Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

जळगाव येथील भीषण अपघात 5 ठार, 6 गंभीर जखमी

truck accident in Jalgaon : भरधाव ट्रकने दोन वाहनांना जोरदार धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले. 

जळगाव येथील भीषण अपघात 5 ठार, 6 गंभीर जखमी

जळगाव : truck accident in Jalgaon : भरधाव ट्रकने दोन वाहनांना जोरदार धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले. हा अपघात नशिराबाद टोलनाक्याजवळ आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडला. ट्रक चालकाला डुलकी लागल्याने त्याचे ट्रकवरील ताबा सुटला आणि दोन वाहनांना धडक दिली.  या अपघातात सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

fallbacks

बुधवारी फैजपूर येथे जनावरांचा बाजार भरतो. याठिकाणी जळगाव येथून बकर्‍या घेवून दोन बोलेरो पीकअप वाहने भुसावळच्या दिशेने जात असताना समोरुन येणार्‍या भरधाव ट्रकने दोन्ही वाहनांना धडक दिली. अपघातानंतर ट्रक उड्डाणपुलावरील पिलरला धडकला. या अपघातात दोन्ही पिकअप वाहनांचा चक्काचूर झाला. तर बोलेरो वाहनातील प्रवासी पुलाखाली फेकले गेल्याने गंभीर जखमी झालेत. यात चौघे जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. 

Read More