Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

आयटी हबमधील डोळ्यांचं पारण फेडणारी जत्रा

डोळ्यांचं पारणं फेडेल अशी एक यात्रा पिंपरी चिंचवडमध्ये संपन्न झाली.

आयटी हबमधील डोळ्यांचं पारण फेडणारी जत्रा

कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : डोळ्यांचं पारणं फेडेल अशी एक यात्रा पिंपरी चिंचवडमध्ये संपन्न झाली. आयआयटी हब असलेल्या हिंजवडीतली ही यात्रा अनेकार्थानं वैशिष्ट्यपूर्ण ठरली. तुम्हीही नक्की पाहा हा एक देखणा सोहळा.या गाण्यासह आठवते ते बगाड असलेली यात्रा. अशीच यात्रा पिंपरी चिंचवडमधल्या हिंजवडीतल्या म्हतोबाची. हिंजवडीगावात जांभूळकर परिवाराचे मूळ ३ वाडे आहेत. दरवर्षी ३ पैकी एका वाड्यातल्या विवाहित सदस्याची गळकरी अर्थात बगाडासाठी निवड केली जाते. बगाड मिरवणुकीची तयारी पूर्ण झाल्यावर मिरवणूक निघण्याच्या अर्धा तास आधी गळकर्‍याच्या नावाची घोषणा केली जाते आणि मग सुरु होतो हा बगाड सोहळा. 

बगाडासाठी खास लाकूड

या बगाडासाठी खास लाकूड अर्थात शेले आणले जातात. ते ही कोकणातल्या अति दुर्गम भागातून. तब्बल ३० फुट उंच लाकडावर बगाड केलं जातं आणि  हिंजवडी मधल्या मारुती मंदिरा पासून म्हातोबा मंदिरा पर्यंत त्याची मिरवणूक काढली जाते. 

हिंजवडीत आयटीचा दबदबा 

या बगाड यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. ग्रामस्थांना या यात्रेचा अभिमान आहे. हिंजवडी हे आयटीचं दबदबा असणारा भाग. त्याच भागात हा म्हतोबाच्या यात्रेचा सोहळा रंगतो. आणि एरवी आयआयटीयन्सची धावपळ पाहणारा हा भाग या यात्रेचा साक्षीदार होतो.

Read More