Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

जळगावमधील चाळीसगावात बेमोसमी पाऊस, पिकांचं नुकसान

यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक कमी पावसाची नोंद झालेल्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याच्या काही भागाला बेमोसमी पावसानं झोडपून काढलं.

जळगावमधील चाळीसगावात बेमोसमी पाऊस, पिकांचं नुकसान

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक कमी पावसाची नोंद झालेल्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याच्या काही भागाला बेमोसमी पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया गेला असल्याचं म्हटलं जात आहे. कारण हा सुगीचा काळ असल्याने शेतात ज्वारी, बाजरी सारखी पिकं आहेत. 

 यामुळं शहरातील तितूर नदीला पूर आला असून वाहतूक खोळंबलीय. या बेमोसमी पावसामुळे बाजरी, ज्वारी आदी धान्य तसंच अन्य कडधान्य पिकांचे मोठे नुकसान शक्य आहे. 

कपाशीला काही ठिकाणी फायदा तर काही ठिकाणी नुकसान पोचलय. चाळीसगाव नागद रस्त्यावरील वाघडू पुलाचे काम चालू असल्याने कच्चा पूल वाहून गेला वालझरी नदीला मोठा पूर आल्याने काही काळ संपर्क तुटला. 

Read More