Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

नोकरीची संधी, राज्यातील 'या' जिल्ह्यात आरोग्य विभागात २३५ जागांची भरती

 सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य विभागात २३५ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.  

नोकरीची संधी,  राज्यातील 'या' जिल्ह्यात आरोग्य विभागात २३५ जागांची भरती

मुंबई : कोविड-१९चे संकट राज्यावर आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू आहे. अद्यापही काही ठिकाणी उद्योगधंदे, व्यवसाय, कंपन्या बंद आहेत. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. असे असताना एक चांगली बातमी आहे. सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य विभागात २३५ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची तारीक पुन्हा वाढविण्यात आली असून ती  ८ ऑगस्ट २०२० पर्यंत आहे. ही भरती कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर होत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होत असल्याने त्याला रोखण्यासाठी आरोग्य विभागात ही तातडीने भरती करण्यात येत आहे.

या २३५ जागांपैकी  फिजिशियन - ४ जागा, वैद्यकीय अधिकारी - २४ जागा, आयुष वैद्यकीय अधिकारी - ३६ जागा, हॉस्पिटल मॅनेजर - २० जागा, स्टाफ नर्स - ९६ जागा, एक्सरे टेक्निशियन - ०२ जागा, ईसीजी टेक्निशियन - ०५ जागा,  औषधनिर्माता - ०७ जागा,  डिईओ - २१ जागा अशी भरती करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ८ ऑगस्ट २०२० असून अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2WS5hy6 या ठिकाणी संपर्क करा.(जाहिरात आधीची आहे) तसेच ऑनलाईन अर्जाकरिता ईमेल : dpmsindhudurg@gmail.com यावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशी होणार भरती

पदाचे नाव : फिजिशियन - ४ जागा

शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसीन

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी - २४ जागा

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस

पदाचे नाव : आयुष वैद्यकीय अधिकारी - ३६ जागा

शैक्षणिक पात्रता : बीएएमएस/बीयुएमएस

पदाचे नाव : हॉस्पिटल मॅनेजर - २० जागा

शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय पदवी आणि अनुभव

पदाचे नाव : स्टाफ नर्स - ९६ जागा

शैक्षणिक पात्रता : बीएससी नर्सिंग व महाराष्ट्र नर्सिंग काऊन्सिल रजिस्ट्रेशन

पदाचे नाव : एक्सरे टेक्निशियन - ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : रजि. एक्सरे टेक्निशियन

पदाचे नाव : ईसीजी टेक्निशियन - ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ईसीजी टेक्निशियन पदावर काम केल्याचा अनुभव

पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ - २० जागा

शैक्षणिक पात्रता : बीएससी डीएमएलटी

पदाचे नाव : औषधनिर्माता - ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.फार्म/डी.फार्म

पदाचे नाव : डिईओ - २१ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवी, एमएससीआयटी, मराठी व इंग्रजी टाईपिंग

वयोमर्यादा : १) वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस, स्पेशालिस्ट या पदांसाठी कमाल वयोमर्यादा ६१ वर्षे व सेवा समाप्तीची मर्यादा ७० वर्षे

२) स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, औषध निर्माता या पदांसाठी कमाल वयोमर्यादा ५९ वर्षे व सेवा समाप्तीची मर्यादा ६५ वर्षे

३) उर्वरित पदांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे (मागासवर्गीय उमदेवारांना सवलत)

Read More