Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Jalna Crime: संतापलेल्या जावयाने सासऱ्यावर पिस्तुल रोखलं अन्... जालन्यातील धक्कादायक प्रकार

Jalna Crime News : सासऱ्याच्या हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीच्या शोधासाठी तपास पथके रवाना केली आहेत. दरम्यान, सासऱ्याच्या हत्येचे कारण समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे

Jalna Crime: संतापलेल्या जावयाने सासऱ्यावर पिस्तुल रोखलं अन्... जालन्यातील धक्कादायक प्रकार

Jalna Crime News : जालन्याच्या (Jalna News) अंबड (ambad) तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापलेल्या जावयाने सासऱ्याचा गोळ्या झाडून खून केल्याच्या प्रकाराने जालना (Jalna Crime News) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सासऱ्याची (father in law) हत्या केल्यानंतर जावयाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. बुधवारी सकाळी हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी (Ambad Police) घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. दरम्यान सासऱ्याच्या हत्येचे कारण समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अंबडच्या शारदानगर येथे पंडित भानुदास काळे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. किशोर शिवदास पवार असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे समोर आले आहे. किशोर हा पंडित भानुदास काळे यांचा जावई होता.  काळे यांची हत्या केल्यानंतर किशोरने घटनास्थळावरुन पळ काढला. बुधवारी सकाळी दोघांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रुपांतर काळे यांच्या हत्येत झालं. रागाच्या भरात किशोरने बंदुकीने पंडित काळे यांची गोळी झाडत हत्या केली. यानंतर घटनास्थळावरुन किशोरने पळ काढला.

शारदानगर भागात पंडित भानुदास काळे राहत होते. पंडित काळे यांच्या मुलीचे लग्न त्यांच्याच नात्यातील किशोर पवार याच्यासोबत काही वर्षांपूर्वी झाले होते. किशोर पवार हा अंबड तालुक्यातील रामगव्हाण येथे राहत होता. काही दिवसांपूर्वी तो पाचोड येथे स्थाथिक झाला आहे. लग्नानंतर किशोर पवारला दोन मुली व दोन मुले अशी अपत्ये होती. मात्र पती पत्नीमध्ये पटत नसल्याने दोघामध्ये सातत्याने वाद होत होता. काही दिवसांपूर्वीच किशोर पवारची पत्नी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडयेथील एका व्यक्तीसोबत पळून गेली होती. याचा राग किशोर पवारच्या मनात होता. माझ्या पत्नीला सासरी नांदायला पाठावा, अन्यथा तुम्हाला बघून घेईल अशा धमक्या किशोर सासरे पंडित काळे यांना देत होता. काळे यांच्या घरी जाऊनही किशोर पवार वाद घालत होता.

पंडित काळे याने चिथावणी दिल्यानेच पत्नी पळून गेल्याचा संशय किशोर पवारला होता. त्यामुळे संपातलेल्या किशोरने बुधवारी पुन्हा सासऱ्याचे घर गाठले आणि वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्याच्यासोबत आणखी दोघेजण होते. घरी पोहोचताच किशोरने पंडित काळे यांना शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर संतापाच्या भरात किशोरने कमरेचे गावठी पिस्तुल काढून थेट पंडित काळे यांच्यावर रोखले आणि गोळीबार केला. या घटनेत दोन गोळ्या थेट पंडित काळे यांना लागल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. काळे यांच्या हत्येनंतर पंडित काळे यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान अंबड पोलिसांनी किशोर पवार याच्या शोधासाठी पथके रवाना करत पुढील तपास सुरु केला आहे.

Read More