Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मुंबई- संभाजीनगर अंतर 5 तासांत पूर्ण होणार; नव्या वंदे भारतचे वेळापत्रक आणि तिकिटदर जाणून घ्या

Vande Bharat Express: ३० डिसेंबर २०२३  रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण करण्यात आले आहे. वंदेभारतचे वेळापत्रक आणि तिकिटदर जाणून घेऊया. 

मुंबई- संभाजीनगर अंतर 5 तासांत पूर्ण होणार; नव्या वंदे भारतचे वेळापत्रक आणि तिकिटदर जाणून घ्या

Vande Bharat Express: नववर्षाच्या आधीच महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस भेट म्हणून मिळाली आहे. मराठवाड्यात वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकर्पण करण्यात आले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन झाले आहे. कशी असेल वंदे भारत एक्स्प्रेस, वाचा.

मराठवाड्याला अखेर वंदे भारत एक्स्प्रेस मिळाली आहे. जालना वंदे भारत एक्स्प्रेसचे 30 डिसेंबरला उद्घाटन करण्यात आले आहे. रेल्वेकडून उद्घाटनाची जोरदार तयारी करण्यात आली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील या सोहळ्याला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन पद्धतीने या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक व तिकिट दर किती असेल जाणून घेऊया. वंदे भारत एक्स्प्रेसमुळं मुंबई ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास साडेपाच तासांत पूर्ण होणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकिटदर

वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकिटदर अद्याप निश्चित झाले नसले तरी  900 ते 1200 रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक

मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. ०१.०१.२०२४ पासून दररोज (बुधवार वगळता) १३.१० वाजता सुटेल आणि खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार त्याच दिवशी २०.३० वाजता जालना येथे पोहोचेल.

स्थानके

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ---/१३.१० वाजता
दादर - १३.१७ वाजता / १३.१९ वाजता
ठाणे - १३.४० वाजता/१३.४२ वाजता
कल्याण जंक्शन - १४.०४ वाजता / 1४.०६ वाजता
नाशिक रोड - १६.२८ वाजता/१६.३० वाजता
मनमाड जंक्शन - १७.३० वाजता / १७.३२ वाजता
औरंगाबाद - १९.०८ वाजता / १९.१० वाजता
जालना - ---/२०.३० वाजता

जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस

दि. ०२.०१.२०२४ पासून दररोज (बुधवार वगळता) ०५.०५ वाजता सुटेल आणि खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार त्याच दिवशी ११.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल

स्थानके 

जालना -/०५.०५ वाजता
औरंगाबाद - ०५.४८ वाजता/०५.५० वाजता
मनमाड जंक्शन - ०७.४० वाजता/०७.४२ तास
नाशिक रोड - ०८.३८ वाजता/०८.४० वाजता
कल्याण जंक्शन - १०.५५ वाजता/१०.५७ वाजता
ठाणे - ११.१० वाजता/११.१२ वाजता
दादर - ११.३२ वाजता / ११.३४ वाजता
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - ११.५५ वाजता/--

या स्थानकांत थांबणार: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड आणि औरंगाबाद

Read More