आणि...

तरुणी आपल्या मित्रासह खाडीकिनारी फिरायला आली होती, तिथे दोन अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी तिला धमकावत बाजूला नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. कल्याणमधली धक्कादायक घटना

'पोलीस आहे, बाजूला चल...' तरुणी खाडी किनारी फिरायला आली होती, त्यांनी तिला धमकावलं आणि...

आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : पोलीस असल्याची बतावणी करुन एका तरुणीवर अत्याचार (Abuse) केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीजवळील (Dombivli) ठाकुर्ली परिसरात घडली आहे. ठाणे जिल्ह्यात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार (Police Complaint) दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपी फरार असून पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथकं तयार केली असून विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.

काय झालं घटनेच्या दिवशी?
27 जानेवारीला डोंबिवली जवळील ठाकुर्ली पश्चिम परिसरात खाडीकिनारी एक तरुणी आपल्या मित्रासोबत फिरायला गेली होती. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी आणि तिचा मित्रा दुचाकीवरुन या ठिकाणी आले. ठाकुर्ली पश्चिम इथल्या बंद पडलेल्या रेल्वे यार्ड आणि पम्प हाऊसच्या ठिकाणी पीडित मुलगी आणि तिचा मित्र गप्पा मारत बसले होते. दुपारी दीडच्या सुमारास ते दोघं तिथून निघणार तोच दोन मुलांनी त्यांना अडवलं.

पोलीस असल्याची बतावणी करत त्यांनी पीडित मुलगी आणि तिच्या मित्राला धमकावलं. तुमच्या घरच्यांचे फोन नंबर द्या, त्यांना फोन करुन सांगतो अशी धमकी त्यांनी पीडित मुलगी आणि तिच्या मित्राला दिली. यावेळी आरोपींपैकी एकाने पीडित मुलीच्या मित्राला धक्काबुक्की करत बाजूला नेलं तर दुसऱ्या आरोपीने मुलीवर अतिप्रसंग केला. त्यानंतर दुसरा आरोपी आला आणि त्यानेही तिच्यावर अतिप्रसंग केला. त्या मुलीला त्याच अवस्थेत सोडत दोनही आरोपी तिथून फरार झाले.

हे ही वाचा : आईला घडवली सिंगापूरची सफर, स्वत:चं ऑफिसही दाखवलं... मुलाची प्रगती पाहून माऊलीच्या डोळ्यात अश्रू

या घटनेने पीडित मुलीला जबर धक्का बसला. त्यानंतर पीडित मुलीने आणि तिच्या मित्राने कसंबसं ठाकुर्ली रेल्वे स्थानक गाठत घडलेला सर्व प्रकार रेल्वे पोलिसांना सांगितला. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जात गुन्हा दाखल करुन घेतला. ही हद्द विष्णुनगर पोलिसांच्या अंतर्गत येत असल्याने गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार आरोपींचं वय साधारण 20 ते 22 वर्ष आहे. आरोपींवर 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून शोधासाठी 5 पथक विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहे.

Read More