Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कल्याण हादरलं! मैत्रिणच करत होती आरोपींना मदत, लैंगिक छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

गेली दीड वर्ष तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरु होते, धक्कादायक म्हणजे तिची मैत्रिणीच आरोपींना मदत करत होती

कल्याण हादरलं! मैत्रिणच करत होती आरोपींना मदत, लैंगिक छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : कल्याण पूर्वेत घडलेल्या एका घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एका तरूणीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका मुलीच्या मदतीने सात तरुण पीडीतेवर गेल्या दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार करत होते. या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

मुलीच्या मोबाईलमधील सुसाईड नोटच्या आधारे तपास करत कोळशेवाडी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. यामध्ये एका तरुणीचा देखील समावेश आहे. ही तरुणी हे गैरकृत्य करण्यासाठी या सात तरुणांना मदत करत होती. या बाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपी हे कल्यानधील एका नामांकित बिल्डरची मुलं आसून आमच्यावर दबाव टाकला जात आहे, आमच्या जीवाला धोका आहे,आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

कल्याण पूर्व परिसरात एका तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या मुलीने बारावीची परीक्षा दिली होती नुकताच तिचा निकाल ही आला होता. बारावीच्या परीक्षेत तिला 71 टक्के मार्क्स आले होते. 

तरुणीच्या आत्महत्येनंतर कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान मृत तरुणीच्या मोबाईलमध्ये पोलिसांना सुसाईड नोट आढळली. या सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. सुसाईड नोट मधील मजकुरामुळे पोलिस ही थक्क झाले. मृत तरुणीला याच परिसरात राहणारे सात तरुण व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर गेल्या दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार करत होते. 

धक्कादायक बाब म्हणजे या सात नराधमाना एक तरुणी हे गैरकृत्य करण्यासाठी मदत करत होती. ही तरुणी मृत तरुणीची मैत्रीण होती. पोलिसांनी या प्रकणात आठ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. सनी, विजय यादव, प्रमेय तिवारी, शिवम पांडे, कृष्णा जयस्वाल, आनंद दुबे, निखिल मिश्रा, आणि काजल जयस्वाल अशी अटक आरोपींची नावे आहेत.

यामधील कृष्णा जयस्वाल आणि काजल जयस्वाल हे भाऊ बहिण आहेत. दरम्यान अटक आरोपी मधील काही कल्याण मधील धनदांडग्या बिल्डरचे मुलं असल्याची माहिती समोर येत आहे .

Read More