Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Badlapur School Case : 'हा कुठला न्याय? पोलिसी अतिरेक झाला तर...', जितेंद्र आव्हाडांचा शिंदे सरकारला थेट इशारा

Maharastra Politics : बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर आता राज्यात (Badlapur sexual abuse case) खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राष्ट्रवादी (SP) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करत सरकारला इशारा दिलाय.

Badlapur School Case : 'हा कुठला न्याय? पोलिसी अतिरेक झाला तर...', जितेंद्र आव्हाडांचा शिंदे सरकारला थेट इशारा

Jitendra Awhad On Badlapur Police baton charge : राज्यात महिला, तरुणी, शाळेतील लहान मुली यांच्यावर अत्याचार वाढले आहेत. बदलापूर येथील एका शाळेत दोन लहान मुलींवर शाळेतीलच एका नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी ताबडतोब कारवाही न केल्याने स्थानिकामध्ये आक्रोश निर्माण झाला आणि शाळेची तोडफोड करण्यात आली तसेच बदलापूर रेल्वे स्थानकावर जाऊन दिवसभर आंदोलन करण्यात आलं. बदलापूरच्या घटनेनंतर परिसरातील नागरिक आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला अन् आंदोलनकर्त्यांना रेल्वे ट्रॅकवरून बाहेर काढलं. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यावरून आता जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट करत संताप व्यक्त केला अन् सरकारला इशारा दिला आहे. 

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

कालच्या बदलापूर आंदोलनात सहभागी झालेल्या 300 जणांवर पोलिसांनी नाहक गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी अनेक जणांना रात्रीच अटकही केली आहे. एकीकडे पोलिसांनीच हा विकृत प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे साहजिकच जनता चिडणार.. वर त्याच जनतेला अटकही करणार, हा कुठला न्याय? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय.
 
बदलापुरात जे काही झाले ते पोलीस आणि शाळेची चूक आहे. त्या कन्यांचा झालेले शारीरीक शोषण आणि या पुढे त्यांना होणारा मानसिक त्रास, याची सरकार भरपाई करणार आहे का? निष्कारण आगीत तेल ओतू नका. या प्रकरणामुळे आता महाराष्ट्र बंद करावा लागेल, अशी वेळ आली आहे. सरकारने आता तरी शहाणे व्हावे, असा इशारा आव्हाडांनी सरकारला दिला आहे.

कळव्यातही एका दिव्यांग मुलीवर असाच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. कायद्याची भीतीच राहिलेली नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र बंद होऊ नये, अशी आपली इच्छा असेल तर बदलापूरचे प्रकरण संवेदनशीलपणे सांभाळा; तिथे पोलिसी अतिरेक झाला तर मात्र वेगळा विचार करावा लागेल, असं सुचक इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला आहे. 

दरम्यान, बदलापूर घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. मविआतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय. या बंद मध्ये महाविकास आघाडीचे सर्व पक्ष सहभागी होणार आहेत. मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत बदलापूर प्रकरणावर चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर मविआ नेत्यांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केली.

Read More