Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं भविष्य अंधारात

याबाबत भारत आणि फ्रान्स या देशांमध्ये प्राथमिक करार झाला आहे

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं भविष्य अंधारात

जैतापूर, रत्नागिरी : कोकणातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे भवितव्य अजूनही अनिश्चित असल्याचं पुढं आलंय. या प्रकल्पाचं भवितव्य अनिश्चित असल्याचं अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष के. एन. व्यास यांनी स्पष्ट केलंय. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबात फ्रान्सच्या ईडीएफ कंपनीबाबत अजुनही बोलणी सुरु असून समाधान होईल, असा तोडगा निघाला नसल्याचं व्यास यांनी स्पष्ट केलंय.

कोकणात जैतापूरमध्ये १६५० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या एकुण सहा अणु भट्ट्या उभारल्या जाणार आहेत. याबाबत भारत आणि फ्रान्स या देशांमध्ये प्राथमिक करार झाला आहे.

जैतापूर इथे मोठ्या प्रमाणात जमीन अधिग्रहण झालं असून संरक्षक भिंतही उभारण्यात आलेली आहे. 

असं असलं तरी भारतात अणुऊर्जेपासून वीज निर्मिती करणारी एन.पी.सी.आय.एल आणि फ्रान्समधील ईडीएफ बरोबर चर्चा अजूनही सुरुच असल्यानं जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे घोडं अजुन पुढे सरकलेलं नाही.

Read More