Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Government Jobs 2023 : बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी, 'या' पदांसाठी सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी

Maharashtra News : राज्यभरातील बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारकडून अनेक पदावर नोकरी भरती सुरु आहे. या सुवर्ण संधीचं सोनं करण्यासाठी असंख्य अर्जदारांनी रीघ लावली आहे. 

Government Jobs 2023 : बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी, 'या' पदांसाठी सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी

Maharashtra Police Bharti 2023 : येत्या गुरुवारी देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन (India Celebrating 74 Republic Day ) साजरा करण्यात येणार आहे. आज सोमवारी (23 जानेवारी 2023) नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती...आजपासून प्रजासत्ताक दिनाचा सोहळाला सुरुवात होणार आहे. तर महात्मा गांधींच्या पुण्यतिथी (30 जानेवारी 2023) पर्यंत हा सोहळा रंगणार आहे. अशातच महाराष्ट्रातील बेरोजगारांसाठी सुरु संधी चालून आली आहे. 

पोलीस भरती (police recruitment students)

राज्यात पोलीस भरती (Police Constable Recruitment) मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आतापर्यंत राज्यभरातून तब्बल साडेसहा लाख पदवीधर इच्छुकांनी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी पास असूनही पदवीधर तरुणांनी पोलीस होण्यासाठी अर्ज केला आहे. हे अर्ज करणाऱ्यांमध्ये युर्वेदिक डॉक्टर, बीटेक, एमकॉम, एमबीए अशा उच्चशिक्षित तरुण आहेत. यांची संख्या पाहिली तर आपल्याला धक्काच बसेल. जवळपास 68 हजार जणांनी हा अर्ज केला आहे. यात उल्लेखनीय बाब म्हणजे 68 तृतीयपंथीयांनीही अर्ज केला आहे. (Jobs news Maharashtra Police Bharti 2023 Police Constable Recruitment mumbai India Celebrating 74 Republic Day 2023)

एकूण किती अर्ज आले?

राज्य पोलीस दलाचं बोलायचं झालं तर,  18 हजार 331 पदांसाठी सुमारे 18 लाख जणांनी अर्ज केला. यामध्ये पोलीस शिपाई, चालक आणि राज्य राखीव पोलीस दलासाठी ही भरती होणार आहे. बारावीची अट असून 6 लाख 39 हजार 317 पदवीधरांनी अर्ज केला आहे. यात सर्वाधिक संख्या कला आणि वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. विशेष म्हणजे विज्ञान शाखेतूनही म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर, अभियांत्रिकी शाखा, वकील, एमबीए शिक्षण घेतल्या उमेदवारांनीही नोकरीसाठी अर्ज केला आहे. 

Read More