Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पुण्यातल्या 'या' शहारात आजपासून जनता कर्फ्यू

आजपासून पुढील सहा दिवस शहरात कडकडीत बंद

पुण्यातल्या 'या' शहारात आजपासून जनता कर्फ्यू

पुणे : पुणे जिल्ह्यातल्या सासवडमध्ये आजपासून सहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. १६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत सासवड पूर्णपणे बंद राहणार आहे. आजपासून पुढील सहा दिवस कडकडीत बंद असणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सासवडकरांनी जनता कर्फ्यूची मागणी प्रशासनाकडे केली होती. 

त्यानुसार वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून आजपासून जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पुणे जिल्ह्यात बारामती, वाघोली, भोरनंतर सासवडमध्येही जनता कर्फ्यू करण्यात आला आहे. 

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 239481 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 154441 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या जिल्ह्यात 80152 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात 4888 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, संपूर्ण राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 10 लाख 97 हजार 856 इतकी झाली आहे. त्यापैकी 7 लाख 75 हजार 273 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या राज्यात 2 लाख 91 हजार 797 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण-रिकव्हरी रेट 70.62 टक्के इतकं आहेत. तर सध्याचा राज्याचा मृत्यूदर 2.77 टक्के इतका आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 30 हजार 409 जण कोरोनामुळे दगावले आहेत.

Read More